agriculture news in marathi, glyphosate ban is Harmful, Maharashtra | Agrowon

‘ग्लायफोसेट’ बंदी नुकसानकारक : अनिल घनवट
टीम अॅग्रोवन
रविवार, 2 सप्टेंबर 2018

पुणे ः ‘ग्लायफोसेट’ या तणनाशकावर बंदी घालण्याची मागणी जगात व भारतातही जोर धरत आहे. तथापि मजूरसमस्येवर पर्याय असलेल्या, स्वस्त व प्रभावी अशा या तणनाशकावर बंदी आल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल. शेतकरी संघटनेचा ‘ग्लायफोसेट’वरील बंदीला विरोध असून, सरकारने बंदीचा निर्णय घेऊ नये, असे लेखी निवेदन शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी केंद्र तसेच राज्य सरकारच्या कृषिमंत्र्यांना दिले आहे.

पुणे ः ‘ग्लायफोसेट’ या तणनाशकावर बंदी घालण्याची मागणी जगात व भारतातही जोर धरत आहे. तथापि मजूरसमस्येवर पर्याय असलेल्या, स्वस्त व प्रभावी अशा या तणनाशकावर बंदी आल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल. शेतकरी संघटनेचा ‘ग्लायफोसेट’वरील बंदीला विरोध असून, सरकारने बंदीचा निर्णय घेऊ नये, असे लेखी निवेदन शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी केंद्र तसेच राज्य सरकारच्या कृषिमंत्र्यांना दिले आहे.

श्री. घनवट यांनी निवेदनात म्हटले आहे, की गेल्या अनेक वर्षांपासून जगात व भारतातही ‘ग्लायफोसेट’ या तणनाशकाचा वापर सुरू आहे. अलीकडील काळात अन्य देशांसह भारतातही या तणनाशकावर बंदी घालण्याची मागणी जोर धरत आहे. ही बंदी अमलात आल्यास शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होणार आहे. शेतातील तण काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात मजुरांची गरज असते. परिसरातील सर्वच पिके एकाच वेळी खुरपणीस येत असतात. अशा वेळी वेळेवर मजूर न मिळाल्यामुळे तणांमुळे पिकांचे नुकसान होते. मजुरीवर जास्त खर्च होतो व पीक तोट्यात जाते. याला पर्याय म्हणूनच शेतकरी तणनाशकांचा वापर करतात.

‘ग्लायफोसेट’वरील बंदी शेतकरी, कृषी सेवा केंद्रचालक व तणनाशक उत्पादकांना मारक ठरू शकते. देशाचे अन्नधान्य उत्पादन व उत्पन्नातही त्यामुळे घट होऊ शकते. एकूण परिस्थिती लक्षात घेता शासनाने या तणनाशकावर बंदी घालण्याचा निर्णय घेऊ नये, अशी मागणी या निवेदनाद्वारे केंद्र व राज्य सरकारच्या कृषिमंत्र्यांना करण्यात आली आहे. 

प्रभावी, स्वस्त तणनाशक 
‘ग्लायफोसेट’ हे अत्यंत प्रभावी, स्वस्त तणनाशक आहे. अनेक वर्षांपासून जगभर याचा वापर केला जातो. संशोधन व आरोग्य संस्थांनी ते मानवी आरोग्यास हानिकारक नसल्याचा निर्वाळा दिला आहे. मनुष्य, जनावरे किंवा जमिनीवर त्याचा कोणताही दुष्परिणाम होत नाही. त्यामुळे ‘ग्लायफोसेट’वर बंदी घालणे म्हणजे अन्यायकारक ठरेल. 

 ‘एचटी’ रोखण्यास सरकार अपयशी 
भारतात तणनाशक सहनशील (एचटी) कपाशीच्या वाणाची बेकायदेशीर लागवड होत आहे. असे असूनही त्याची लागवड रोखण्यास अपयशी ठरल्यामुळे तणनाशकावर बंदी घालण्याचा हा सरकारचा प्रयत्न आहे. मात्र हा निर्णय शेतकऱ्यांसाठी नुकसानकारक ठरेलच; शिवाय या तणनाशकाचा काळा बाजार व बोगस तणनाशकांचा सुळसुळाट होण्यास संधी मिळेल.

 

इतर ताज्या घडामोडी
`जलयुक्त`ची कामे गतीने पूर्ण करा : डवलेबुलडाणा : जलयुक्‍त शिवार अभियानातंर्गत भूजल...
नगर जिल्ह्यात सव्वाचार लाख हेक्‍टर...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये रब्बीच्या सरासरी...
सांगलीतील मध्यम, लघू प्रकल्पांत २३...सांगली ः जिल्ह्यातील ८४ मध्यम आणि लघू प्रकल्पांत...
नगर जिल्हा परिषदेत दलालांचा सुळसुळाटनगर ः जिल्हा परिषदेत आता पहिल्यासारखी स्थिती नाही...
सोलापुरात वांगी, ढोबळी मिरची, कोबी दरात...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
रेशीम शेतकऱ्यांना सरकारचे अर्थसाह्य :...नागपूर : नव्याने रेशीम शेतीकडे वळणाऱ्या...
नाशिक जिल्हा बॅँकेच्या संचालकांच्या...नाशिक : आर्थिक अडचणीत सापडलेल्या जिल्हा मध्यवर्ती...
सोलापुरातील रस्त्याचे काम शेतकऱ्यांनी...सोलापूर : सोलापूर-विजापूर राष्ट्रीय...
योग्य वेळी करा मिरीची काढणीमिरी घोसामधील एक ते दोन मणी पिवळे अगर नारंगी...
नाशिकला वांगी, घेवडा, आले दर तेजीतनाशिक : गत सप्ताहात नाशिक बाजार समितीत बहुतांश...
बियांद्वारे मिळवता येतील भाताचे ‘क्लोन’ बियांद्वारे मिळवता येतील भाताचे ‘क्लोन’...
प्रथिनांद्वारे मिळवता येईल अधिक टिकाऊ...निसर्गातील कोळ्याच्या धाग्यापासून प्रेरणा घेत चीन...
ऊसतोडणी कामगारांच्या गावांत दुष्काळी...नगर ः जनावरे जगवण्यासाठी आणि रोजगाराच्या शोधात...
नामपूरात शेतमालाला दर, कर्जमाफीसाठी...नामपूर, जि. नाशिक : कांदा पिकासह शेतमालाचे...
वजनकाट्यात घोळ करणाऱ्यांनी लाज बाळगावीमाळेगाव, जि. पुणे ः ‘माळेगाव साखर कारखान्याचे...
कोल्हापूर जिल्ह्यास ३०० एकर तुती...कोल्हापूर : महारेशीम अभियानांतर्गत कोल्हापूर...
हमीभावाने साडेदहा हजार क्विंटल शेतीमाल...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांमध्ये...
पुणे बाजारात भाजीपाल्यांचे दर स्थिर;...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
केळी सल्लाकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान...
करडईवरील मावा किडीचे नियंत्रणकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी...