agriculture news in Marathi, Godown seal over Suspiciously production of bogus seed, Maharashtra | Agrowon

बोगस बियाणे निर्मितीच्या संशयावरून गोदाम सील
टीम अॅग्रोवन
रविवार, 10 डिसेंबर 2017

बुलडाणा : नांदुरा तालुक्यात राष्ट्रीय महामार्गावर धानोरानजीक असलेल्या महिको बियाणे कंपनीत बोगस बियाण्याची निर्मिती होत असल्याच्या संशयावरून पोलिसांनी गाेदाम तात्पुरते सील केल्याची घटना शुक्रवारी (ता. ८) रात्री १०.३० वाजता घडली असून, रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती.

बुलडाणा : नांदुरा तालुक्यात राष्ट्रीय महामार्गावर धानोरानजीक असलेल्या महिको बियाणे कंपनीत बोगस बियाण्याची निर्मिती होत असल्याच्या संशयावरून पोलिसांनी गाेदाम तात्पुरते सील केल्याची घटना शुक्रवारी (ता. ८) रात्री १०.३० वाजता घडली असून, रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती.

राज्यात बोगस बियाण्यांच्या तक्रारी होत असताना कृषी विभागाकडून या बोगस बियाणे कंपन्यांची पाठराखण केली जात असल्याने शेतकरीवर्गाचे या माध्यमातून मोठे नुकसान होत आहे, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. नांदुरा तालुक्यातील धानोरा येथील या महिको कंपनीतही बोगस बियाणे तयार केले जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली असता खामगावचे अप्पर पोलिस अधीक्षक श्याम घुगे यांच्या नेतृत्वातील पथकाने रात्री १०.३० दरम्यान कंपनीत धाड टाकली व या कंपनीला तात्पुरते सील केले. बुलडाणा व खामगाव पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली असून कृषी विभागाच्या मदतीने बियाण्यांचे नमुने तपासले जात आहेत.

जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. सुरवातीच्या कारवाईत पोलिसांनी आम्हाला सहभागी करून घेतले नसल्याची खंत कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. नेहमीप्रमाणे कामावर येणाऱ्या कामगारांनाही पोलिसांनी आत जाऊ दिले नाही. गोपनीय माहितीच्या आधारे या कंपनीला तात्पुरते सील लावण्यात आले असून पुढील तपास सुरू असल्याचे अप्पर पोलिस अधीक्षक श्याम घुगे यांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
...तर जिनिंग मिल मालकांविरोधात कारवाई ः...वर्धा   ः गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी...
अकोले तालुक्‍यात पावसाचा जोर कायमनगर  : अकोले तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात...
स्वाभिमानीचा सर्जिकल स्ट्राईक,...कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून...
सातारा जिल्ह्यात दूध दरप्रश्नी तिसऱ्या...सातारा   ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेने...
संतश्रेष्ठ तुकोबाराय पालखीचे सोलापूर...सोलापूर : पिटू भक्तिचा डांगोरा । कळिकाळासी दरारा...
कोयना, कण्हेर धरणांतून विसर्गसातारा : जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. बुधवारी...
कर्नाटकातून येणारे दूध आंदोलकांनी अडवलेसोलापूर :  दुधाच्या वाढीव दरासाठी स्वाभिमानी...
किणी टोल नाका येथे पोलिसांची जबरदस्ती;...कोल्हापूर- : स्वाभिमानीने शेतकरी संघटनेने पुणे...
कनिष्ठ सहायकाची एक वेतनवाढ बंदनाशिक  : जिल्हा परिषदेची सभा असो की मुख्य...
भेंडीची वेळेवर लागवड आवश्यकभाजीपाला पिकांमध्ये भेंडी पिकाची लागवड वाढत आहे....
दूध दरप्रश्‍नी राज्य सरकार दोषी : राज...पुणे  ः दूधदराचा प्रश्न गंभीर होत आहे....
पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये १०६ टीएमसी...पुणे  : जिल्ह्यातील पश्‍चिम भागात असलेल्या...
बुलडाणा, वाशीममध्ये दूध दरप्रश्‍नी...अकोला  ः दुधाला प्रतिलिटर पाच रुपये दर...
पोषक घटकांनीयुक्त शेळीचे दूधभारतामध्ये प्रामुख्याने गायीच्या व म्हशीच्या...
मराठवाड्यात तिसऱ्या दिवशीही दूध...औरंगाबाद : दूध दरावरून पुकारल्या गेलेल्या...
कोल्हापुरात हिंसक वळणकोल्हापूर : दूध आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी...
चंद्रकांतदादांच्या आश्वासनानंतर उपोषण...परभणी  ः पीकविमा परताव्यापासून वंचित...
शेतकऱ्यांना बोंड अळीची नुकसानभरपाई...नाशिक  : गेल्या वर्षी बोंड अळीमुळे कापूस...
खानदेशात ८० टक्के पेरणी उरकलीजळगाव : खानदेशात जवळपास ८० टक्के क्षेत्रावर पेरणी...
हाँगकाँग येथे जांभळ्या रताळ्यापासून...हाँगकाँग येथील एका खासगी साखळी हॉटेल उद्योगाने...