agriculture news in marathi, Government did not responded for our problems : Orange Farmers | Agrowon

चार वर्षांत संत्रा उत्पादकांची दखलच नाही : बागायतदार नाराज
टीम अॅग्रोवन
सोमवार, 18 फेब्रुवारी 2019

नागपूर : कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या आणि विदर्भाचे मुख्य फळपीक असलेल्या संत्रा उत्पादकांच्या समस्यांची गेल्या चार वर्षांत कोणतीच दखल सरकारकडून घेण्यात आली नाही. परिणामी, विदर्भातील संत्रा उत्पादकांमध्ये सरकारप्रती नाराजीचा सूर आहे. 

नागपूर : कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या आणि विदर्भाचे मुख्य फळपीक असलेल्या संत्रा उत्पादकांच्या समस्यांची गेल्या चार वर्षांत कोणतीच दखल सरकारकडून घेण्यात आली नाही. परिणामी, विदर्भातील संत्रा उत्पादकांमध्ये सरकारप्रती नाराजीचा सूर आहे. 

अमरावती पाठोपाठ नागपूर, अकोला, वाशीम, यवतमाळ, बुलडाणा जिल्ह्यांत संत्रा लागवड क्षेत्र आहे. विदर्भातील संत्र्याखालील क्षेत्र दीड लाख हेक्‍टर इतके मोठे आहे. त्यातील ८५ ते ९० हजार हेक्‍टरवरील झाडे उत्पादनक्षम आहेत. या पिकाने विदर्भातील शेतीला आर्थिकस्थैर्य दिले असले तरी शासनाने मात्र संत्रा उत्पादकांना कोणत्याच प्रकारच्या सुविधा पुरविण्यासाठी पुढाकार घेतला नाही. परिणामी संत्रापट्‌ट्यात अनेक समस्यांनी थैमान घातले आहे. 

सद्यःस्थितीत आंबिया बहारातील फुले आणि मुगाच्या दाण्याच्या आकाराची फळे आहेत. आंबिया बहारातील फळे टिकविण्यासाठी मे महिन्यापर्यंत पाण्याची गरज पडते. मे महिन्याला अद्याप चार महिने शिल्लक असल्याने बागा जगविण्याचे आवाहन शेतकऱ्यांसमोर आहे. दुष्काळीस्थिती लक्षात घेता १०० मायक्रॉनचे मल्‍चिंग अनुदानावर उपलब्ध करून देण्याची देखील शेतकऱ्यांची मागणी. दुष्काळाची घोषणा करण्यावरच सरकार समाधानी असून इतर कोणत्याच उपाययोजनांची अंमलबजावणी सरकारकडून केली गेली नाही, असा आरोप संत्रा उत्पादकांचा आहे. संत्रा बागायतदारांसाठी ९० टक्‍के अनुदानावर ठिबक दिल्यास त्यातूनही संत्रा बागायतदारांचे हित साधता येईल; परंतु विदर्भातील मुख्यमंत्री आणि सर्वच सत्ताकेंद्र असताना यातील एकाही बाबीकडे लक्ष दिले गेले नाही, असा आरोप आहे. 

शेतकरी प्रतिक्रिया...
सरकारला चार वर्षांचा कालावधी झाला. परंतु विदर्भातील मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडून संत्रा उत्पादकांचे प्रश्‍न जाणून घेण्यासाठी एकही बैठक बोलावण्यात आली नाही. महिनाभरापूर्वी संत्रा महोत्सवात अशी बैठक घेण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. परंतु, आता ते परत लोकसभा निवडणुकांच्या प्रचारात दंग झाल्याने संत्रा उत्पादकांचा त्यांना विसर पडला. दुष्काळी उपाययोजनांच्या बाबतीतही संत्रा उत्पादकांसाठी दुजाभाव केला जात आहे.
- मनोज जवंजाळ,
संत्रा उत्पादक, काटोल, जि. नागपूर

आंबिया फळांना मागणी
आंबिया बहाराच्या फळांची चव आंबट गोड राहते. त्यामुळे केरळ, आंधप्रदेश, तमिळनाडू या भागांत मागणी अधिक राहते. मृगाच्या संत्र्याला नॉर्थ मध्ये मागणी राहते. ऑक्‍टोबर ते डिसेंबर या कालावधीत आंबियातील फळे उपलब्ध होतात.
 

इतर अॅग्रो विशेष
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
दर्जेदार ऊसबेण्याची केली निर्मिती काशीळ (ता. जि. सातारा) येथील उच्चशिक्षित व...
मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी...अकोला ः देशात होत असलेल्या लोकसभा...
कोकणातील आंबा अडकला धुक्याच्‍या फेऱ्यातवेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : ऐन हंगामातच कोकणातील...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे : मध्य भारतात होत असलेल्या वाऱ्यांच्या...
हळदीचे दिवसातून दोन वेळा सौदेसांगली ः सांगली बाजार समितीत गेल्या दोन ते...
पदविकाधारकांना कृषिसेवेचे दरवाजे बंद... पुणे : राज्याच्या शेतकरी कुटुंबातील हजारो...
सर्वसामान्यांचा असामान्य नेतामाजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर...
सर्जनशीलतेला सलाम!व र्ष २०१७ च्या खरीप हंगामात कापसावर फवारणी...
प्राणघातक हृदयरोगाचे प्रमाण होतेय कमीगेल्या दोन वर्षामध्ये हृदयरोगाला प्रतिबंध आणि...
अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ : अमर हबीब,...नवी दिल्ली : शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना आणि...
मच्छीमारी व्यवसायाने आणली समृद्धीगणित विषयात पदवी असूनही बेरोजगार राहणं नशिबी आलं...
काबुली हरभऱ्याने उंचावले अर्थकारण चोपडा तालुक्‍यातील (जि. जळगाव) तापी व अनेर...
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...