जागतिक कापूस उत्पादन दहा टक्क्यांनी वाढणार
कोजेन्सिस वृत्तसेवा
शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2017
मुंबई ः कापूस पीकक्षेत्रात वाढ झाल्याने जागतिक कापूस उत्पादन यंदा (२०१७-१८) दहा टक्क्यांनी वाढून २५.४ दशलक्ष टनांवर पोचेल, असा सुधारित अंदाज अांतरराष्ट्रीय कापूस सल्लागार समितीने व्यक्त केला अाहे. 
 
गेल्या सप्टेंबर महिन्यात जाहीर केलेल्या अंदाज अहवालात जागतिक कापूस उत्पादन २५.१ दशलक्ष टन होईल, असे म्हटले होते. त्यात अाता वाढ होणार असल्याचा सुधारित अंदाज व्यक्त करण्यात अाला अाहे.
 
मुंबई ः कापूस पीकक्षेत्रात वाढ झाल्याने जागतिक कापूस उत्पादन यंदा (२०१७-१८) दहा टक्क्यांनी वाढून २५.४ दशलक्ष टनांवर पोचेल, असा सुधारित अंदाज अांतरराष्ट्रीय कापूस सल्लागार समितीने व्यक्त केला अाहे. 
 
गेल्या सप्टेंबर महिन्यात जाहीर केलेल्या अंदाज अहवालात जागतिक कापूस उत्पादन २५.१ दशलक्ष टन होईल, असे म्हटले होते. त्यात अाता वाढ होणार असल्याचा सुधारित अंदाज व्यक्त करण्यात अाला अाहे.
 
इतर पिकांच्या तुलनेत कापसाला २०१६-१७ वर्षात चांगला दर मिळाला. यामुळे कापूस लागवडीला प्रोत्साहन मिळाले. परिणामी कापूस पीकक्षेत्र ३२ दशलक्ष हेक्टरवर व्यापले अाहे. कापूस उत्पादनात अाघाडीवर असलेल्या अमेरिकेतील उत्पादन २३ टक्क्यांनी वाढून ४.६ दशलक्ष टनांवर पोचेल, असा अंदाज कापूस सल्लागार समितीने व्यक्त केला अाहे. 
 
भारत, चीन, पाकिस्तान, ब्राझील, अफ्रिका, तुर्कस्थान अादी प्रमुख कापूस उत्पादक देशांतील उत्पादन वाढणार असल्याचे संकेत देण्यात अाले अाहेत. जागतिक स्तरावर यंदा कापसाचा वापर २५.२ दशलक्ष टन राहील. तर शिल्लक साठा १८.७ दशलक्ष टन राहणार असल्याचे अहवालात नमूद केले अाहे.
 
अमेरिकेतून सर्वाधिक निर्यात होणार
जागतिक स्तरावर ७.९ दशलक्ष टन राहील. कापूस निर्यातीत अमेरिकेचे पहिले स्थान कायम राहणार अाहे. अमेरिकेतून जगातील एकूण निर्यातीच्या ४० टक्के म्हणून ३.१ दशलक्ष टन कापूस निर्यात होईल. तसेच बांगलादेश हा कापसाचा सर्वांत मोठा अायातदार देश राहणार अाहे. चीनमधील कापसाच्या साठ्यात १.७ दशलक्ष टनांनी घट होणार अाहे. मात्र, इतर देशांतील कापूससाठा १.८५ दशलक्ष टनांनी वाढणार असल्याचे समितीने म्हटले अाहे.
 
जागतिक कापूस पुरवठा अंदाज (दशलक्ष टनांमध्ये)
 
वर्ष २०१५-१५ २०१६-१७ २०१७-१८
उत्पादन २१.४८ २३.०५ २५.३८
वापर २४.१८ २४.५६ २५.२२
अायात ७.५७ ८.०० ७.९३
निर्यात ७.५५ ८.१५ ७.९३
शिल्लक साठा २०.२४ १८.५५ १८.७०

स्रोत ः अांतरराष्ट्रीय कापूस सल्लागार समिती

 

टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
परभणीत प्रतिक्विंटल टोमॅटो १२०० ते १८००...परभणी ः येथील कृषी उत्पन्न बाजार...
आयुर्वेदिक रेसिपींच्या आस्वादासाठी...पुणे ः आयुर्वेदात उल्लेख असलेल्या...
परभणी जिल्ह्यात कृषी विभागातील ३१ टक्के...परभणी ः परभणी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी...
वाटाणा लागवड कधी करावी?वाटाणा लागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगल्या...
नागपूर ३६.४ अंशांवरपुणे : राज्यातील काही भागांत कमाल तापमानात वाढ...
कोल्हापुरात भाजीपाल्याचे दर वधारलेकोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
जळगावात उडदाची आवक घटलीजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत आठवड्यात...
नाशिकला टोमॅटोची आवक निम्म्याने घटलीनाशिक : नाशिक जिल्ह्यात ऑक्‍टोबरच्या पहिल्या...
उत्पादकता घटल्याने फूल मार्केटमध्ये...नागपूर : परतीच्या पावसाचा फटका बसल्याने या वर्षी...
मंचर बाजार समितीत कटतीद्वारे लूटपुणे : पालेभाज्यांसाठी आणि विशेषतः काेथिंबीरीसाठी...
नांदेड विभागात ३३ कारखान्यांच्या...परभणी : नांदेड विभागातील ५ जिल्ह्यांतील ३३ साखर...
समृद्धी महामार्गाच्या विरोधाची धार...घोटी, जि. नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
तापमान पुन्हा वाढू लागलेपुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील बहुतांशी...
कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पाटण, जि. सातारा ः कोयना धरण पाणलोट क्षेत्रात...
सांगलीत ज्वारीच्या कणसांना दाणेच आले... सांगली : कृषी विभागाने शेतकऱ्यांना वाटप...
केळीवरील करपा निर्मूलनासाठी अनुदान... जळगाव : केळी पिकावर सातत्याने करप्याचा...
परतीच्या पावसाने रब्बी पेरणीचा खोळंबा परभणी : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांमध्ये...
शिरूर तालुक्यातील पिकांचे पावसामुळे... रांजणगाव सांडस, जि. पुणे : शिरूर तालुक्यातील...
जळगाव जिल्ह्यात हरभऱ्याचे क्षेत्र... जळगाव :  जिल्ह्यात मागील चार ते पाच...
संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाचे सोधी...वाशीम : संयुक्त राष्ट्रसंघाच्या वतीने राबविण्यात...