नांदेड, परभणी, हिंगोलीतील वखार महामंडळाची गोदामे फुल

नांदेड, परभणी, हिंगोलीतील वखार महामंडळाची गोदामे फुल

परभणी : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील राज्य वखार महामंडळाच्या मालकीच्या ९० गोदामांची साठवण क्षमता संपली आहे. त्यामुळे या तीन जिल्ह्यांत वखार महामंडळाने १८ खासगी गोदामे भाडेतत्त्वावर घेण्यात आली आहेत. परंतु भाडेतत्त्वावरील गोदामेदेखील अर्ध्याहून अधिक भरली आहेत. त्यामुळे शासकीय खरेदी केंद्रावरील तूर आणि हरभरा साठवणीचा प्रश्न निर्माण झाला आहे.  वखार महामंडळाच्या गोदामातील माल उचलला जात नाही तोपर्यंत साठवणीच्या अडचणी कायम राहणार आहेत. अन्यथा आणखी काही गोदाम भाडेतत्त्वावर घ्यावे लागणार आहेत. राज्य वखार महामंडळाचे नांदेड जिल्ह्यात ३१, परभणी जिल्ह्यात ३९, हिंगोली जिल्ह्यात २० असे तीन जिल्ह्यांत एकूण ९० गोदामे आहेत. या गोदामांची साठवण क्षमता १ लाख ३९ हजार ९११ टन आहे. सध्या या गोदामांमध्ये नाफेडतर्फे खरेदी करण्यात आलेला मूग, सोयाबीन, उडीद, तूर मिळून एकूण ९६ हजार ६७२ टन माल पडून आहे. त्याचप्रमाणे सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गतचा तांदूळ आणि गहू मिळून एकूण १८ हजार ८७० टन माल साठविलेला आहे.

वखार महामंडळ गोदामे स्थिती (साठवण टन)

जिल्हा गोदाम संख्या साठवण क्षमता प्रत्यक्ष साठा
नांदेड ३१ ४९३८१ ५१०६५
परभणी ३९ ६११३० ५९९८५
हिंगोली २० २९४०० २८१८९
खासगी भाडेतत्त्वावरील गोदाम स्थिती (साठवण टन)
नांदेड ७४३५ २७५५
परभणी १० १०७८० ८८९२
हिंगोली ५००० ४०९८

शेतकऱ्यांनी साठविलेला १ हजार ७९५ टन शेतीमालदेखील साठविलेला आहे. वखार महामंडाळाच्या मालकीच्या तीन जिल्ह्यांतील गोदामांची साठवण क्षमता १ लाख ३९ हजार ९११ टन असताना या गोदामांमध्ये प्रत्यक्षात १ लाख ३९ हजार १४९ टन शेतीमाल साठविण्यात आला आहे. काही ठिकाणी क्षमतेपेक्षा जास्त माल साठविण्यात आला आहे.  वखार महामंडळाची गोदामे हाउसफुल झाल्यामुळे नांदेड जिल्ह्यात ३, परभणी जिल्ह्यात १० आणि हिंगोली जिल्ह्यात ५ असे एकूण १८ खासगी गोदामे भाडेतत्त्वावर घेण्यात आली आहेत. या गोदामांची साठवण क्षमता २३ हजार २१५ टन आहे. या गोदामांमध्ये सध्या १५ हजार ७४५ टन माल साठविण्यात आला आहे. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात ५७ हजार ९४  क्विंटल तूर आणि १० हजार ९४८ क्विंटल हरभरा असा ६८ हजार ८९० क्विंटल शेतीमाल खरेदी केंद्रावर पडून आहे.  नांदेड जिल्ह्यातील केंद्रावर हजारो क्विंटल तूर आणि हरभरा पडून आहे. भाडेतत्त्वावरील गोदामाची साठवण क्षमता संपत चालली आहे. त्यामुळे वखार महामंडाळाच्या गोदामातील माल उचलला तर जागा उपलब्ध होईल, अन्यथा आणखीन खासगी गोदाम भाडेतत्त्वावर घ्यावी लागणार आहेत.  अन्यथा चुकारे थकतील शासकीय खरेदी केंद्रावर खरेदी करण्यात आलेला शेतीमाल वखार महामंडाळाकडे जमा केला जात नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांना चुकारे अदा करता येत नाहीत. त्यामुळे गोदामांची व्यवस्था करावी लागणार आहे. अन्यथा चुकाऱ्यांसाठी खूप दिवस प्रतीक्षा करावी लागेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com