agriculture news in marathi, government declares water floating solar plant in Ujjani dam, solapur | Agrowon

उजनीवर उभारणार तरंगता साैरऊर्जा प्रकल्प
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 26 जून 2018

पुणे : राज्यातील धरणांच्या पाण्यावर तरंगता साैरऊर्जा प्रकल्प उभारण्याचे प्रयत्न शासनाकडून सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून उजनी (जि. साेलापूर) धरणाच्या पाण्यावर १ हजार मेगावॉट क्षमतेचा साैरऊर्जा प्रकल्प उभारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठी महावितरणचे संचालक (वाणिज्य) सतीश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली अाहे. 

पुणे : राज्यातील धरणांच्या पाण्यावर तरंगता साैरऊर्जा प्रकल्प उभारण्याचे प्रयत्न शासनाकडून सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून उजनी (जि. साेलापूर) धरणाच्या पाण्यावर १ हजार मेगावॉट क्षमतेचा साैरऊर्जा प्रकल्प उभारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठी महावितरणचे संचालक (वाणिज्य) सतीश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली अाहे. 

राज्यातील पारंपरिक ऊर्जानिर्मितीसाठी मर्यादा येत असल्याने अपारंपरिक ऊर्जानिर्मितीचे धाेरण राज्याने स्वीकारले आहे. याचात एक भाग म्हणून जमिनीपेक्षा राज्यातील धरण, नदी, समुद्राच्या पृष्ठभागावर तंरगते साैरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी माेठा वाव आहे. याचा विचार करून राज्यातील पहिला तरंगता साैरऊर्जा प्रकल्प उभारण्याची चाचपणी उद्याेग आणि ऊर्जा मंत्रालयाच्या वतीने सुरू आहे. यासाठीच उजनी धरणावरील प्रकल्पासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती प्रकल्पामुळे पर्यावरणावर हाेणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणे, विविध विभागांकडून परवानग्या प्राप्त करणे, पाण्याच्या पातळीचा महिनानिहाय अभ्यास करणे, प्रकल्प उभारणीसाठी व्यवस्था उभारणे, प्रकल्पाशी निगडित सर्व बाबी, कामकाज, कार्यपद्धती, अमंलबजावणी बाबत निश्‍चिती करण्याचे काम करणार आहे. 

साैरऊर्जा प्रकल्पामुळे पुणे आणि साेलापूर जिल्ह्यातील उजनी धरण परिसरातील शेतकऱ्यांना शाश्‍वत ऊर्जा या प्रकल्पामधून मिळणार आहे. शेतकऱ्यांना पारंपारिक ऊर्जेवर अवलंबून न राहता साैरऊर्जा सिंचनासाठी उपलब्ध होणार आहे. 

अशी आहे समिती 

  • अध्यक्ष - सतीश चव्हाण - संचालक (वाणिज्य) महावितरण
  • सदस्य - मुख्य अभियंता (स्टेट ट्रान्समिशन युनीट), मुख्य अभियंता (जलसंपदा, विशेष प्रकल्प, पुणे), पर्यावरण विभाग संचालक, अतिरिक्त महासंचालक (महाऊर्जा)
  • सदस्य सचिव - अधीक्षक अभियंता (महावितरण)

इतर ताज्या घडामोडी
खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...
पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे  : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...
खानापूर घाटमाथ्यावर तीव्र पाणीटंचाई सांगली  : घाटमाथ्यावर पावसाने ओढ दिली आहे....
नगर जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्‍टरवर...नगर  ः जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा लाख ५२...
कौशल्यावर आधारित उपक्रम ‘रयत’मध्ये सुरू...सातारा  ः केवळ पुस्तकी नव्हे तर कौशल्यावर...
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा अकोला...अकोला  ः नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या...
सांगली जिल्ह्यात पाणीप्रश्‍न पेटण्याची...सांगली  : पावसाने दिलेली उघडीप आणि पावसाळा...
अकोला, बुलडाण्यात सर्वदूर पाऊसअकोला   ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा या...
सावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर ! कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...
धुळे, जळगाव जिल्ह्यांतील पैसेवारी चुकीचीजळगाव   ः धुळे व जळगाव जिल्ह्यांत हवा तसा...
नैसर्गिक आपत्तीत यवतमाळमधील ६२ हजार...यवतमाळ   ः जिल्ह्यात या वर्षी आलेल्या...
पुणे जिल्‍ह्यात पावसाच्या हलक्या ते...पुणे : पावसाच्या मोठ्या खंडानंतर जिल्ह्याच्या...
नगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावटनगर  ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी फक्त ६५.५५...