दूध दरावरून ‘गोकुळ’च्या आजी-माजी पाटलांत शब्दयुद्ध
राजकुमार चौगुले
सोमवार, 11 सप्टेंबर 2017

कोल्हापूर ः पश्‍चिम महाराष्ट्रातील राजकारणाचे एक प्रमुख केंद्र असलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघात (गोकुळ) सध्या गायीच्या दूध दरवाढीवरून आजी व माजी अध्यक्षांत चांगलाच संघर्ष सुरू आहे.

शासनाने दोन वेळा दूध खरेदी दरवाढ करूनही ‘गोकुळ’च्या व्यवस्थापनाने उत्पादकांना पूर्ण दरवाढ दिलेली नाही. उलट पशुखाद्याचे दर वाढविले आहेत. ‘गोकुळ’कडून गायीच्या दुधासाठी ३ रुपये ३० पैसे, तर म्हशीच्या दुधासाठी प्रतिलिटर १ रुपये ३० पैसे कमी दिले जात आहेत. त्यामुळे दूध दरवाढीसाठी ‘गोकुळ’विरोधात लढा उभा करावा लागेल, असा इशारा माजी अध्यक्ष दिलीप पाटील यांनी दिला आहे.

कोल्हापूर ः पश्‍चिम महाराष्ट्रातील राजकारणाचे एक प्रमुख केंद्र असलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघात (गोकुळ) सध्या गायीच्या दूध दरवाढीवरून आजी व माजी अध्यक्षांत चांगलाच संघर्ष सुरू आहे.

शासनाने दोन वेळा दूध खरेदी दरवाढ करूनही ‘गोकुळ’च्या व्यवस्थापनाने उत्पादकांना पूर्ण दरवाढ दिलेली नाही. उलट पशुखाद्याचे दर वाढविले आहेत. ‘गोकुळ’कडून गायीच्या दुधासाठी ३ रुपये ३० पैसे, तर म्हशीच्या दुधासाठी प्रतिलिटर १ रुपये ३० पैसे कमी दिले जात आहेत. त्यामुळे दूध दरवाढीसाठी ‘गोकुळ’विरोधात लढा उभा करावा लागेल, असा इशारा माजी अध्यक्ष दिलीप पाटील यांनी दिला आहे.

तर संघ आम्ही योग्यरीतीने चालवत आहोत. त्याचा ताळेबंद मांडलेला असतो. त्यामुळे माजी अध्यक्ष दिलीप पाटील यांनी केलेले आरोप राजकीय हेतूने प्रेरित आहेत. त्यांची दखल आम्ही घेत नाही. संघ हा दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी आहे. तो तोट्यात जावा, असा कारभार आम्ही करणार नाही, असा पलटवार अध्यक्ष विश्‍वास पाटील यांनी केला आहे.

चार दिवसांपूर्वीच कर्नाटक सीमेवर असणाऱ्या कर्नाटक हद्दीतील गावांना दूध संघ गायीच्या दुधाला कमी दर देत असल्याबद्दल तेथील शेतकऱ्यांनी गोकुळ कार्यालयावर मोर्चा काढून संचालक व व्यवस्थापकीय मंडळाला जाब विचारला होता. दर का कमी याचे समाधानकारक उत्तर न देता आल्याने सध्या गोकुळचे प्रशासन सीमाभागातील शेतकऱ्यांच्या टीकेचा धनी बनले आहे.

याच पार्श्‍वभूमीवर गोकुळचे अध्यक्ष राहिलेल्या दिलीप पाटील यांनी गोकुळच्या दरकपातीच्या निर्णयाला विरोध करत आपण अध्यक्ष असताना दर वाढविल्याचे सांगत सध्याचे व्यवस्थापन शेतकऱ्यांच्या विरोधी असल्याचा आरोप केला आहे. तर अध्यक्ष विश्‍वास पाटील यांनी हा आरोप फेटाळून लावत हे आरोप राजकीय असल्याचे म्हटले आहे.

‘गोकुळ’चे पश्‍चिम महाराष्ट्रातील दूध संघामध्ये वर्चस्व आहे. एखाद्या आमदाराइतकेच गोकुळच्या संचालकाला महत्त्व असल्याने दुग्ध व्यवसायाबरोबर संघाचे राजकारणही चर्चेत असते. पण इतके असतानाही गोकुळमधील खाबूगिरी चर्चेतून सुटली नाही.

इतर ताज्या घडामोडी
टायर बंधाऱ्यात एक कोटी लिटर पाणीसाठासांगली  ः डॉ. विकास आमटे यांनी आनंदवनात...
पीक विम्याकडे केळी उत्पादकांची पाठजळगाव : मागील फळविमा कालावधीमधील नुकसानीसंबंधीचे...
नगर जिल्ह्यात सर्वाधिक शेतकऱ्यांना...नगर  : राज्यात कर्जमाफी मिळणारे सर्वाधिक...
राज्य सरकारचे धोरण शेतकरी हिताचे ः जानकरउस्मानाबाद  : राज्य सरकारचे धोरण...
शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा सरकारचा...नाशिक : राज्यातील शेतकऱ्यांना ऐन दिवाळीत...
सणाच्या दिवशी शेतकऱ्यांचे ठेचा भाकर...बुलडाणा : एेन सण काळात स्वाभिमानी शेतकरी...
शेतीपूरक व्यवसायाच्या आराखड्याचे काम...पुणे : शेतकऱ्यांना कर्जमाफी केली असली तरी,...
औरंगाबाद येथे कर्जमाफी प्रमाणपत्राचे... औरंगाबाद  : औरंगाबाद जिल्हाधिकारी...
देशातील सर्वांत मोठी कर्जमाफी ः... सातारा  : शेती आणि शेतकऱ्यांना चांगले दिवस...
शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफी... हिंगोली : अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा...
कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड ः... नांदेड : राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज...
शासन शेतीमाल प्रक्रिया उद्योगांवर भर... जळगाव  ः शेती व शेतकऱ्यांच्या विकासासाठी...
असंतोष विभागण्यासाठीच कर्जमाफीचे...मुंबई : सरकारने कर्जमाफीसाठी ज्या अटी- शर्ती लागू...
संत गजानन महाराज संस्थान करतेय...शेगाव, जि. बुलडाणा : शिस्त, सेवा अाणि समाज...
परभणीतील शेतकऱ्यांना कर्जमाफी... परभणी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
राज्यातील बहुतांशी भागांत उकाडा वाढलापुणे : परतीचा पाऊस राज्यातून गेल्याने बहुतांशी...
कर्जमाफीचा निर्णय ऐतिहासिक ः सदाभाऊ खोत कोल्हापूर : शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होऊ नयेत...
कर्जमाफी शेतकऱ्यांना ताकद देणारी ः... बुलडाणा : राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज...
अपयश लपविण्यासाठी भाजपकडून खोटी...मुंबई: दुसऱ्या टप्प्यातील ३७०० ग्रामपंचायतींच्या...
औरंगाबादेत २९ ऑक्‍टोबरला 'मराठा महासभा' औरंगाबाद : मराठा समाजातर्फे राज्यभर 57 मोर्चे...