agriculture news in marathi, government computer operators issues, Mumbai | Agrowon

आपले सरकारचे संगणकचालक सात महिन्यांपासून मानधनाविना
टीम अॅग्रोवन
रविवार, 18 फेब्रुवारी 2018

मुंबई : ग्रामविकास व माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत सुरू असलेल्या ‘आपले सरकार सेवा केंद्र’ (संग्राम) प्रकल्पात काम करणाऱ्या २५ हजार संगणकचालकांना गेल्या ७ महिन्यांपासून मानधन मिळालेले नाही. शासनाने येत्या अर्थसंकल्पात त्यासाठीची तरतूद करावी यासह विविध मागण्यासाठी अर्थसंकल्पी अधिवेशनात ५ मार्च रोजी विधान भवनावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे.

मुंबई : ग्रामविकास व माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत सुरू असलेल्या ‘आपले सरकार सेवा केंद्र’ (संग्राम) प्रकल्पात काम करणाऱ्या २५ हजार संगणकचालकांना गेल्या ७ महिन्यांपासून मानधन मिळालेले नाही. शासनाने येत्या अर्थसंकल्पात त्यासाठीची तरतूद करावी यासह विविध मागण्यासाठी अर्थसंकल्पी अधिवेशनात ५ मार्च रोजी विधान भवनावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे.

राज्य शासनाच्या आपले सरकारच्या माध्यमातून डिजिटल महाराष्ट्र साकार करण्याचे काम हे संगणकचालक करीत आहेत. त्यांच्यामुळे राज्य शासनाला केंद्र शासनाचा ई-पंचायतमध्ये सलग ३ वर्षे प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. ग्रामपंचायतीचे सर्व लेखे ऑनलाइन करणाऱ्या व गावातील नागरिकांना विविध सेवा गावातच देणाऱ्या या संगणकचालकांना गेल्या ७ महिन्यांपासून मानधन मिळत नाही. १४ व्या वित्त आयोगाचा निधी विकासकामांसाठी असून, त्यातून आपले सरकार सेवा केंद्रासाठी यामधून निधी देणार नसल्याची भूमिका ग्रामपंचायतीनी घेतली आहे. त्यामुळे चालकांना ७ महिने ते १ वर्षापर्यंत मानधन मिळत नाही.

यापूर्वी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर हजारो संगणकचालकांनी मोर्चा काढला होता. मागण्या मान्य न केल्यामुळे ८ दिवस आंदोलन केले होते. त्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी संग्राम प्रकल्पातील सर्व संगणकचालकांना आपले सरकार सेवा केंद्रात घेण्यात येईल व निश्चित मानधन वेळेवर देण्यात येईल, असे आश्वान दिले होते. या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी ‘आपले सरकार सेवा केंद्र’ (संग्राम) प्रकल्पातील संगणकचालकांच्या संघटनेच्या वतीने अर्थसंकल्पी अधिवेशनात ५ मार्च रोजी विधान भवनावर धडक मोर्चा काढण्यात येणार असल्याचे संघटनेचे राज्य अध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांनी सांगितले. 

इतर ताज्या घडामोडी
हवामान बदलावर संवर्धित शेती हेच उत्तगेल्या दोन दशकांपासून महाराष्ट्रामध्येही...
कृषी सल्लाधान्य साठवण : मळणीनंतर धान्याची साठवण...
बोंडअळीग्रस्त, धान उत्पादकांना संयुक्त...मुंबई : राज्यात गुलाबी बोंडअळी आणि धान...
लाळ्या खुरकूत लस पुरवठा विलंबाच्‍या...पुणे  ः लाळ्या खुरकूत लसींच्या पुरवठ्याच्या...
कोरडे, उष्ण हवामान राहून तापमानाची...महाराष्ट्रासह दक्षिण, मध्य, उत्तर व ईशान्य...
नेदरलॅंडमध्ये साठवण, निर्यातीसाठी खास...वातावरणातील बदल लक्षात घेता कांदा पिकांच्या नव्या...
राळेगणसिद्धीत अण्णा हजारे यांच्या...नगर : शेतमालाला दर मिळण्यासह अन्य...
हमीभाव खरेदी केंद्रांवर हमालीच्या...अकोला : अाधारभूत किमतीने सुरू असलेल्या तूर...
पुणे जिल्ह्यात होणार दोन हजार ९६ पीक... पुणे   ः रब्बी हंगामातील पिकांची...
पुणे जिल्ह्यात ११ हजार कांदा चाळींची...पुणे  ः कांद्याचे अधिक उत्पादन झाल्यास...
तेवीस कारखान्यांकडून ७७ लाख ६३ हजार टन... औरंगाबाद  : मराठवाडा व खानदेशातील पाच...
पुढील महिन्यापासून ‘समृद्धी’चे काम... वाशीम : नागपूर-मुंबई कृषी समृद्धी जलदगती...
‘वैद्यनाथ साखर’चा परवाना दहा दिवसांसाठी... बीड : अन्न व औषधी प्रशासनाने केलेल्या तपासणीत...
शेतीकामासाठी सालगड्यांची कमतरताअमरावती  ः गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नवीन...
राज्यात ‘जलयुक्त’साठी २०८ कोटींचा निधीनगर ः दुष्काळमुक्तीसाठी राबविण्यात येत असलेल्या...
वीजजोडणीसाठी शेतकऱ्याचा आत्मदहनाचा...नगर : पैसे भरल्यानंतर वारंवार मागणी करूनही...
चिंचेचे उत्पादन २० टक्क्यांनी वाढणारसांगली : चवीने आंबट असणारी चिंच यंदा गोड झाली आहे...
परभणी, नांदेड जिल्ह्यांतील २०१७ गावांना...परभणी : २०१७-१८ च्या खरीप हंगामातील पिकांची...
जलयुक्तच्या कामांना टक्केवारीचे ग्रहणअकोला ः जलयुक्त शिवार योजनेला जसजसा अधिक कालावधी...
कृषी पर्यटनाला मिळणार जुन्नर तालुक्यात...पुणे: आैद्याेगिक विकासाला मर्यादा असल्याने...