आवळ्याचा हंगाम सुरु
गणेश कोरे
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017
 
पुणे : आवळ्याला आयुर्वेदिक गुणधर्मांमुळे घरगुती वापराबराेबर प्रक्रिया उद्याेगांकडून मागणी वाढत आहे. परिणामी दर देखील चांगले मिळत असून, पुणे बाजार समितीमध्ये आवळ्याचा हंगाम सुरू झाला आहे. सध्या प्रति किलाेला १५ ते ३० रुपयांपर्यंत दर मिळत असून, यंदा उत्पादन चांगले असल्याचेही निरीक्षण बागा खरेदीदारांकडून नाेंदविले जात आहे. 
 
 
पुणे : आवळ्याला आयुर्वेदिक गुणधर्मांमुळे घरगुती वापराबराेबर प्रक्रिया उद्याेगांकडून मागणी वाढत आहे. परिणामी दर देखील चांगले मिळत असून, पुणे बाजार समितीमध्ये आवळ्याचा हंगाम सुरू झाला आहे. सध्या प्रति किलाेला १५ ते ३० रुपयांपर्यंत दर मिळत असून, यंदा उत्पादन चांगले असल्याचेही निरीक्षण बागा खरेदीदारांकडून नाेंदविले जात आहे. 
 
बाजार समितीमधील आवळ्याचे आडतदार विलास निलंगे म्हणाले, की आवळ्याचा हंगाम साधारण दसऱ्यानंतर सुरू हाेताे. बाजार समितीमध्ये प्रामुख्याने राजस्थानसह सातारा, राहुरी, नगर आदी भागातून आवळ्याची आवक हाेत असते. सध्या हंगाम सुरू झाला असून राजस्थान येथून चकाया जातीच्या आवळ्याची दरराेज सुमारे २ टन तर स्थानिक आवक सुमारे २ टन आहे.
 
दिवाळीनंतर आवकेत आणि मागणी वाढ हाेते. या हंगामात दरराेज सुमारे १० ते १२ टन आवक हाेत असते. आवळ्याची राजस्थान येथील चकाया वाणाबराेबर राहुरी, नगर परिसरातून कृष्णा, कांचन आणि एन ए ७ जातींची आवक हाेत असते. यामधील एन ए ७  या वाणाला हिरवा रंग, चमकदार फळ, एकसारखा गाेल आकार असल्याने मागणी चांगली आहे. इतर वाणांपेक्षा या वाणाला प्रतिकिलाेला पाच ते सहा रुपये जास्त दर मिळत आहे.
 
आवळ्याच्या बागा खरेदी करुन पुरवठा करणारे आदिक बल्लाळ (जि. सातारा) म्हणाले, की मी गेल्या तीन ते चार वर्षांपासून सातारा जिल्ह्यातील आवळ्याच्या बागा खरेदी करून बाजारपेठेत आवळा पाठवित असताे. यंदा १२ एकरांची ९०० झाडांची बाग खरेदी केली असून, या बागेतून ६० टन आवळा निघण्याचा अंदाज आहे. बाग खरेदी करण्याच्या महिनाभर अगाेदर झाडांची पाहणी करून माेहाेर आणि फळधारणेचा अंदाज घेऊन उत्पादनाच्या अंदाजानुसार दर ठरविताे. यंदा ही बाग ३ लाख ४० हजार रुपयांना खरेदी केली आहे.

इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्यात सर्वाधिक शेतकऱ्यांना...नगर  : राज्यात कर्जमाफी मिळणारे सर्वाधिक...
राज्य सरकारचे धोरण शेतकरी हिताचे ः जानकरउस्मानाबाद  : राज्य सरकारचे धोरण...
शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा सरकारचा...नाशिक : राज्यातील शेतकऱ्यांना ऐन दिवाळीत...
सणाच्या दिवशी शेतकऱ्यांचे ठेचा भाकर...बुलडाणा : एेन सण काळात स्वाभिमानी शेतकरी...
शेतीपूरक व्यवसायाच्या आराखड्याचे काम...पुणे : शेतकऱ्यांना कर्जमाफी केली असली तरी,...
औरंगाबाद येथे कर्जमाफी प्रमाणपत्राचे... औरंगाबाद  : औरंगाबाद जिल्हाधिकारी...
देशातील सर्वांत मोठी कर्जमाफी ः... सातारा  : शेती आणि शेतकऱ्यांना चांगले दिवस...
शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफी... हिंगोली : अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा...
कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड ः... नांदेड : राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज...
शासन शेतीमाल प्रक्रिया उद्योगांवर भर... जळगाव  ः शेती व शेतकऱ्यांच्या विकासासाठी...
असंतोष विभागण्यासाठीच कर्जमाफीचे...मुंबई : सरकारने कर्जमाफीसाठी ज्या अटी- शर्ती लागू...
संत गजानन महाराज संस्थान करतेय...शेगाव, जि. बुलडाणा : शिस्त, सेवा अाणि समाज...
परभणीतील शेतकऱ्यांना कर्जमाफी... परभणी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
राज्यातील बहुतांशी भागांत उकाडा वाढलापुणे : परतीचा पाऊस राज्यातून गेल्याने बहुतांशी...
कर्जमाफीचा निर्णय ऐतिहासिक ः सदाभाऊ खोत कोल्हापूर : शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होऊ नयेत...
कर्जमाफी शेतकऱ्यांना ताकद देणारी ः... बुलडाणा : राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज...
अपयश लपविण्यासाठी भाजपकडून खोटी...मुंबई: दुसऱ्या टप्प्यातील ३७०० ग्रामपंचायतींच्या...
औरंगाबादेत २९ ऑक्‍टोबरला 'मराठा महासभा' औरंगाबाद : मराठा समाजातर्फे राज्यभर 57 मोर्चे...
नागपुरात सोयाबीन प्रतिक्‍विंटल २७५०...नागपूर ः बाजारात सोयाबीनच्या दरात होणाऱ्या किरकोळ...
केवळ अमळनेरलाच कडधान्य खरेदी केंद्र सुरू जळगाव  ः जिल्ह्यात मंगळवारपर्यंत (ता. १७)...