agriculture news in marathi, government to Government must endeavoured for Sugar Export says PMO | Agrowon

साखर निर्यातीसाठी सरकार ते सरकार प्रयत्न करा
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 26 जून 2018

कोल्हापूर : केंद्र सरकारने साखर निर्यातीला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. निर्यात जादा प्रमाणात होण्यासाठी सरकार ते सरकार (गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट) पातळीबरोबरच व्यावसायिक स्तरावरही प्रयत्न करण्यात यावेत. यासाठी जिथे कुठे शिष्टमंडळ पाठवायची गरज असेल, तर ती पाठविली जावीत, अशा सूचना पंतप्रधान कार्यालयाच्या वतीने संबंधितांना देण्यात आल्या आहेत.

कोल्हापूर : केंद्र सरकारने साखर निर्यातीला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. निर्यात जादा प्रमाणात होण्यासाठी सरकार ते सरकार (गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट) पातळीबरोबरच व्यावसायिक स्तरावरही प्रयत्न करण्यात यावेत. यासाठी जिथे कुठे शिष्टमंडळ पाठवायची गरज असेल, तर ती पाठविली जावीत, अशा सूचना पंतप्रधान कार्यालयाच्या वतीने संबंधितांना देण्यात आल्या आहेत.

पंतप्रधानांचे प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा यांनी सोमवारी (ता.२५) राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, उपाध्यक्ष अमित कोरे, व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे व इस्माच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी केंद्रीय अन्न सचिव रविकांतही बैठकीस उपस्थित होते.

साखरेच्या निर्यातीवरील अनुदानात वाढ करावी, साखरेच्या किमान विक्री दरातही वाढ व्हावी, महाराष्ट्रासाठी ती २९ ऐवजी ३१ रुपये प्रतिकिलो व उत्तर प्रदेशसाठी ३३ रुपये करावी, अशा सूचना साखर उद्योगाच्या प्रतिनिधींशी बैठकीत केल्या. श्री वळसे पाटील यांनी बॅंकेच्या स्तरावरील अडचणीबाबत नाबार्ड व संबंधित बॅंकांना आदेश दिले जावेत, असे सुचविले. असे झाल्यास बॅँकेच्या मालतारण खात्यावर जमा असलेली साखर निर्यातीसाठी उपलब्ध होऊ शकेल. 

अमित कोरे यांनी इथेनॉलच्या दरात वाढ करण्याची मागणी केली. येत्या दोन-तीन दिवसांत इथेनॉलबाबतच्या नव्या धोरणाची घोषणा होणार असल्याचे श्री. मिश्रा यांनी या वेळी सांगितले. बैठकीत साखर उद्योगाविषयीच्या पुढील वर्षाच्या नियोजनाचा आराखडा तातडीने तयार करण्याचे आदेश केंद्रीय अन्न सचिवांना देण्यात आले.

इतर अॅग्रो विशेष
समजून घ्या पाण्याचे महत्त्वपाण्याची समस्या शाश्वत पद्धतीने सोडवण्यासाठी...
जनावरांची तडफड, लोकांचा पाण्यासाठी टाहोसोलापूर ः राज्य शासनाने दुष्काळ जाहीर करून जवळपास...
‘गुणनियंत्रण’विरोधात विखेंचेही पत्र पुणे : राज्याच्या कृषी खात्यातील गुण नियंत्रण...
राज्य बॅंकेकडून साखरेच्या मूल्यांकनात...कोल्हापूर : केंद्राने खुल्या साखरेचे किमान विक्री...
राज्यात उद्या हलक्या पावसाची शक्यतापुणे: वेगाने बदलणारे वातावरण, वाऱ्यांच्या...
प्रेरणा प्रकल्पातून ९० हजार शेतकऱ्यांचे...मुंबई : राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त १४...
कांद्याच्या ढिगाऱ्यात बुजवून घेत...नाशिक  : कमी पाऊस, दुष्काळी परिस्थिती व...
एका संदेशाने आयुष्य केले बळकटटाकळी ढोकेश्वर, जि. नगर  ः काही तासांपूर्वी...
'दावणीलाही नाही आणि छावणीत नाही; जनावरे...सोलापूर :  मागील सरकारच्या काळात छावणीत...
वनहक्काच्या ४३ हजारांहून अधिक...मुंबई : राज्यात मागील अवघ्या तीन महिन्यांत...
खानदेशात मका दरात वाढजळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
पशूपालन अन्‌ गूळनिर्मितीतून शेती केली...राशिवडे (ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) येथील...
दुष्काळातही भाजीपाला शेतीतून मिळविले...लातूर जिल्ह्यातील उमरगा (यल्लादेवी) येथील माळी...
रयत राजाची अन् राजा रयतेचाहिंदवी स्वराज्य संस्थापक, रयतेचा लोककल्याणकारी...
थकीत एफआरपीचा तिढासा  खरेच्या किमान विक्री मूल्यात प्रतिक्विंटल २००...
भारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा...जम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर...
आदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड...कचारगड, जि. गोंदिया : मध्य भारतातील सर्व आदिवासी...
मराठवाड्यात दीड महिन्यात ७७...औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र...
चार वर्षांत संत्रा उत्पादकांची दखलच...नागपूर : कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या आणि...
सांगली जिल्ह्यातील सहा कारखाने...सांगली  ः सहा कारखान्यांनी एकरकमी एफआरपी...