agriculture news in marathi, Government declares drought in 8 districts of maharashtra | Agrowon

रब्बीतील आठ तालुक्यात मध्यम दुष्काळ जाहीर
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 26 एप्रिल 2018

मुंबई : राज्य सरकारने रब्बी २०१७ -१८ च्या हंगामात तीन जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर करुन उपाययोजना व मदत जाहीर केली आहे. संबंधित तालुक्यात तातडीने आठ सवलती लागू करण्यात आल्या असून शेतपिकांच्या ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसानीपोटी शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान दिले जाणार आहे.

मुंबई : राज्य सरकारने रब्बी २०१७ -१८ च्या हंगामात तीन जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर करुन उपाययोजना व मदत जाहीर केली आहे. संबंधित तालुक्यात तातडीने आठ सवलती लागू करण्यात आल्या असून शेतपिकांच्या ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसानीपोटी शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान दिले जाणार आहे.

केंद्र सरकारच्या निर्देशानुसार राज्यात दुष्काळ जाहीर करण्याच्या प्रचलित पद्धतीत सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार दुष्काळी परिस्थितीवर देखरेख ठेवण्यासाठी प्रामुख्याने पावसाचे प्रमाण, वनस्पती निर्देशांक, मृद आर्द्रता, जलविषयक निर्देशांक आणि पीकपाहणी या गोष्टी विचारात घ्याव्यात, अशा सूचना आहेत. तीव्रतेनुसार गंभीर दुष्काळ, मध्यम दुष्काळ आणि सामान्य स्थिती असे दुष्काळाचे वर्गीकरण केले जाते. त्यानुसार रब्बी २०१७-१८ च्या हंगामातील परिस्थितीचा विचार करून यवतमाळ, वाशीम आणि जळगाव जिल्ह्यातील तीन तालुक्यांत मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. या तालुक्यात तातडीने दिलासादायी आठ उपाययोजना राबवाव्यात, असे आदेश मदत आणि पुनर्वसन विभागाने जारी केले आहेत.

या तालुक्यांतील बाधित शेतकऱ्यांना कृषीविषयक मदतीसाठी निविष्ठा अनुदान दिले जाणार आहे. हे अनुदान कोरडवाहू पीक उत्पादित केलेल्या व ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या खातेदारांना दिले जाणार आहे. या मदतीचे वाटप सन २०१७-१८ च्या रब्बी हंगामातील सातबारामधील पिकांच्या नोंदीच्या आधारे देण्यात येईल. हंगामातील अंतिम पैसेवारीसाठी करण्यात आलेल्या पीककापणी प्रयोगाअंती ठरवण्यात आलेल्या पीक पैसेवारीच्या आधारे पिकांचे नुकसान ठरवण्यात येणार आहे, तर फळबागांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याची खात्री शेतीनिहाय पंचनामे करून करण्यात येणार आहे. पंचनाम्यासोबत अशा शेतीतील पिकांचे ग्लोबल पोजिशनिंग सिस्टीम दर्शवणारे फोटो काढण्यात येणार आहेत. फळबागांचे उत्पादन सरासरी पीक उत्पादनाच्या ६७ टक्के किंवा त्यापेक्षा कमी असल्यास मदत मिळणार नाही. त्याशिवाय या तालुक्यांमधील शाळांमध्ये मध्यान्ह भोजन योजना दीर्घ सुटीच्या कालावधीतही राबविण्यात यावी, मध्यान्ह भोजन योजना व एकात्मिक बालविकास योजनेअंतर्गत मुलांना पौष्टिक अन्न देण्यात यावे, अशा सूचना देण्यात आल्या. दुष्काळ घोषित केल्याचे हे आदेश पुढील सहा महिने लागू राहणार आहेत.

दिलासादायी उपाययोजना जाहीर -
१) जमीन महसुलात सूट
२) सहकारी कर्जाचे पुनर्गठण
३) शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती
४) कृषी पंपाच्या चालू वीजबिलात ३३.५ टक्के सूट
५) शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी
६) रोहयोअंतर्गत कामाच्या निकषांत काही प्रमाणात शिथिलता
७) आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी टँकरचा वापर
८) शेती पंपाची वीजजोडणी खंडित न करणे.

दुष्काळ जाहीर झालेले तालुके ः
राळेगाव, दिग्रस, घाटंजी, केळापूर, यवतमाळ (जि. यवतमाळ), वाशीम (जि. वाशीम) आणि मुक्ताईनगर, बोदवड (जि. जळगाव). 

इतर अॅग्रो विशेष
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
दर्जेदार ऊसबेण्याची केली निर्मिती काशीळ (ता. जि. सातारा) येथील उच्चशिक्षित व...
मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी...अकोला ः देशात होत असलेल्या लोकसभा...
कोकणातील आंबा अडकला धुक्याच्‍या फेऱ्यातवेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : ऐन हंगामातच कोकणातील...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे : मध्य भारतात होत असलेल्या वाऱ्यांच्या...
हळदीचे दिवसातून दोन वेळा सौदेसांगली ः सांगली बाजार समितीत गेल्या दोन ते...
पदविकाधारकांना कृषिसेवेचे दरवाजे बंद... पुणे : राज्याच्या शेतकरी कुटुंबातील हजारो...
सर्वसामान्यांचा असामान्य नेतामाजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर...
सर्जनशीलतेला सलाम!व र्ष २०१७ च्या खरीप हंगामात कापसावर फवारणी...
प्राणघातक हृदयरोगाचे प्रमाण होतेय कमीगेल्या दोन वर्षामध्ये हृदयरोगाला प्रतिबंध आणि...
अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ : अमर हबीब,...नवी दिल्ली : शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना आणि...
मच्छीमारी व्यवसायाने आणली समृद्धीगणित विषयात पदवी असूनही बेरोजगार राहणं नशिबी आलं...
काबुली हरभऱ्याने उंचावले अर्थकारण चोपडा तालुक्‍यातील (जि. जळगाव) तापी व अनेर...
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...