agriculture news in marathi, government gives order to take a minimum milk for inspection, kolhapur, maharashtra | Agrowon

तपासणीसाठी २० मिलिपर्यंतच दूध घेण्याचे कोल्हापुरात आदेश
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 7 सप्टेंबर 2018

कोल्हापूर  : जिल्ह्यातील दूध संस्था दुधामधील फॅट आणि एसएनएफ तपासणीसाठी शेतकऱ्यांकडून ५० ते १०० मिलि दूध घेतात. वास्तविक या तपासणीसाठी ५ ते २० मिलि पेक्षा जास्त दूध घेतले जाऊ नये, असा आदेश जिल्ह्यातील सर्वच दूध संस्थांना सहकारी संस्थेचे (दुग्ध) सहायक निबंधक डॉ. राजेंद्र देशमुख यांनी दिला.

 ५ ते २० मिलिपेक्षा जास्त दूध घेणाऱ्या दूध संस्थांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही या वेळी डॉ. देशमुख यांनी दिला आहे. तसेच तपासणीसाठी घेतलेल्या दुधाचेही पैसे शेतकऱ्यांना देण्याची सूचनाही नमूद करण्यात आली आहे.

कोल्हापूर  : जिल्ह्यातील दूध संस्था दुधामधील फॅट आणि एसएनएफ तपासणीसाठी शेतकऱ्यांकडून ५० ते १०० मिलि दूध घेतात. वास्तविक या तपासणीसाठी ५ ते २० मिलि पेक्षा जास्त दूध घेतले जाऊ नये, असा आदेश जिल्ह्यातील सर्वच दूध संस्थांना सहकारी संस्थेचे (दुग्ध) सहायक निबंधक डॉ. राजेंद्र देशमुख यांनी दिला.

 ५ ते २० मिलिपेक्षा जास्त दूध घेणाऱ्या दूध संस्थांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही या वेळी डॉ. देशमुख यांनी दिला आहे. तसेच तपासणीसाठी घेतलेल्या दुधाचेही पैसे शेतकऱ्यांना देण्याची सूचनाही नमूद करण्यात आली आहे.

दुधाची गुणवत्ता तपासणीसाठी जिल्ह्यातील अनेक दूध संस्था ५० ते १०० मिलि दूध घेतात. वास्तविक याचा शेतकऱ्यांना कमी आणि संस्थांना जास्त फायदा होतो. याबाबत तक्रारीही वाढल्या होत्या. त्यामुळे प्रत्यक्ष वापर झालेले दुधाचे परिमाण वगळून उर्वरित जे दूध संस्थेमार्फत सहकारी संघाकडे पाठविण्यात येते त्याची नोंद संबंधित दूध उत्पादकांच्या खाती घेऊन त्याचाही दर त्यांना दिला पाहिजे. संस्थांना दिलेल्या आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करावी. एखादी संस्था सध्याच्या आदेशाप्रमाणे अंमलबजावणी करणार नाही किंवा तशी तक्रार आल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

‘तपासणीसाठी घेतलेल्या दुधाचेही पैसे द्यावेत’
शेतकऱ्यांकडून तपासणी नमुण्यासाठी घेतलेल्या दुधाचे पैसेही संस्थांनी दिले पाहिजेत. जी संस्था या आदेशाचे पालन करणार नाही, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. एखाद्या संस्थेबाबत तक्रार असल्यास सहायक निबंधक, सहकारी संस्था (दुग्ध) या कार्यालयाशी ०२३१-२६५१७२४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही डॉ. देशमुख यांनी केले आहे.
 

संस्थांकडे तपासणीसाठी असणाऱ्या विविध उपकरणांकरिता आवश्‍यक असणारे दूध
उपकरण दूध (मिलि)
मिल्क ॲनलायजर ५ ते २०
मिल्को टेस्टर  १० ते २०
गर्बर मेथड १०.७५

 

इतर ताज्या घडामोडी
वीरगळचा इतिहास नव्या पिढीसमोरकोल्हापूर - या दगडी शिळा अनेक गावांत पाराखाली,...
सरकारच्या ताफ्यात एक हजार इलेक्‍ट्रिक...मुंबई - राज्य सरकारच्या ताफ्यात एक हजार इलेक्‍...
पाचल ठरले स्मार्ट ग्रामरत्नागिरी - शासनाच्या स्मार्ट ग्राम...
पंचगंगा प्रदूषणप्रश्‍नी आयुक्तांना नोटीसकोल्हापूर - जयंती नाल्याचे सांडपाणी थेट...
पदोन्नतीत आरक्षणाचा मार्ग मोकळा;...नवी दिल्ली- अनुसुचित जाती जमातीच्या कर्मचाऱ्यांना...
मुलींना बारावीपर्यंत एसटीचा मोफत पासमुंबई - एसटी महामंडळामार्फत ग्रामीण भागातील...
असा होईल गोकुळ दूध संघ ‘मल्टिस्टेट'कोल्हापूर - जिल्हा सहकारी दूध उत्पादक सहकारी...
वयाच्या 86 वर्षीही सक्रीय राजकारणात डॉ...नवी दिल्ली - देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन...
ड्रोनमुळे कृषी क्षेत्रात क्रांती घडेल...लातूर : वेगवेगळ्या कारणामुळे कृषी क्षेत्र...
लागवड लसूणघासाची...लागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी,...
जळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जलयुक्त शिवारातील जलसंचय सुद्धा आटलाजळगाव : जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवारच्या...
‘स्वाभिमानी’ची २७ ऑक्‍टोबरला जयसिंगपूर...कोल्हापूर  : यंदाच्या हंगामात ऊस उत्पादकांना...
इंधन दरवाढीच्या निषेधार्थ नगर येथे...नगर  : ``राफेल विमान खरेदीत एक हजार कोटींचा...
तूर, हरभऱ्याच्या चुकाऱ्यासाठी परभणी...परभणी  ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
साताऱ्यातील सोयाबीन उत्पादक...सातारा  ः जिल्ह्यात सोयाबीनची काढणी सुरू...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढलीपुणे  : पावसाने दडी मारल्याने पुणे विभागात...
पाऊस नसल्याने नगर जिल्ह्यात ऊस लागवडीवर...नगर   ः जिल्ह्यात यंदा आतापर्यंत ३३ हजार १२३...
वऱ्हाडात उडीद, मुगासाठी खरेदी केंद्रे...अकोला  ः या भागात सध्या मूग, उडदाचा हंगाम...
जळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात...