agriculture news in Marathi, Gondia ASDO suspended, Maharashtra | Agrowon

गोंदिया जिल्हा अधीक्षक अधिकारी बऱ्हाटे निलंबित
टीम अॅग्रोवन
बुधवार, 14 नोव्हेंबर 2018

गोंदिया ः नगर जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या आदिवासी क्षेत्रातील जमिनीच्या विकासासंदर्भातील योजनेत अनियमिततेचा ठपका ठेवत गोंदियाचे विद्यमान जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांना निलंबित करण्यात आले आहे. नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्‍यात ही योजना राबविण्यात आली होती. 

गोंदिया ः नगर जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या आदिवासी क्षेत्रातील जमिनीच्या विकासासंदर्भातील योजनेत अनियमिततेचा ठपका ठेवत गोंदियाचे विद्यमान जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांना निलंबित करण्यात आले आहे. नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्‍यात ही योजना राबविण्यात आली होती. 

केंद्रीय विशेष साह्य योजनेअंतर्गंत कृषी विभाग व आदिवासी विभागाच्या समन्वयातून पडकई विकास योजना राबविण्यात येते. या योजनेतून अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांच्या जमिनीचे सपाटीकरणाचे काम करण्याचे निर्देश आहेत. एक हेक्‍टर जमिनीसाठी २ लाख ५३ हजार ४४५ रुपये लाभार्थ्यांना देण्यात येतात. नगर जिल्ह्यातील १२७.८४ हेक्‍टरवरील कामासाठी ३ कोटी २४ लाखांच्या निधीची तरतूद करण्यात आली होती. लाभार्थ्याला किमान एक हेक्‍टरसाठी लाभ देण्याचे निश्चित करण्यात आले होते. कामाची देयके धनादेशाव्दारे लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यात वर्ग करण्याचे स्पष्ट आदेश आहेत. पडकईच्या कामापोटी कोणतीही आगाऊ रक्‍कम देण्यात येऊ नये, असे आदेश शासनाचे आहेत. 

तसेच तीन लाखांपेक्षा जास्त रक्‍कमेच्या खर्चाची कामे ई-निविदेद्वारे करावेत, असे आदेश असताना नगरचे तत्कालीन प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी जळगावच्या सर्वोदय शैक्षणिक व बहुद्देशीय संस्थेला या कामापोटी आगाऊ एक कोटी २९ लाख रुपये दिले. संस्थेच्या खात्यावर हा निधी वर्ग करण्यात आला. ६ एप्रिल २०१६ रोजी कार्यालयीन आदेश काढत योजनेसाठी एकूण निधीतील ४० टक्‍के रक्‍कम सर्वोदय संस्थेच्या देना बॅंक खात्यात वर्ग करण्यास मंजुरी देण्यात आली.

कामाची मागणी केल्यानंतर अवघ्या पाच दिवसांत संस्थेला काम बहाल करण्यात आले. त्यापुढील आठ दिवसांत ४० टक्‍के आगाऊ रक्‍कमही संस्थेला देण्यात आली. या प्रकरणी बऱ्हाटे यांनी पदाचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी त्यांच्यावर फौजदारी कारवाईची मागणी नगरच्या शिवनेरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष भाऊसाहेब तपकिरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्याआधारे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली. चौकशी समितीचा अहवाल कृषी विभागाकडे पाठविण्यात आला. 

किसान सभेचे पदाधिकारी डॉ. अजित नवले यांनीही आदिवासी विभागाकडे तक्रार करून आंदोलनही केले होते. त्यानंतर तब्बल सव्वादोन वर्षांनी राज्य शासनाच्या वतीने भाऊसाहेब बऱ्हाटे यांच्या निलंबनाचे आदेश जारी करण्यात आले. निलंबन काळात त्यांना विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय हे मुख्यालय राहणार आहे.

इतर अॅग्रो विशेष
सरकारबी मदत करंना अन्‌ बॅंका कर्ज देईनातनांदेड ः गेल्या वर्षीबी अन्‌ औंदाबी पावसानं मारलं...
पाण्याअभावी संत्राबागा होताहेत सरपणपरभणी ः जिल्ह्यातील प्रमुख संत्रा उत्पादक गाव...
‘कृष्णा’ आली दिघंचीच्या अंगणीदिघंची, जि. सांगली ः  अनेक वर्षे दिवास्वप्न...
जनावरांच्या बाजारातील व्यवहार उधारीवरचपरभणी: खरिपाच्या पेरणीच्या तोंडावर काहीशी...
सहकार विभाग आयुक्तांविना पोरकापुणे : गेल्या आठ महिन्यांपासून राज्याच्या सहकार...
आत्मा प्रकल्प संचालक चौकशीत दोषीपुणे: कृषी खात्यातील वादग्रस्त अधिकारी बी. एन....
लोकसभा निवडणुकीत भाजपच्या ‘व्होट शेअर’...पुणे : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता...
खानदेशात पूर्वहंगामी कापूस लागवड सुरू जळगाव ः खानदेशात मुबलक जलसाठे किंवा कृत्रिम...
कोकण वगळता उष्ण लाटेचा इशारापुणे : विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्राच्या...
शेतकऱ्यांनो विकते ते पिकवाः डॉ. भालेअकोला ः येत्या हंगामात पीक लागवड करताना...
हतबलतेतून फळबागांवर कुऱ्हाड अन्‌...जालना : जीवापाड जपलेली बाग वाचविण्यासाठी रानोमाळ...
विषाणूंद्वारे खोल मातीतही पोचविता येतील...मातीमध्ये खोलवर पिकाच्या मुळावर एखाद्या बुरशी...
जळगाव : शिवारात पाणीबाणी, शेतकरीराजा...जळगाव ः गावात तीन वर्षांपासून पावसाच्या लहरीपणाने...
हरवले जलभान कोनाड्यात‘नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन’...
मोदी लाटेचे गारुडसतराव्या लोकसभेचे भवितव्य स्पष्ट झालेले आहे. खरे...
राज्यात महायुतीची त्सुनामी...मुंबई  ः सतराव्या लोकसभेच्या निवडणुकीत देशभर...
चंदन लागवडचंदन मध्यम उंच आणि परोपजीवी प्रजाती आहे....
हुमणीच्या प्रौढ भुंगे­ऱ्यांचा सामुदायिक...गेल्या काही वर्षांत राज्यामध्ये हुमणी अळीचा...
संरक्षित शेतीतून आर्वीतील शेतकऱ्यांची...वाढती पाणीटंचाई आणि  बदलत्या हवामानामुळे...
उन्हाचा चटका ‘ताप’दायकपुणे : सूर्य चांगलाच तळपल्याने उन्हाचा चटका...