agriculture news in marathi, Gokul dairy reduces two rupees in milk purchase | Agrowon

‘गोकुळ’कडून गाईच्या दूधदरात दोन रुपयांची कपात
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 21 जून 2018

कोल्हापूर : दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हितापेक्षा स्वहिताला प्राधान्य देत अखेर कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाने (गोकुळ) गाईच्या दूध खरेदी-विक्री दरात दोन रुपयांची कपात केली आहे. आज (ता. २१)पासून याची अंमलबजावणी होणार आहे. 

‘गोकुळ''मध्ये मंगळवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला. त्यामुळे गाईच्या दुधाचा प्रतिलिटर दर २५ रुपयांवरून २३ रुपये, तर विक्री दर ४४ रुपयांवरून ४२ रुपये होणार आहे. संघाने कार्यक्षेत्राबाहेरील प्रतिलिटर दूध खरेदीदर १८ रुपये करण्याचा निर्णयही या वेळी घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी अध्यक्ष विश्‍वास पाटील होते. 

दुधाला दर मिळावा यासाठी राज्यभर शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. हे आंदोलन शांत होते न होते तोवरच दूध कपातीचा निर्णय घेतल्याने राज्यभर याचे पडसाद उमटण्याची शक्‍यता आहे. शेतकरी आंदोलनाची दखल घेत शासनाने गाय व म्हैशीच्या दूध खरेदीदरात वाढ केली. सरकारच्या निर्णयामुळे गाईचा दूध खरेदीदर प्रतिलिटर २५ वरून २७ रुपये, तर म्हशीचा दुधाचा दर ३४ रुपयांवरून ३६ रुपये झाला. मात्र एक महिन्याच्या आतच राज्यातील दूध संघांनी दरकपात करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ‘गोकुळ''नेही दरकपात जाहीर केली आहे. पश्चिम महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या गोकुळनेच खरेदी- विक्री दरात २ रुपये कमी केल्याने आता इतर दूध संघ ही या दूध संघाची री ओढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

इतर ताज्या घडामोडी
सावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर ! कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...
धुळे, जळगाव जिल्ह्यांतील पैसेवारी चुकीचीजळगाव   ः धुळे व जळगाव जिल्ह्यांत हवा तसा...
नैसर्गिक आपत्तीत यवतमाळमधील ६२ हजार...यवतमाळ   ः जिल्ह्यात या वर्षी आलेल्या...
पुणे जिल्‍ह्यात पावसाच्या हलक्या ते...पुणे : पावसाच्या मोठ्या खंडानंतर जिल्ह्याच्या...
नगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावटनगर  ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी फक्त ६५.५५...
बुलडाणा येथे २ आॅक्टोबरला सोयाबीन-कापूस...बुलडाणा   : पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादक...
उसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी ‘आंदोलन...कोल्हापूर : उसाचा दुसरा हप्ता मिळावा व १५ टक्के...
कोल्हापूर येथे १० ऑक्‍टोबरला ऊस परिषद...कोल्हापूर  : सरकारने एफआरपीचे तुकडे करून...
बंद अवस्थेतील कारखाने सहकारी तत्त्वावर...जळगाव : जिल्ह्यात काही साखर कारखाने एकेकाळी जोमात...
कांदा - लसूण पीक सल्लाबहुतांश शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खरीप कांदा पिकाची...
नांदेड जिल्ह्यात ५१० कोटी रुपये पीक...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...
अंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...