agriculture news in marathi, government agency acts after life Hint | Agrowon

‘अात्मदहन’ इशाऱ्यामुळे यंत्रणा हलली
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 29 मार्च 2018

अकोला : शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींनी बीजोत्पादन उत्पादन व वितरण अनुदानासाठी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या निवासस्थानासमोर अात्महदहनाचा इशारा दिल्याने यंत्रणा अखेर हलली अाहे. शासनाच्या उपसचिवांनी या प्रकरणी कृषी अायुक्तांना संपूर्ण चौकशी करून वस्तुस्थितीदर्शक अहवाल शासनास सादर करावा, असे सुचविले अाहे. न्याय न मिळाल्यास अापण अापल्या निर्णयावर ठाम असल्याने या कंपन्यांच्या प्रतिनिधींनी बोलताना सांगितले.   

अकोला : शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींनी बीजोत्पादन उत्पादन व वितरण अनुदानासाठी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या निवासस्थानासमोर अात्महदहनाचा इशारा दिल्याने यंत्रणा अखेर हलली अाहे. शासनाच्या उपसचिवांनी या प्रकरणी कृषी अायुक्तांना संपूर्ण चौकशी करून वस्तुस्थितीदर्शक अहवाल शासनास सादर करावा, असे सुचविले अाहे. न्याय न मिळाल्यास अापण अापल्या निर्णयावर ठाम असल्याने या कंपन्यांच्या प्रतिनिधींनी बोलताना सांगितले.   

सन २०१६-१७ मध्ये उत्पादित केलेल्या बियाण्यास उत्पादन व वितरणासाठीचे अनुदान शासनाकडून देण्यास नकार देण्यात अाला अाहे. मात्र, हे बीजोत्पादन करण्यासाठी शेतकरी कंपन्यांनी कर्ज काढून पैसे उभे करीत गुंतवणूक केली होती. शासनाने एेनवेळी अनुदान न देण्याची भूमिका जाहीर केल्याने या शेतकरी कंपन्या अार्थिक अडचणीत सापडल्या. अनुदान मिळावे यासाठी गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने शासनस्तरावर निवेदने देऊन पाठपुरावा केला जात होता. मात्र, तरीही काहीच निर्णय होत नसल्याने या शेतकरी कंपन्यांच्या प्रतिनिधींनी शनिवारी (ता.३१) कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या खामगाव येथील निवासस्थानासमोर अात्मदहनाचा इशारा दिला. याची दखल घेत शासनाने बुलडाणा, वाशीमचे जिल्हाधिकारी, जिल्हा कृषी अधीक्षकांना तातडीने पत्र देत या शेतकरी कंपन्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्यास सांगितले. तसेच, त्यांना अात्मदहनाच्या निर्णयापासून दूर करण्याचे सुचविले. सोबतच कृषी अायुक्तांनी याबाबत वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे सुचविले अाहे.

या अनुषंगाने बुधवारी (ता.२८) वाशीम जिल्हाधिकारी कार्यालयाने या प्रतिनिधींना बोलवून चर्चा केली. त्यांनी अात्मदहनाचा इशारा मागे घ्यावा, असे सुचविले अाहे. मात्र, या प्रतिनिधींनी शेतकरी कंपन्यांची बाजू मांडत अनुदान मिळावे, अशी मागणी रेटून धरली.

इतर ताज्या घडामोडी
खोटी आकडेवारी दाखवून गाळप परवाने घेतले...पुणे   : शेतकऱ्यांना `एफआरपी` दिल्याचे...
वाशीम जिल्ह्यात रब्बीची २४ टक्के पेरणीवाशीम   ः जिल्हा प्रशासनाला रब्बी हंगामातील...
नगरमध्ये गहू, हरभरा पिकांचे १५ हजार...नगर   ः जिल्ह्यात कृषी विभागाच्या विविध...
पुणे जिल्ह्यात पंधरा दिवसांत पाणीसाठा...पुणे : दुष्काळाच्या झळा वाढत असतानाच पुणे...
केळीच्या खेडा खरेदीबाबत भरारी पथकांची...जळगाव  ः खानदेशात केळीच्या खेडा खरेदीसंबंधी...
बोंड अळीच्या नुकसानीचे अनुदान...अकोला : अाधीच अनेक दिवसांपासून रखडलेले बोंड अळी...
नगर जिल्ह्यातील दहा लाख जनावरे...नगर  ः दुष्काळाच्या पाश्वर्भूमीवर लोकांना...
जत तालुक्यातील दुष्काळग्रस्तांना...सांगली  : जत तालुक्यातील शेतकरी दुष्काळाच्या...
आंब्यावरील मिजमाशी, शेंडा पोखरणाऱ्या...मिजमाशी प्रादुर्भाव कोवळ्या पालवीवर,...
फळपिके सल्लाकोणत्याही वनस्पतींच्या वाढीवर हवामानाचा कमी जास्त...
योग्य वेळी करा लसीकरणजनावरांना रोगाचा प्रादुर्भाव होण्याची वाट न बघता...
धनगर समाजाचा उद्या औरंगाबादमध्ये धडक...औरंगाबाद : धनगर समाजाला एस.टी.(अनुसूचित जमाती)...
जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी माधवराव...मनमाड, जि. नाशिक : जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक,...
केंद्रीय स्ंसदीय कामकाज मंत्री अनंत...बंगळूर : केंद्रीय स्ंसदीय कामकाज मंत्री व दक्षिण...
ऊस दरप्रश्नी सोलापुरात ‘स्वाभिमानी’...सोलापूर  ः गेल्या गळीत हंगामातील उसाची...
दिवाळी संपूनही शासकीय कापूस खरेदीला...अकोला : या हंगामात लागवड केलेल्या बागायती तसेच...
ऊस दरासाठी सातारा जिल्ह्यात रास्ता रोकोसातारा  ः जिल्ह्यातील एकाही साखर कारखान्याने...
थकीत एफआरपीच्या मागणीसाठी शिरोळ येथे...कोल्हापूर  : साखर कारखान्यांनी गेल्या...
ऊस दरप्रश्नी ‘स्वाभिमानी’चे त्रिधारा...परभणी : मराठवाड्यातील साखर कारखान्यांनी यंदाचे ऊस...
सांगलीत एकरकमी ‘एफआरपी’कडेगाव, जि सांगली  ः कोल्हापूर जिल्ह्याने...