तुरीची १० क्विंटलपर्यंत होणार केंद्रांवर खरेदी

तुरीची १० क्विंटलपर्यंत होणार केंद्रांवर खरेदी
तुरीची १० क्विंटलपर्यंत होणार केंद्रांवर खरेदी

सांगली : शासकीय खरेदी केंद्रांवर अवघे दोन ते तीन क्विंटल हेक्टरी तूर खरेदी होत असताना, शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. अखेर याबाबत निर्णय घेत राज्य सरकारने २० जिल्ह्यांतील खरेदी केंद्रांवर हेक्टरी १० क्विंटलची तूर खरेदी करण्याचा शासकीय आदेश काढला आहे.

सांगली जिल्ह्याच्या पीककापणी अहवालानुसार केवळ हेक्‍टरी २९१ किलो तूर खरेदी करण्याचा आदेश निघाला होता. मात्र, तूर विक्रीसाठी आल्यानंतर शेतकऱ्यांत गोंधळ निर्माण झाला होता. दैनिक ॲग्रोवनमध्ये बुधवारी (ता. २१) ‘हेक्‍टरी २९१ किलोच तुरीची खरेदी’ अशी बातमी प्रसिद्ध झाली होती. शासनाने याची दखल घेत हेक्‍टर १० क्विंटल तूर खरेदी करण्याचा आदेश बुधवारी (ता. २८) जारी केला आहे. राज्यातील २० जिल्ह्यांंत हेक्‍टरी १० क्विंटल तुरीची खरेदी केली जाणार आहे, अशी माहिती संबंधित विभागाच्या सूत्रांनी दिली.

पणन विभागाने प्रत्येक वेळा तूर खरेदीची मर्यादा बदलली असल्याने याचा फटका तूर उत्पादक शेतकऱ्यांना बसला. सांगली जिल्ह्यात सुरवातीला हेक्‍टरी ३ क्विंटल तूर खरेदी केली. त्यानंतर हेक्‍टरी ३ क्विंटलवरून ५ क्विंटल खरेदी करण्यास प्रारंभ केला. पीककापणी अहवालानुसार तुरीची खरेदीची मर्यादा कमी करून केवळ हेक्‍टरी २९१ किलोच, असा आदेश काढला. त्यामुळे तूर विक्रीस अडथळे निर्माण झाले होते. तूर खरेदीची मर्यादा वाढवण्यात यावी, अशी मागणीदेखील शेतकऱ्यांनी केली होती. तूर खरेदीबाबत बैठक घेण्यात आली. त्या बैठकीत तूर खरेदीची मर्यादा वाढविण्यात आली. तूर खरेदीचा आदेश बुधवारी (ता. २८) जारी केला आहे. या आदेशात असे म्हटले आहे, की ज्या जिल्ह्यात तुरीची उत्पादकता प्रतिहेक्‍टरी १० क्विंटलपेक्षा कमी आहे, अशा जिल्ह्यांत १० क्विंटल तूर खरेदी केंद्रावर तुरीची खरेदी केली जाणार आहे. याचा अर्थ असा, की राज्यातील ३४ जिल्ह्यांपैकी २० जिल्ह्यांत तूर खरेदीची मर्यादा कमी होती.

या जिल्ह्यात मर्यादा वाढविली राज्यातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदुरबार, जळगाव, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद, बीड, हिंगोली, बुलडाणा, वाशीम, भंडारा, गोंदिया, गडचिरोली अशा वीस जिल्ह्यांची तूर खरेदीची मर्यादा वाढविली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com