agriculture news in marathi, Gollar Opquintal 2000 to 3500 rupees in Solapur | Agrowon

सोलापुरात गवार प्रतिक्विंटल २००० ते ३५०० रुपये
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात बुधवारी (ता. १९) गवार, भेंडीची आवक कमी राहिली, पण उठाव चांगला असल्याने दरातील तेजी कायम राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. 

बाजार समितीच्या आवारात बुधवारी गवारची ३ ते ५ क्विंटल आणि भेंडीची २ ते ४ क्विंटल इतकी कमी आवक झाली. पण मागणी असल्याने दरातील तेजी टिकून राहिली. गवार, भेंडीची आवक स्थानिक भागातूनच झाली. गवारला प्रतिक्विंटलला किमान २००० रुपये, सरासरी ३५०० रुपये आणि कमाल ४५०० रुपये तर भेंडीला किमान २२५० रुपये, सरासरी २८०० रुपये आणि कमाल ४००० रुपये असा दर मिळाला.

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात बुधवारी (ता. १९) गवार, भेंडीची आवक कमी राहिली, पण उठाव चांगला असल्याने दरातील तेजी कायम राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. 

बाजार समितीच्या आवारात बुधवारी गवारची ३ ते ५ क्विंटल आणि भेंडीची २ ते ४ क्विंटल इतकी कमी आवक झाली. पण मागणी असल्याने दरातील तेजी टिकून राहिली. गवार, भेंडीची आवक स्थानिक भागातूनच झाली. गवारला प्रतिक्विंटलला किमान २००० रुपये, सरासरी ३५०० रुपये आणि कमाल ४५०० रुपये तर भेंडीला किमान २२५० रुपये, सरासरी २८०० रुपये आणि कमाल ४००० रुपये असा दर मिळाला.

गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या दरातील तेजी टिकून आहे. बुधवारी पुन्हा ही तेजी कायम राहिली. त्याशिवाय हिरवी मिरची, ढोबळी मिरची यांचेही दर टिकूनच होते. त्यात हिरव्या मिरचीची आवक १० ते २० क्विंटल आणि ढोबळी मिरचीची आवक ५० ते १०० क्विंटलपर्यंत झाली. पण मागणीत काहीसा चढ-उतार राहिला. तरीही दर टिकून होते.

हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटल किमान ८०० रुपये, सरासरी १००० रुपये आणि कमाल १८०० रुपये आणि ढोबळी मिरचीला किमान ६०० रुपये, सरासरी ९०० रुपये आणि कमाल १५०० रुपये असा दर मिळाला. 

भाजीपाल्यामध्ये मेथी, शेपू, कोथिंबिरीची आवक प्रत्येकी ७ ते ८ हजार पेंढ्यांपर्यंत झाली. त्यात मेथीला प्रतिशंभर पेंढ्यासाठी ४०० ते ७०० रुपये, कोथिंबिरीला ३०० ते ६०० रुपये आणि शेपूला ३०० ते ५०० रुपये असा दर मिळाला.

इतर बाजारभाव बातम्या
साताऱ्यात टोमॅटो २५० ते ३५० रुपये प्रति...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी...
अकोल्यात सोयाबीन प्रतिक्विंटल ३२०० ते...अकोला ः अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत...
संक्रांतीच्या तोंडावर भाजीपाल्याची...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादेत बटाटा ३०० ते ९०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल २२०० ते...परभणी ः येथील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी...
नारायणगाव उपबाजारात कोंथिबीर, मेथीतून...नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर कृषी उत्पन्न बाजार...
परभणी, नांदेड, हिंगोलीत सोयाबीनच्या...परभणी : परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यांतील अनेक...
कळमणा बाजारात तूर प्रतिक्विंटल ४१०० ते...नागपूर ः येथील कळमणा बाजार समितीत बुधवारी (ता. ९...
आले पिकाचे दर स्थिरसातारा   ः गेल्या तीन ते चार...
कोल्हापुरात वांगे दहा किलोस १०० ते ४००...कोल्हापूर : येथील बाजार समितीत या सप्ताहात वांगी...
जळगावात गवार, भेंडी, मिरचीचे दर टिकूनजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील...
परभणीत वाटाणा प्रतिक्विंटल १२०० ते २०००...परभणी ः येथील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी...
जळगावात भेंडी प्रतिक्विंटल १५०० ते ३०००...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
कांद्याची आवक कायम, दरांमध्ये चढउतारजळगावात ३५० ते ७०० रुपये प्रतिक्विंटलचे दर...
पपई दरांबाबत शेतकऱ्यांची...धुळे ः पपई दरांचा तिढा खानदेशात दिवसागणिक वाढत...
थंडीमुळे अंड्याच्या दरात सुधारणाअमरावती ः थंडीमुळे मागणी वाढल्याने...
साताऱ्यात शेवगा प्रतिदहा किलो ४०० ते...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
औरंगाबादेत द्राक्षे प्रतिक्विंटल २८००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत कोथिंबीर प्रतिक्विंटल १५०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...
राज्‍यात हिरवी मिरची प्रतिक्विंटल ७००...औरंगाबादेत प्रतिक्‍विंटल १६०० ते २५०० रुपये...