दर नियंत्रणासाठी कांदा आयातीचा निर्णय

दर नियंत्रणासाठी कांदा आयातीचा निर्णय
दर नियंत्रणासाठी कांदा आयातीचा निर्णय
नवी दिल्ली ः देशांतर्गत बाजारपेठांतील दर नियंत्रणात राहावे आणि उपलब्धता वाढावी यासाठी कांदा आयातील गुरुवारी (ता. ९) मंजुरी देण्यात आली आहे.
 
ग्राहक संरक्षण व सार्वजनिक वितरण, पुरवठ्याचे सचिव अविनाश श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली मूल्य स्थिरीकरण व्यवस्थापन समितीची शुक्रवारी बैठक झाली. बैठकीनंतर कांद्याचे दर नियंत्रण आणि उपलब्धता टिकून राहावी यासाठी कांदा आयातीला मंजुरी दिल्याचे श्रीवास्तव यांनी सांगितले.
 
दिल्लीसह प्रमुख कांदा उत्पादन क्षेत्रातून नाफेडद्वारे १० हजार टन, तर एसएफएसीकडून दोन हजार टन कांदा खरेदी होणार आहे. या संस्था खरेदी केलेला हा कांदा नंतर ग्राहकांना पुरवठा करतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
 
यासंबंधिची निविदा लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे. देशभरात सध्या कांद्याच्या तुटवड्यामुळे दर काहीसे वधारलेले आहेत. कांदा उत्पादक राज्यांमध्ये पिकाचे नुकसान झाल्याने आवकही कमी असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com