आधार लिंकची मुदत आता ३१ मार्च

आता ‘या’ तारखेपर्यंत आधार लिंक करा: सर्वोच्च नायायालय
आता ‘या’ तारखेपर्यंत आधार लिंक करा: सर्वोच्च नायायालय

नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने आज (शुक्रवार) केंद्र सरकारच्या एका महत्त्वाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे. सरकारशी संबंधित विविध योजनांशी आधार क्रमांक जोडण्यासाठी आता 31 मार्च 2018 ही अखेरची तारीख निश्चित करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या या प्रस्तावावर सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठाने अंतरिम आदेश दिला.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, सार्वजनिक अथवा खाजगी बॅंकेत खाते उघडताना देखील आधार कार्ड आवश्यक असेल. म्हणजे आधार क्रमांकाशिवाय देखील खाते उघडता येणार आहे. मात्र त्यासाठी आधार क्रमांकासाठी अर्ज दाखल केल्याचा पुरावा खातेदाराला सादर करावा लागणार आहे.

आधार क्रमांक जोडण्यासाठी आता 31 मार्च 2018 ही अखेरची तारीख निश्चित करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले असले तरी आधार कायद्याच्या वैधतेला आव्हान देणारी एक याचिका सर्वोच्च नायायल्यात दाखल करण्यात आली. त्यावर सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देते याकडे आता केंद्र सरकारचे लक्ष लागले आहे. कारण याच आदेशावर आधारचे भवितव्य अवलंबून असणार आहे. आता या याचिकेवर येत्या 17 जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com