agriculture news in marathi, The 'Gokul' have challenge of maintaining credibility | Agrowon

'गोकुळ'समोर विश्‍वासार्हता टिकविण्याचे आव्हान
राजकुमार चौगुले
बुधवार, 29 नोव्हेंबर 2017

कोल्हापूर : पश्‍चिम महाराष्ट्रातील लाखो दूध उत्पादकांचा आधार असलेले कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ) शेतकऱ्यांच्या संसाराचा आधार आहे. पण गेल्या काही दिवसांपासून याच ‘गोकुळ’च्या प्रश्‍नावरून जिल्ह्यातील दोन पारंपरिक विरोधक एकमेकाला भिडले आहेत.

या दोघांकडून राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी गोकुळच्या व्यवस्थापनाचा वापर करून घेतला जात आहे. यामुळे दूध प्रश्‍नावरून चर्चेत असणारा हा संघ आता राजकीय टीका टीप्पणीवरून कुप्रसिद्ध असून अशा स्थितीत गोकुळसमोर विश्वासार्हता टिकविण्याचे आव्हान आहे.

कोल्हापूर : पश्‍चिम महाराष्ट्रातील लाखो दूध उत्पादकांचा आधार असलेले कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ) शेतकऱ्यांच्या संसाराचा आधार आहे. पण गेल्या काही दिवसांपासून याच ‘गोकुळ’च्या प्रश्‍नावरून जिल्ह्यातील दोन पारंपरिक विरोधक एकमेकाला भिडले आहेत.

या दोघांकडून राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी गोकुळच्या व्यवस्थापनाचा वापर करून घेतला जात आहे. यामुळे दूध प्रश्‍नावरून चर्चेत असणारा हा संघ आता राजकीय टीका टीप्पणीवरून कुप्रसिद्ध असून अशा स्थितीत गोकुळसमोर विश्वासार्हता टिकविण्याचे आव्हान आहे.

दरम्यान एकमेकांची जिरवण्यासाठी गोकुळचा कारभार ‘लक्ष्य’ केला जात आहे. यावरून संघात होणाऱ्या भ्रष्टाचाराचेही जाहीर धिंडवडे काढले जात आहेत. यामुळे सामान्य दूध उत्पादक व्यथितच होत आहे. माजी आमदार महादेवराव महाडिक यांची एकहाती सत्ता असलेला गोकुळचा दूध संघ. तर त्यांचे कट्टर विरोधक असलेले माजी मंत्री व विद्यमान आमदार सतेज पाटील यांच्यात हा संघर्ष सुरू आहे.

इतर राजकीय गोष्टींचे भांडवलापेक्षा गोकुळचा कारभारच या दोघांच्या सत्तासंघर्षात केंद्रस्थानी आला आहे. याच प्रश्‍नावरून सतेज पाटील यांनी सोमवारी हजारो शेतकऱ्यांचा मोर्चा गोकुळवर काढून ताकद दाखविण्याचा प्रयत्न केला. पण या मोर्चाला केराची टोपली दाखवत गोकुळच्या व्यवस्थापनाने त्याला सामोरे न जाण्याची भूमिका घेत उत्पादकांच्या प्रश्‍नापेक्षा राजाकरण किती महत्त्वाचे, याची प्रचिती दिली.
शिळ्या कढीला नवा ऊत गोकुळमधील भ्रष्टाचार नवा नाही.

‘तळे राखील तो पाणी चाखील’ या उक्तीप्रमाणे जो संचालक होतो. तो पहिल्यांदा स्वत:च फायदा करून घ्यायला पाहतो. विविध कामासांठी स्वत:चे टेंडर भरणे, नातेवाइकांची टॅंकर दूध संघासाठी वापरून फायदा करून देणे, संचालकांना नियमित पाकिटे पोच होणे, गोकुळच्या पैशावर एेषोआरामात आयुष्य जगणे, यामध्ये अनेक संचालकांनी कुप्रसिद्धी मिळविली आहे. काही जाणकार संचालक वगळता व्यवस्थापनात सुधारणेपेक्षा केवळ संचालक होऊन लाभ मिळविण्याचाच प्रयत्न राहिला आहे.

काही निर्णय ‘तेरी भी चूप मेरी भी चूप’ अशा पद्धतीने होतात. तर काही निर्णयाबाबत मतभेद झाले, की ते वृत्तपत्रापर्यंत पोचवून एकमेकांच्यावर कडी करण्याचा प्रयत्न केला जातो. अशा कारभारातूनच आता सतेज पाटील यांच्या रूपाने एक नवा विरोधक सामोरा आला आहे.त्यामुळे गोकुळ पुढे आता विश्‍वासार्हता टिकविण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.

इतर ताज्या घडामोडी
शेळी-मेंढीपालनासाठी विविध योजनादुष्काळी भागांमध्ये शेळी-मेंढी पालन हा एक उत्तम...
`शेतकऱ्यांची थट्टा कशाला करता?`पुणे  : डॉ. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी...
सातारा जिल्ह्यात उन्हाळी भुईमुगाची... सातारा  ः जिल्ह्यात उन्हाळी हंगामातील...
मराठवाड्यातील प्रकल्पांमध्ये ३२ टक्के... औरंगाबाद  : मराठवाड्यातील पाणीसाठा...
तीन जिल्ह्यांत यंदा उन्हाळी पिकांचे... औरंगाबाद : यंदा मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व...
सांगली जिल्ह्यातून १० हजार ६०० टन... सांगली ः दर्जेदार द्राक्षांच्या उत्पादनासाठी...
राज्यातील साडेसात हजारांपेक्षा अधिक...मुंबई : राज्यातील सात हजार ६५८ अंगणवाड्यांना...
जलयुक्तची कामे करा; अन्यथा नोकरी सोडासांगली  ः जिल्ह्यातील पाणीटंचाई...
शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी तुम्ही कधीही...अकोला : सध्या शेतकरी, तरुण हे सर्वच त्रस्त...
राळेगणसिद्धीत गावकऱ्यांचा ‘रास्ता रोको’नगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी...
नगर जिल्ह्यात ‘जलयुक्त’ची सव्वाआठ हजार... नगर : जलयुक्त शिवार अभियानातून गेल्या वर्षभरात...
नाशिक विभागात शेततळी योजनेच्या... नाशिक  : कृषी विभागाच्या संथ कारभारामुळे...
हवामान बदलावर संवर्धित शेती हेच उत्तगेल्या दोन दशकांपासून महाराष्ट्रामध्येही...
कृषी सल्लाधान्य साठवण : मळणीनंतर धान्याची साठवण...
बोंडअळीग्रस्त, धान उत्पादकांना संयुक्त...मुंबई : राज्यात गुलाबी बोंडअळी आणि धान...
लाळ्या खुरकूत लस पुरवठा विलंबाच्‍या...पुणे  ः लाळ्या खुरकूत लसींच्या पुरवठ्याच्या...
कोरडे, उष्ण हवामान राहून तापमानाची...महाराष्ट्रासह दक्षिण, मध्य, उत्तर व ईशान्य...
नेदरलॅंडमध्ये साठवण, निर्यातीसाठी खास...वातावरणातील बदल लक्षात घेता कांदा पिकांच्या नव्या...
राळेगणसिद्धीत अण्णा हजारे यांच्या...नगर : शेतमालाला दर मिळण्यासह अन्य...
हमीभाव खरेदी केंद्रांवर हमालीच्या...अकोला : अाधारभूत किमतीने सुरू असलेल्या तूर...