agriculture news in Marathi, Government has worries about soybean, Maharashtra | Agrowon

सोयाबीनच्या टंचाईची सरकारला चिंता
सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 1 मे 2018

नवी दिल्ली ः तेलबियांचे उत्पादन २०१८-१९ मध्ये ३.६ कोटी टनांवर नेण्याचे उद्दिष्ट असले तरी यात महत्त्वाची भूमिका असलेल्या सोयाबीनच्या बियाण्यांची टंचाईची चिंता कृषी खात्याला आहे. सुमारे ९३ हजार किलो बियाण्यांची करमरता भरून काढण्यासाठी सरकारचे प्रयत्न आहेत. 

नवी दिल्ली ः तेलबियांचे उत्पादन २०१८-१९ मध्ये ३.६ कोटी टनांवर नेण्याचे उद्दिष्ट असले तरी यात महत्त्वाची भूमिका असलेल्या सोयाबीनच्या बियाण्यांची टंचाईची चिंता कृषी खात्याला आहे. सुमारे ९३ हजार किलो बियाण्यांची करमरता भरून काढण्यासाठी सरकारचे प्रयत्न आहेत. 

महाराष्ट्र, मध्य प्रदेश, तेलंगण या राज्यांमध्ये गेल्या काही महिन्यांत झालेल्या बिगरमोसमी पावसामुळे सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे ९३,१७० किलोग्राम सोयाबीन बियाण्यांची कमतरता जाणवत असल्याचे कृषी आयुक्त डॉ. एस. के. मल्होत्रा यांचे म्हणणे आहे. बियाणे कमतरतेवर मात करण्याचे प्रयत्न सुरू असून, शेतकऱ्यांनी साठविलेल्या सोयाबीन बियाण्याचा ‘बीज प्रक्रिया’ करून वापर करावा, असा सल्ला कृषी खात्याने दिला आहे. 

सोयाबीन, भूईमूग, तीळ, सूर्यफूल, एरंड आदी तेलबियांचे २०१७-१८ मध्ये उत्पादन ३ कोटी टनांपर्यंत पोचण्याचा सरकारचा अंदाज आहे. नव्या वर्षात पावसाच्या अनुकूल अंदाजामुळे तेलबियांचे उत्पादन साठ लाख टनांनी म्हणजेच ३.६ कोटी टनांपर्यंत नेण्याचे लक्ष्य सरकारने ठरविले आहे. विशेषतः धानाचे उत्पादन कमी होणाऱ्या क्षेत्रात तेलबियांचे उत्पादन घेण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठी यात सोयाबीनवर भर देताना सरकारने पारंपरिक लागवड क्षेत्र वगळता बिहार, झारखंड, ओडिशा या राज्यांमध्येही सोयाबीनचे क्षेत्र विस्तारण्याचे नियोजन आखले आहे. मात्र सोयाबीनच्या बियाण्याची टंचाई सरकारला भेडसावत आहे. 

इतर अॅग्रो विशेष
उच्च जीवनमूल्य जपणारी आदिवासी संस्कृती मेळघाटात अंधश्रद्धेचे प्रमाण खूप आहे. यावर...
आर्थिक विकासवाट . देशात नोटाबंदीच्या निर्णयाला नुकतीच दोन वर्षे...
खानदेशातील जलसाठ्यात घट जळगाव : खानदेशात पाणीबाणी वाढू लागली असून,...
जिनर्स कापूस खरेदी केंद्रांसाठी ९००...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस...
राज्यात दुधाचे दर पुन्हा घसरलेपुणे: राज्यात होत असलेल्या जादा दुधाच्या...
दावणीला आणि छावणीला परिस्थितीनुसार चारा...बीड : राज्यात सरासरीच्या ७० टक्के पाऊस पडला असून...
सत्ताधाऱ्यांना नमवण्याची ताकद...मुंबई : गेल्या चार वर्षांत देश चुकीच्या...
दुष्काळातही माळरानावर हिरवाई फुलवण्याचे...लातूर जिल्ह्यातील वाघोली येथील सोनवणे कुटुंब...
सेंद्रिय पद्धतीने ऊस लागवड ते...लातूर येथील विलास सहकारी साखर कारखान्याने...
श्री विठ्ठल-रुक्मिणीचे २४ तास दर्शनसोलापूर ः पंढरपुरात श्री विठ्ठल -रुक्मिणीच्या...
हरभरा पेरणी ३३ टक्क्यांनी माघारलीनवी दिल्ली ः देशातील दुष्काळी स्थितीचा परिणाम...
राणी लक्ष्मीबाईंचे गाव बनले पाणीदारसातारा: झाशीची राणी लक्ष्मीबाईंचे मूळ गाव म्हणजे...
विदर्भापाठोपाठ मराठवाडा, मध्य...पुणे : राज्यात किमान तापमानाचा पारा घसरल्याने...
खानदेशात जनावरांची निम्म्या दरात विक्रीचाळीसगाव, जि. जळगाव ः लांबलेल्या व अवेळी पडलेल्या...
रब्बी पेरणी २० टक्क्यांनी घटलीनवी दिल्ली ः देशातील बहुतांशी भागात यंदाच्या...
सातारा, सोलापूर, परभणीत ऊसदरासाठी आंदोलनपुणे ः गेल्या गळीत हंगामातील थकबाकी द्यावी तसेच...
निर्यातीच्या केळीला १८०० रुपये दरजळगाव ः राज्यात निर्यातीच्या केळीला यंदा उच्चांकी...
नागपूर, गोंदिया गारठलेपुणे : उत्तरेकडील वाऱ्यांच्या प्रभावामुळे राज्यात...
ऊसदराबाबत हवे दीर्घकालीन धोरणऊसदराचा प्रश्न मिटत नाही तोपर्यंत आम्ही कोणताही...
दक्षिण महाराष्टात ऊसतोडी सुरूकोल्हापूर : ऊसदराचा तिढा शनिवारी (ता. ११) दुपारी...