agriculture news in marathi, Government did not imported Sugar clarifys Minister Subhash Deshmukh | Agrowon

सरकारने साखर आयात केली नाही
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 15 मे 2018

कोल्हापूर : सरकारने पाकिस्तानातून कोणतीही साखर आयात केलेली नाही. जर साखर बेकायदेशीर पद्धतीने आलेली असेल त्याचा शोध घेऊन संबंधितावर कारवाई केली जाईल, असा इशारा सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिला आहे.

कोल्हापूर : सरकारने पाकिस्तानातून कोणतीही साखर आयात केलेली नाही. जर साखर बेकायदेशीर पद्धतीने आलेली असेल त्याचा शोध घेऊन संबंधितावर कारवाई केली जाईल, असा इशारा सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून पाकिस्तानची सुमारे तीस हजार क्विंटल साखर भारतात आयात झाल्याने राजकारण तापले आहे. या पार्श्‍वभूमीवर मंत्री देशमुख यांनी हा खुलासा केला आहे. सध्या साखरेची स्थिती बिकट असतानाच सरकार पाकिस्तानातून साखर कशी आयात करेल, असा सवाल मंत्री देशमुख यांनी केला. आलेली साखर ही दोन महिन्यांपूर्वी आलेली असेल किंवा एखाद्या व्यापाऱ्याने मुद्दामहून ती आणली असेल. यामुळे जर ही साखर बेकायदेशीरपणे आली असेल, तर संबंधितांवर नक्कीच कारवाई करण्यात येईल, असे मंत्री देशमुख यांनी सांगितले. यासाठी व्यापाऱ्यांचे साठेही तपासण्यात येतील, असे श्री. देशमुख यांनी स्पष्ट केले.

सध्या साखरेची स्थिती बिकट आहे. आंतराष्ट्रीय तसेच देशांतर्गत बाजारातही साखरेचे दर घसरले आहेत. सरकारने साखर निर्यात व्हावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. टनाला ५५ रुपये अनुदान देण्याचेही जाहीर केले आहे. आयातीवर शंभर टक्के कर लावला आहे. इतका खटाटोप करत असताना सरकार पाकिस्तानची साखर आयात कशी करेल, असा सवाल श्री. देशमुख यांनी केला आहे.

इतर अॅग्रोमनी
कापसाच्या किमतीत आणखी सुधारणानिवडणुकीमुळे पुढील दोन महिने बहुतेक पिकांच्या...
जळगाव जिल्ह्यात हरभरा खरेदीसंबंधी तयारी...जळगाव ः जिल्ह्यात शासकीय हरभरा खरेदीसंबंधीची...
सेंद्रिय उत्पादनातून आठ वर्षात तीन...आधी शिक्षण, बहुराष्ट्रीय बॅंकेतील नोकरी यामुळे...
सुधारित जोडओळ पद्धतीमुळे कपाशीतून...सोगोडा (जि. बुलढाणा) येथील विजय पातळे या कपाशी...
कापसाच्या निर्यात मागणीत वाढीची शक्यताया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने सोयाबीन व...
कापूस, हळद, हरभऱ्याच्या भावात वाढया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने मका,...
बांबू व्यापाराला चांगली संधीयेत्या काळात राज्यातील बांबूचा व्यापार वाढवायचा...
भारतातील पाच कडधान्यांच्या हमीभावावर...वॉशिंग्टन : भारतात पाच कडधान्यांना दिल्या...
भारतीय चवीच्या चॉकलेटची वाढती बाजारपेठकार्तिकेयन पलानीसामी आणि हरीश मनोज कुमार या दोघा...
सुधारित पट्टापेर पद्धतीने वाढले एकरी ३१...पारंपरिक पद्धतीने सोयाबीन तूर हे आंतरपीक अनेक...
चीन, अमेरिकेचे कापूस उत्पादन पुढील...जळगाव : देशात ३१ जानेवारीअखेर सुमारे १८० लाख...
कापूस, गवार बी आणि हरभऱ्याचे भाववाढीचे...या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने साखर वगळता...
हरभरा निर्यात, स्थानिक मागणीत वाढ या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने मका व गहू...
सीताफळाच्या मूल्यवर्धनातून घेतला...`उद्योगाच्या घरी, रिद्धीसिद्धी पाणी भरी`, अशी...
कापसाच्या भावात घसरणया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने गहू वगळता...
हलव्याच्या कार्यक्रमाने अर्थसंकल्पाची...नवी दिल्ली : नवीन वर्षाची सुरवात झाली की...
आयटीसीचे ‘ई चौपाल’ आता येणार मोबाईलवरग्रामीण भागाला डिजिटल करण्याच्या उद्देशाने दोन...
कृषिमालाच्या मूल्यवर्धनालाच खरे भविष्य...२०१८ मध्ये डॅनफॉस इंडिया या कंपनीने उत्तम असा...
वनशेतीसह आंतरपिके ठरतोय फायद्याचा सौदाशाश्वत उत्पादनासाठी पारंपरिक पिकांसोबत वनशेतीचा...
हरभऱ्याला वाढती मागणी या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने कापूस, गहू...