agriculture news in marathi, godown shortage for tur storage in latur region, maharashtra | Agrowon

लातूर विभागातील गोदामांत तूर साठवणुकीसाठी जागा अपुरी
टीम अॅग्रोवन
सोमवार, 5 मार्च 2018
परभणी : राज्य वखार महामंडळाच्या लातूर विभागांतर्गत पाच जिल्ह्यांतील १४३ गोदामांमध्ये गतवर्षीची तूर तसेच यंदा खरेदी करण्यात आलेले सोयाबीन, मूग, उडीद पडून आहे. त्यामुळे सध्या या गोदामांमध्ये ५६ हजार २०० क्विंटल तूर साठविता येईल एवढीच जागा शिल्लक राहिली आहे. वखार मंडळाच्या गोदामांत जागा शिल्लक नसल्यामुळे तूर साठविण्यासाठी खासगी गोदामे भाडेतत्त्वावर घेतली आहेत, असे सूत्रांनी सांगितले.
 
परभणी : राज्य वखार महामंडळाच्या लातूर विभागांतर्गत पाच जिल्ह्यांतील १४३ गोदामांमध्ये गतवर्षीची तूर तसेच यंदा खरेदी करण्यात आलेले सोयाबीन, मूग, उडीद पडून आहे. त्यामुळे सध्या या गोदामांमध्ये ५६ हजार २०० क्विंटल तूर साठविता येईल एवढीच जागा शिल्लक राहिली आहे. वखार मंडळाच्या गोदामांत जागा शिल्लक नसल्यामुळे तूर साठविण्यासाठी खासगी गोदामे भाडेतत्त्वावर घेतली आहेत, असे सूत्रांनी सांगितले.
 
राज्य वखार महामंडळाच्या लातूर विभागांतर्गत परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. परभणी जिल्ह्यात सर्वाधिक ४४ गोदामे असून, त्यांची साठवण क्षमता ६९ हजार १३० मेट्रिक टन आहे. हिंगोली जिल्ह्यात २० गोदामे असून त्यांची साठवण क्षमता २९ हजार ४०० मेट्रिक टन आहे. नांदेड जिल्ह्यात ३२ गोदामे असून त्यांची साठवण क्षमता ५० हजार २१६ मेट्रिक टन आहे.
 
लातूर जिल्ह्यात ३९ गोदामे असून त्यांची साठवण क्षमता ८८ हजार ५२० मेट्रिक टन आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात ८ गोदामे असून, त्यांची साठवण क्षमता १३ हजार मेट्रिक टन आहे. या पाच जिल्ह्यांमध्ये  एकूण १४३ गोदामे असून त्यांची एकूण साठवण क्षमता २ लाख ५० हजार १९६ मेट्रिक टन (२५ लाख क्विंटल १ हजार ९६० क्विंटल) आहे.
 
सध्या या गोदामांमध्ये १२ लाख ६३ हजार २४० क्विंटल तूर, ८ हजार ५०० क्विंटल मूग, ४८ हजार १४० क्विंटल उडीद, ७३ हजार ९७० क्विंटल सोयाबीन साठविण्यात आलेले आहे. तसेच या गोदामांमध्ये सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत गहू, तांदूळ साठविलेला आहे. त्यामुळे सध्या परभणी जिल्ह्यातील गोदामामध्ये ६ हजार, हिंगोली जिल्ह्यात २५ हजार, नांदेड जिल्ह्यात २१ हजार ४००, लातूर जिल्ह्यात २६ हजार आणि उस्मानाबाद जिल्ह्यात ३०० क्विंटल अशा १४३ गोदामांमध्ये ५६ हजार २०० क्विंटल तूर साठवण क्षमता राहिली आहे.
 
वखार महामंडळाच्या गोदामात जागा नसल्यामुळे सध्या अनेक ठिकाणच्या खरेदी केंद्रांवर तूर पडून आहे. नाफेड तसेच संबंधित यंत्रणेमार्फत शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात आलेली तूर वखार महामंडाळाच्या गोदामात साठविल्यानंतरच संबंधित शेतकऱ्यांना चुकारे अदा केले जातात.
 
परभणी येथे तालुका खरेदी विक्री संघामार्फत बाजार समिती परिसरातील अग्निशामक बंबासाठी उभारण्यात आलेल्या निवाऱ्यामध्ये तूर खरेदी केली जात आहे. त्या ठिकाणी एक चाळणी, एक वजन काटा सुरू आहे. जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे दुसरी चाळणी, वजन काटा सुरू करता येत नाही. 
 
दरम्यान, वखार महामंडळाच्या गोदामात जागा नसल्यामुळे खासगी किंवा बाजार समित्यांचे गोदाम भाडेतत्त्वावर घेतले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

इतर ताज्या घडामोडी
जळगावात दादरला ३१०० रुपयांपर्यंत दरजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दादरची (...
भारतीयांच्या पचनसंस्थेतील...भारतीय लोकांच्या पचनसंस्थेमध्ये कार्यरत...
अमरावती विभागाला पाणीटंचाईच्या झळाबुलडाणा : कमी पावसामुळे अमरावती विभागातील...
तूर विक्रीच्या नोंदणीकडे शेतकऱ्यांची...अकोला  : या हंगामात शेतकऱ्यांनी पिकविलेल्या...
शेतकरी, जवान अडचणीत : भुजबळनाशिक : सध्याच्या सरकारच्या काळात देशातील...
दुष्काळात खचू नका, शासन पाठीशी :...सोलापूर : दुष्काळी परिस्थितीमुळे पाणी,...
शेतकऱ्यांच्‍या थकवलेल्या पैशांची...पुणे ः शेतीमालाचा लिलाव झाल्यानंतर २४ तासांत पैसे...
नगर जिल्हा परिषदेचा यंदा ४४ कोटी...नगर : जिल्हा परिषदेत सोमवारी झालेल्या सर्वसाधारण...
नांदेड परिमंडळात सौर कृषिपंप योजनेसाठी...नांदेड ः मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेअंतर्गत...
शेतीमाल तारण योजनेत ४०६ शेतकऱ्यांनी...औरंगाबाद : मराठवाड्यातील जालना, परभणी व हिंगोली...
ऊस उत्पादक शेतकरी देणार शहिदांच्या...कोल्हापूर : पुलवामा जिल्ह्यातील दहशतवादी हल्ल्यात...
तूर खरेदीतील अनागोंदीविरुद्ध आंदोलनअकोला  ः जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यात...
'पुलवामा'चा सूत्रधार काश्‍मीरमध्येच?नवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा...
उन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापनउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल,...
केम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवीअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व...
‘पेंच’ लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना १३...नागपूर : मध्य प्रदेशातील चौराई प्रकल्पामुळे पेंच...
‘एसटी’साठी जागा आठ हजार अन्‌ अर्ज ४१...सोलापूर : राज्य परिवहन महामंडळात चालक व...
दररोजचा दोनशे टन द्राक्षपुरवठा ठप्पपिंपळगाव बसवंत, जि. नाशिक : जम्मू-काश्‍...
'देशात आयात होणाऱ्या सोयाबीनवर बंदी...पुणे : देशांतर्गत दर वाढत असल्याने...
बांबू उत्पादन, गुंतवणूक संधीसाठी...मुंबई : देशातील बांबू लागवडीला चालना देण्याबरोबरच...