agriculture news in marathi, Government Back to Farmers: Haribhau Bagade | Agrowon

शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी : हरिभाऊ बागडे
टीम अॅग्रोवन
सोमवार, 1 ऑक्टोबर 2018

औरंगाबाद : कर्जवाटप, अन्नधान्य खरेदी, नैसर्गिक आपत्तीत द्यावयाची मदत ऊसदर या सर्वच आघाड्यांवर शासनाने आधीच्या सरकारच्या तुलनेत चांगली कामगिरी केल्याचे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केले.

औरंगाबाद बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी (ता. २९) बाजार समितीच्या सभागृहात पार पडली. या सभेत ते बोलत होते. सभेला बाजार समितीचे सभापती राधाकिसन पठाडे यांच्यासह उपसभापती भागचंद ठोंबरे, सत्ताधारी संचालक मंडळाचे सदस्य, व्यापारी, बाजार समितीचे सचिव विजय शिरसाठ यांच्यासह शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

औरंगाबाद : कर्जवाटप, अन्नधान्य खरेदी, नैसर्गिक आपत्तीत द्यावयाची मदत ऊसदर या सर्वच आघाड्यांवर शासनाने आधीच्या सरकारच्या तुलनेत चांगली कामगिरी केल्याचे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केले.

औरंगाबाद बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी (ता. २९) बाजार समितीच्या सभागृहात पार पडली. या सभेत ते बोलत होते. सभेला बाजार समितीचे सभापती राधाकिसन पठाडे यांच्यासह उपसभापती भागचंद ठोंबरे, सत्ताधारी संचालक मंडळाचे सदस्य, व्यापारी, बाजार समितीचे सचिव विजय शिरसाठ यांच्यासह शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

प्रास्ताविक सभापती राधाकिसन पठाडे यांनी केले. शेतकरी आणि व्यापारी यांना आवश्‍यक त्या सर्व बाबी पुरविण्यासाठी बाजार समिती कटिबद्ध असल्याचे श्री. पठाडे म्हणाले. अहवाल वाचन सचिव विजय शिरसाठ यांनी केले. बाजार समितीला मिळालेला शेष, आस्थापना खर्च, प्रशासकीय खर्च आदींविषयी प्रकाश टाकला. बाजार समितीला २०१७-१८ मध्ये शेष इतर मिळून ३ कोटी २७ लाख ८३ हजार ६३४ रूपयांचे उत्पन्न झाले. त्यापैकी आस्थापना, समिती सदस्य व इतर रक्‍कम मिळून ३ कोटी ५३ लाख ८८ हजार रुपये खर्च झाल्याची माहिती वार्षिक अहवाल वाचनातून सचिव विजय शिरसाठ यांनी दिली. लेखा परीक्षण सुरू असून, त्याचा अहवाल येणे बाकी असल्याचेही श्री. शिरसाठ म्हणाले.

श्री. बागडे म्हणाले, औरंगाबाद बाजार समितीचे लेआउट मंजूर झाले आहे. शेतकऱ्यांना मार्केट कमेटीत मतदाराचा अधिकार शासनाने दिला. हमीभावापेक्षा कमी दराने मालाविषयी नियम केला. अाडत हमाली नैसर्गिक न्यायाने खरेदीदाराच्या पट्टीतून कापली जाते आहे. खते ऑनने विकायची मानसिकता बदलविण्यात सरकार यशस्वी झाले. २०१३-१४ पर्यंत शेतकऱ्यांना ७ लाख कोटी कर्जवाटपाची मर्यादा विद्यमान सरकारने ११ लाख कोटीवर नेली आहे.

इतर बातम्या
तूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक...मुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास...
पाकिस्तानात घुसूनच सर्जिकल स्ट्राइक करा...नवी दिल्ली : दहशतवादाविरोधात सर्व राजकीय पक्षांनी...
शिवजयंतीला शिवनेरी किल्ल्यावर शिववंदनापुणे : छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या...
हुतात्मा संजय राजपूत, नितीन राठोड यांना...बुलडाणा  ः काश्मीरमधील पुलवामा सेक्टरमध्ये...
जिवाणूंमुळे होतो फुफ्फुसाच्या...फुफ्फुसाच्या ट्यूमरच्या विकासामध्ये तेथील...
पाणीटंचाईची ऊस लागवडीला झळपुणे :ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या...
पाण्याअभावी फळबागांवर संकटअकोला : फळबागांसाठी अोळख असलेल्या अकोट तालुक्यात...
दुष्काळ निधीच्या याद्यांच्या नावे महसूल...जळगाव ः खानदेशात दुष्काळ निधीसंबंधी जिल्हा...
तूर हमीभाव नोंदणीकडे शेतकऱ्यांची पाठसांगली : खरेदी केंद्रात तूर विक्रीसाठी ऑनलाइन...
मराठवाड्याच्या घशाला कोरडऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांची...
नगर जिल्हा परिषदेचे उद्या अंदाजपत्रकनगर : जिल्हा परिषदेची अंदाजपत्रकीय विशेष सभा...
सौरपंपांपासून साडेचार हजार शेतकरी वंचितजळगाव : मुख्यमंत्री सौरकृषिपंप योजनेच्या लाभासाठी...
सौर कृषिपंप योजनेच्या लाभार्थ्यांचा...सोलापूर : शेतकऱ्यांना सौरऊर्जेद्वारे दिवसाही...
औरंगाबादेत द्राक्ष प्रतिक्विंटल ३५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
‘स्वराज्य स्वर्णिम' योजनेद्वारे गड-...पुणे ः ग्रामीण पर्यटनातून रोजगार निर्मितीला...
कार्यकर्त्यांवर दडपशाही करून लाँग मार्च...नगर ः सरकारच्या विश्वासघाताविरोधात २०...
विठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरीपंढरपूर, जि. सोलापूर: माघ वारीसाठी (जया...
शिवसेना-भाजपचे युतीच्या दिशेने पुढचे...मुंबई: लोकसभा निवडणुकीतील युतीसाठी शिवसेना-...
महिला सक्षमीकरणाला गती : नरेंद्र मोदी यवतमाळ : यवतमाळसह राज्यात महिला बचत गटांचे...
द्राक्षाला निर्यातीची गोडीमुंबई  ः यंदा देशातील द्राक्ष हंगामावर...