agriculture news in marathi, Goat and sheeps not allowed in fodder camps | Agrowon

भर दुष्काळात राज्यातील शेळ्या-मेंढ्या वाऱ्यावर
सूर्यकांत नेटके
रविवार, 24 मार्च 2019

नगर ः दुष्काळी भागातील जनावरे जगवण्यासाठी छावण्या सुरू केल्या, मात्र शेतकऱ्यांना मोठा आधार असलेल्या शेळ्या-मेंढ्यासाठी कुठल्याही उपाययोजना केल्या नाहीत. शासनाने २एप्रिल २०१० साली काढलेल्या अध्यादेशानुसार जनावरांसोबत शेळ्या-मेंढ्यांच्या छावण्या सुरू करता येत होत्या. मात्र नव्याने यंदा काढलेल्या अध्यादेशात तो आदेशही रद्द केला आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत राज्याच्या दुष्काळी भागातील सुमारे ५२ लाख शेळ्या-मेंढ्यांना मात्र वाऱ्यावर सोडल्यासारखेच झाले आहे. 

नगर ः दुष्काळी भागातील जनावरे जगवण्यासाठी छावण्या सुरू केल्या, मात्र शेतकऱ्यांना मोठा आधार असलेल्या शेळ्या-मेंढ्यासाठी कुठल्याही उपाययोजना केल्या नाहीत. शासनाने २एप्रिल २०१० साली काढलेल्या अध्यादेशानुसार जनावरांसोबत शेळ्या-मेंढ्यांच्या छावण्या सुरू करता येत होत्या. मात्र नव्याने यंदा काढलेल्या अध्यादेशात तो आदेशही रद्द केला आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत राज्याच्या दुष्काळी भागातील सुमारे ५२ लाख शेळ्या-मेंढ्यांना मात्र वाऱ्यावर सोडल्यासारखेच झाले आहे. 

राज्याच्या बहुतांश भागात दुष्काळ तीव्र आहे. शेतीत काहीच पिकलेले नाही. त्यापेक्षा गंभीर बाब म्हणजे मात्र सध्या फक्त जनावरांच्या चाऱ्याचा आणि पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. त्यामुळे ग्रामीण भागात शेतकऱ्यांना जनावरे जगवताना कसरत करावी लागत आहे. दुष्काळाची तीव्रता पाहून बऱ्याच भागात जनावरांच्या छावण्या सुरु केलेल्या आहेत. त्यामुळे काही प्रमाणात पशुपालकांना दिलासा मिळाला असला तरी शेळ्या-मेढ्यांचे पालक मात्र चिंतेत आहेत

घरातील अतिमहत्त्वाच्या वेळी आर्थिक अडचण दूर करण्यासाठी शेळी फायदेशीर ठरत असल्याने ग्रामीण भागात नव्वद टक्के शेतकरी कुटुंबे शेळीपालन करतात. काही भागांत मेंढ्यांचे प्रमाणही बऱ्यापैकी आहे. शेतीला जोड असलेल्या शेळीपालनामुळे अनेक कुटुंबे सावरली असल्याने शासनानही शेळीपालनाचे प्रमाण वाढावे यासाठी महत्त्वाच्या योजना राबवत आहे. त्यासाठी शासनाचे शेळी-मेंढी महामंडळही कार्यरत आहे. अनेक ठिकाणी बेरोजगार युवकांनी बंदिस्त शेळीपालनाचा व्यवसाय सुरु केलेला आहे. यंदाच्या तीव्र दुष्काळात मात्र शेळी पालनावर मोठे संकट आले आहे. शेळ्य- मेंढ्या जगवण्यासाठी शासन पातळीवर जनावरांप्रमाणेच काही तरी उपाययोजना होणे गरजेचे होते. मात्र कसल्याही उपाययोजना केल्याचे अजून तरी दिसत नाही. 

शासनाने छावण्या सुरू करण्यासंदर्भात सर्वप्रथम काढण्यात आलेल्या २ एप्रिल २०१० च्या अध्यादेशानुसार शेळ्या-मेंढ्याच्या छावण्या सुरू करता येत होत्या. मात्र प्रती शेळी, मेंढी पाच रुपये अनुदान दिले जाईल, असे उल्लेखित होते. त्यानंतर त्या अध्यादेशात बदल करून २५ जानेवारी २०१९  व १३ फेब्रुवारी २०१९ ला काढलेल्या अध्यादेशात सर्वच बाबीत बदल केला. त्यात शेळ्या-मेढ्यांच्या उपाययोजना बाबत काहीही उल्लेख नाही. त्यामुळे सद्यः स्थितीत तरी शेळ्या-मेंढ्या जगवण्याबाबत राज्यात कुठेही उपाययोजना नसल्याने शेळी, मेंढी पालक भर दुष्काळात शासनाने सध्या तरी वाऱ्यावर सोडल्याची स्थिती आहे. शेळी-मेंढी महामंडळानेही उपाययोजनांसाठी पुढाकार घेतल्याचे दिसत नाही. राज्यात शेळ्यांची संख्या सुमारे तीस ते बत्तीस लाख तर मेंढ्यांची संख्या २२ लाखाच्या घरात आहे. नगरमध्ये शेळ्यांची संख्या ७ लाख ९२ हजार तर मेंढ्यांची संख्या ३ लाख ६१ हजार एवढी आहे. 

