सोने ४०० रुपयांनी वधारले

ग्राहक वाढू लागले आहे. यंदा उशिरा कोरडवाहू कपाशी, रब्बी हंगामासाठी अनुकूल पाऊस पडला. केळीची स्थितीही ठीक आहे. अर्थातच यामुळे यंदाही सोने विक्रीतून सराफ बाजारात बऱ्यापैकी उलाढाल होईल. - मनोहर पाटील , व्यवस्थापक, आर. सी.बाफना ज्वेलर्स, जळगाव
सोने ४०० रुपयांनी वधारले
सोने ४०० रुपयांनी वधारले

जळगाव : सुवर्णनगरी म्हणून ओळख असलेल्या जळगावातील सराफ बाजार धनत्रयोदशीपूर्वीच गजबजू लागला अाहे. सोने खरेदीसाठी परजिल्ह्यांसह परराज्यातील मराठी मंडळी दाखल होऊ लागली आहे. दोन लाखांपर्यंतच्या सोने खरेदीवर पॅनकार्ड सक्ती हटविल्याने खरेदीबाबतचा प्रतिसादही वाढला आहे. परिणामी सोन्याचे दर वधारू लागले असून, मागील पाच दिवसांत सोन्याच्या घाऊक बाजारात एक तोळ्यामागे जवळपास ४०० रुपयांनी दरवाढ झाली आहे.

जळगावची केळी व कपाशी जशी देशभर प्रसिद्ध आहे, तसे जळगावचे सोनेही लोकप्रिय आहे. वेगवेगळ्या शैलीतील दागिने, प्युअर तुकडे खरेदीसाठी अगदी मुंबई, पुणे, इंदूर, राजस्थान, गुजरात, छत्तीसगढ, बंगळूर येथून ग्राहक येतात. खानदेशातून परदेशात नोकरीनिमित्त गेलेले युवक, युवतीदेखील खास दिवाळीनिमित्त जळगावात सोन्याची खरेदी करतात. अर्थातच दिवाळीपूर्वीची सोने खरेदी सुरू झाली आहे.

येत्या मंगळवारी म्हणजेच १७ ऑक्‍टोबरला धनत्रयोदशी आहे. विशेष म्हणजेत धनत्रयोदशी व लक्ष्मीपूजनाला आपल्याला हव्या त्या शैलीतील, वजनाचे दागिने, तुकडे मिळावेत यासाठी अनेकांनी प्रसिद्ध सोन्याच्या पेढ्यांवर आगाऊ नोंदणी करून ठेवल्याची माहिती मिळाली.

मंदीचे सावट दूर होतेय मध्यंतरी नोटाबंदी, वस्तू व सेवाकर यामुळे सोने बाजारावर मंदीचे सावट होते. मागील सहा माहिन्यांमधील सराफ बाजारातील सरासरी उलाढाल जवळपास ३१ टक्‍क्‍यांनी घटली होती. पण आता दोन लाखांपर्यंतचे सोने खरेदी करताना पॅनकार्ड सक्ती दूर केली. तसेच वस्तू व सेवा करासंबंधी रिटर्न भरण्यास तीन महिने कालावधी निश्‍चित झाल्याने त्याचा काहीसा सकारात्मक परिणाम सोने बाजारावर दिसून येत आहे.

केळी, कापूस उत्पादकही करणार सोने खरेदी जिल्ह्यात तापीकाठ, गिरणा काठालगतचे पूर्वहंगामी कापूस व केळी उत्पादक दरवर्षी धनत्रयोदशीला सोन्याची खरेदी करतात. अनेकजण तर दुचाकी, चारचाकी, इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंऐवजी सोन्याला पसंती देतात. यंदा केळी, कपाशीला अपेक्षित दर नसला तरी आपला सोने खरेदीचा प्रघात मोडायला नको म्हणून सोने खरेदी होईलच, असा आशावाद सराफ बाजारातील व्यावसायिकांना आहे.

सोन्याचे दर (रुपये प्रति १० ग्रॅम किंवा तोळे)

तारीख होलसेल दर किरकोळ दर
६ ऑक्‍टोबर २९,४०० २९,७००
७ ऑक्‍टोबर २९,६००. २९,८५०
८ ऑक्‍टोबर २९,६५० ३०,०००
१० ऑक्‍टोबर २९,८०० ३०,२००
११ ऑक्‍टोबर २९,८०० ३०,२००

स्त्रोत ः सराफ बाजार, जळगाव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com