agriculture news in Marathi, Government didnt announced help for moong, urad and soybean producers, Maharashtra | Agrowon

सरकारी मदतीने एका डोळ्यात हसू, दुसऱ्यात अश्रू
गोपाल हागे
रविवार, 24 डिसेंबर 2017

शासनाने बोंडअळीच्या प्रादुर्भावाची दखल घेत कापूस उत्पादकांना मदत जाहीर केली, हे चांगले झाले. मात्र दुसरीकडे लाखो हेक्टरवर लागवड झालेल्या व उत्पादन खर्चसुद्धा न निघालेल्या सोयाबीन उत्पादकांना, मूग-उडीद पेरणाऱ्यांना मदत मिळणे गरजेचे होते. अनेक शेतकऱ्यांना एकरी ५० किलोपासून तर चार क्विंटलपर्यंत सोयाबीन झाले होते. त्यांचा खर्चही निघालेला नाही. परंतु शासनाने या शेतकऱ्यांकडे डोळेझाक केल्याचे दिसून येते. मदत दिली पाहिजे.
- मनोज तायडे, शेतकरी नेते, अकोला  

अकोला : राज्य शासनाने अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी कापूस, धान उत्पादकांना मदत जाहीर केल्याने एकीकडे दिलासा मिळालेला असतानाच दुसरीकडे सोयाबीन, मूग-उडीद उत्पादकांना काहीही न मिळाल्याने नाराजीचे सूर उमटू लागले अाहेत. विशेष म्हणजे राज्यात कापसाच्या ४० लाख हेक्टरनंतर सर्वात जास्त सुमारे ३८ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर सोयाबीनची लागवड झाली होती. 

पावसातील खंडानंतर काढणीच्या वेळी पाऊस अाल्याने सोयाबीन उत्पादकांना मोठा फटका बसला होता. या हंगामात सोयाबीनची उत्पादकता अवघी ५० किलोपासून ४ क्विंटलपेक्षा कमी मिळाली. त्यातच मालाचा दर्जा चांगला नसल्याने भावसुद्धा अवघा दोन हजारांच्या अात मिळाला.

शासनाच्या नाफेड खरेदी केंद्रावर लावलेल्या निकषात सोयाबीन बसले नाही, एवढा दर्जा खालावला होता. यामुळे मोठे नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागले. हीच गत मूग, उडीद उत्पादकांचीही झाली. याही पिकांची उत्पादकता कमी झाली शिवाय मालाचा दरही हमीभावाच्या अात मिळत अाहे. त्यामुळे या पिकांना हिवाळी अधिवेशनात मदत मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना वाटत होती.

अधिवेशनापूर्वी संपूर्ण विदर्भात कापसासोबतच सोयाबीन,मूग, उडीद उत्पादकांना मदतीची मागणी पुढे अाली होती. ठिकठिकाणी कापूस-सोयाबीन परिषदा झाल्या. असे असताना शासनाने केवळ कापूस व धानाला मदत जाहीर केल्याने अपेक्षाभंग झाल्याची भावना व्यक्त केल्या जाऊ लागली अाहे.

इतर अॅग्रो विशेष
अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ : अमर हबीब,...नवी दिल्ली : शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना आणि...
मच्छीमारी व्यवसायाने आणली समृद्धीगणित विषयात पदवी असूनही बेरोजगार राहणं नशिबी आलं...
काबुली हरभऱ्याने उंचावले अर्थकारण चोपडा तालुक्‍यातील (जि. जळगाव) तापी व अनेर...
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...
राजकीय उपद्रव्य मूल्य घटल्याने...मुंबई: मर्यादित जनाधार आणि राजकीय उपद्रव मूल्य...
सोलापूर जिल्ह्यातील सर्व गावांची...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील सर्वच ११४५...
विदेश अभ्यास दौऱ्याच्या शेतकरी यादीत...पुणे : विदेश अभ्यास दौऱ्यासाठी निवड केलेल्या...
क्रांती कारखाना हुमणीचे भुंगेरे खरेदी...कुंडल, जि. सांगली : एकात्मिक हुमणी कीड नियंत्रण...
तेजस्विनीच्या साथीने बचतीतून...तेजस्विनी लोकसंचालित साधन केंद्राच्या...
परवानाधारक व्यापाऱ्यांनीच केळीची खरेदी...जळगाव : चोपडा बाजार समिती दरवर्षी १४...
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर...पणजी : देशाचे माजी संरक्षणमंत्री व गोव्याचे...
आडातच नाही तर पोहऱ्यात येणार कोठून? दुष्काळ पडल्याने पाण्यासाठी बोअर घेण्याची अक्षरशा...
कृषी पर्यवेक्षकांना पदोन्नती मिळाली, पण...पुणे : राज्यातील कृषी पर्यवेक्षकांना शासनाने मंडळ...
दुष्काळी मराठवाड्यात मार्चमध्येच ‘केसर'...केज, जि. बीड ः फळांचा राजा आंबा बाजारात...
मिरची पीक अंतिम टप्प्यातनंदुरबार (प्रतिनिधी) ः खानदेशातील मिरचीचे आगार...
सुधारित जोडओळ पद्धतीमुळे कपाशीतून...सोगोडा (जि. बुलढाणा) येथील विजय पातळे या कपाशी...
परभणी ठरले देशात उष्णपुणे : राज्यात अनेक ठिकाणी तापमान ३७ अंशांच्या...