तीन किलो चारा आवश्यक
आवश्यकतेनुसार मोठ्या जनावरांना पंधरा किलो, तर लहान जनावराला साडेसात किलो चारा देण्याचा नियम आहे. शेळ्या-मेंढ्यांनाही चाऱ्याची मोठ्या प्रमाणात गरज भासत आहे. पशुसंवर्धन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार एका शेळी-मेंढीला साधारण तीन किलो चारा देणे गरजेचे आहे. शासनाच्या जुन्या अध्यादेशानुसार शेळ्या-मेंढ्यांच्या छावण्या सुरू करता येत होत्या. मात्र त्यासाठी प्रत्येक शेळी-मेंढीसाठी फक्त पाच रुपये अनुदान होते. त्यामुळे शासनाने अध्यादेशात छावण्या सुरू करण्याबाबत नियम केला असला तरी कमी अनुदानामुळे शेळ्या-मेंढ्यांच्या छावण्या सुरूच झाल्या नाहीत. २०१५ च्या दुष्काळात आखतवाडे (ता. शेवगाव) येथे शेळ्या-मेंढ्याच्या छावण्या सुरू करण्यासाठी प्रस्ताव आला होता. मात्र कमी अनुदान असल्यामुळे तेथे छावणी सुरूच झाली नाही. राज्यात शेळ्यांची संख्या सुमारे तीस ते बत्तीस लाख तर मेंढ्यांची संख्या २२ लाखांच्या घरात आहे.  

शेळ्या जगवताना शेतकऱ्यांची मोठी कसरत सुरू आहे. चारा मिळत नसल्याने जोपासणे अवघड झाले आहे. राज्यातील शेळ्या-मेंढ्याची संख्या मोठी असताना सरकारने त्या जगवण्यासाठी आजिबात त्यासाठी प्रयत्न केल्यानेच दिसत नाही. त्यामुळे शेळ्या-मेंढया पालक हतबल आहेत.
- काशिनाथ अनभुले, शेळीपालक, घुमरी, ता. कर्जत, जि. नगर

इतर अॅग्रो विशेष
हमीभाव वाढीचा बागुलबुवा आणि वास्तवलोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये शेतकऱ्यांच्या...
‘कॅप्सूल’ सुधारणार मातीचे आरोग्यमहाराष्ट्र राज्यासाठी या वर्षी रासायनिक खतांची...
नागपूर : रब्बीची पैसेवारी काढली खरीप...नागपूर : खरीप आणि रब्बी हंगामात वेगवेगळी पिके...
अॅग्रोवन समृद्ध शेती योजनेचे...नांदेड: `अॅग्रोवन’च्या माध्यमातून...
मराठवाड्यातील २९२ लघुप्रकल्प कोरडेऔरंगाबाद : मराठवाड्यातील ७४९ लघुप्रकल्पांपैकी २९२...
दक्षिण आशियात यंदा सर्वसामान्य मॉन्सून...पुणे  : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या...
कृषिउद्योग महामंडळाकडून ‘बायोकॅप्सूल’चा...पुणे : सेंद्रिय शेतीकडे वळालेल्या शेतकऱ्यांच्या...
शासन दरबारी रब्बी हंगामात नागपूर...नागपूर  : खरिपानंतर पाण्याअभावी रब्बी...
बीटी बियाणे १५ मेपूर्वी विक्रीस मनाईपुणे : राज्यातील बियाणे उत्पादक कंपन्यांनी १५...
जमिनीचे जैविक पृथक्करणआजकाल शेतकऱ्यांना मातीचा पृथक्करण अहवाल करून...
सांगलीतून १२ टन द्राक्षे निर्यातसांगली ः यंदा प्रतिकूल परिस्थतीतही जिल्ह्यातील...
काळजी घ्या : उन्हाच्या झळा वाढल्यापुणे : उन्हाच्या झळा वाढल्याने विदर्भ,...
शून्यातून राऊत दांपत्याने उभारली...लातूर जिल्ह्यात नागरसोगा (ता. औसा) येथील राऊत...
संत्रा बागेत काटेकोर पाणी व्यवस्थापन संत्रा पिकात पाणी व्यवस्थापन अत्यंत चोख ठेवावे...
दक्षिण अशियात मॉन्सूनचा पाऊस सरासरी...पुणे : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या बहुतांशी...
विश्वासावर बहरेल व्यापारचीन-अमेरिकेमध्ये चालू असलेल्या व्यापार युद्धाच्या...
निवडणुकीने दुष्काळ खाऊन टाकू नये म्हणून...लोकसभेच्या निवडणुकीमुळे राजकीय हवामान-बदल होत...
उपलब्ध पाण्याचे गणित मांडा...अनेक कारणांमुळे जलसंधारण ही सोपी वाटणारी म्हणून...
उत्कृष्ठ कारली पिकवण्यात पाटील यांचा...लोणी (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील भरत, गणेश व...
पेरू, अॅपलबेरमधून पीक बदल, कष्टातून...पारंपरिक शेती पद्धतीत बदल करून व सेंद्रिय...