agriculture news in marathi, Government approves PKV hybrid 2 cotton variety for seed production | Agrowon

पीकेव्ही हायब्रीड-२ कापूस वाणास केंद्राची मान्यता
टीम अॅग्रोवन
रविवार, 19 नोव्हेंबर 2017

जिरायती शेतीसाठी वाण; २०१९ च्या हंगामात होईल उपलब्ध
अकोला : अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेली संकरीत कपाशी पीकेव्ही हायब्रीड-२ (बीजी २) या वाणास अखेर केंद्र शासनाने परवानगी दिली अाहे. अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व महाबीज यांच्या संयुक्त प्रयत्नातून महिको मोन्सॅन्टोसोबत करार करून हा वाण विकसित करण्यात अाला आहे.

जिरायती शेतीसाठी वाण; २०१९ च्या हंगामात होईल उपलब्ध
अकोला : अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेली संकरीत कपाशी पीकेव्ही हायब्रीड-२ (बीजी २) या वाणास अखेर केंद्र शासनाने परवानगी दिली अाहे. अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व महाबीज यांच्या संयुक्त प्रयत्नातून महिको मोन्सॅन्टोसोबत करार करून हा वाण विकसित करण्यात अाला आहे.

यासंदर्भातील पत्र महाबीज व्यवस्थापनाला नुकतेच प्राप्त झाल्याची माहिती व्यवस्थापकीय संचालक अोमप्रकाश देशमुख यांनी दिली अाहे. पीकेव्ही हायब्रीड -२ या वाणामध्ये बीजी २ हे तंत्रज्ञान अंतर्भूत केल्यानंतर या वाणाला व्यावसायिक मान्यतेसाठी केंद्र शासनाकडे पाठवण्यात अाले होते. त्याबाबत सादर केलेल्या प्रस्तावाला केंद्र शासनाने परवानगी दिली अाहे. यामुळे हे वाण अाता सर्वत्र उपलब्ध होऊ शकणार अाहे. विशेषतः २०१९ च्या हंगामात हे बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी महाबीजने कार्यक्रम हातात घेतला अाहे. येत्या दोन ते तीन वर्षात राज्यासह विदर्भातील जिरायती क्षेत्राला उपयुक्त ठरणारे हे वाण सर्वत्र उपलब्ध झालेले असेल. 

यापूर्वी परभणी येथील कृषी विद्यापीठाने विकसित केलेले नांदेड ४४ अाणि अाता डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठाने विकसित केलेले पीकेव्ही हायब्रीड २ हे वाण अतिशय कमी पाण्यात व हलक्या जमिनीत चांगले उत्पादन देऊ शकतात. रसशोषण करणाऱ्या किडीसह शेंदऱ्या बोंडअळीस हे वाण सहनशील असल्याचे सांगतिले जाते.

इतर अॅग्रो विशेष
कोकण, दक्षिण- मध्य महाराष्ट्रात आज... पुणे : पश्‍चिम मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र आणि...
जपानमधील शहरी शेतीजपान हे हजारो बेटांपासून तयार झालेले एक विकसित...
कुठे दिलासा, कुठे चिंताराज्यातील शेतकरी परतीच्या पावसाची वाट पाहून थकला...
नाशिक जिल्ह्यातील काही भागाला अवकाळी...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात सोमवारी...
सांगलीत वादळी पावसाने द्राक्षबागांचे...सांगली ः द्राक्षाला दर चांगले मिळतील म्हणून लवकर...
अॅग्रोवन सरपंच महापरिषद शनिवारपासून...पुणे  : कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण...
अवकाळी पावसाचा पुन्हा तडाखापुणे  ः दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र,...
दुष्काळग्रस्तांना मदत, आरक्षणावरून...मुंबई   ः मराठा, मुस्लिम आणि धनगर आरक्षण...
गोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे,...सध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल...
पिकते तिथेच करा प्रक्रियाहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल...
कापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणारजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात...
दुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर...मुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत...
वादळी पावसाचा दणकापुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत...
कोकण, मध्य महाराष्ट्रात आजही पावसाची...पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात...
पुरवणी मागण्या : दुष्काळग्रस्तांच्या...मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...
राज्यातील ७४ पाणलोट क्षेत्रांमध्ये अधिक...पुणे  : यंदा कमी पाऊस झाल्याने भूजल...
आयटी क्षेत्रातील नोकरीपेक्षा हिरव्या...शेतीतील विविध संकटांमुळे युवक शेती सोडून नोकरी,...
नवे काश्मीर घडवणारे ‘बसेरा- ए- तबस्सुम'अधिक कदम या कोसेगव्हाण (ता. श्रीगोंदा, जि. नगर)...
पर्यायी चाऱ्यासाठी काटे विरहित निवडूंगमुरमाड, कुरण जमिनी, वालुकामय जमिनी तसेच शेती बांध...
ऊसतोडणीचे काम थांबवले शेतीतून नवी उमेद...शिरूर कासार (जि. बीड) या दुष्काळी तालुक्‍यातील...