agriculture news in Marathi, government land will give for fodder sowing, Maharashtra | Agrowon

चारा लागवडीसाठी शासकीय जमिनी देणार
टीम अॅग्रोवन
शनिवार, 17 नोव्हेंबर 2018

मुंबई : राज्यावरील दुष्काळाचे संकट लक्षात घेऊन सरकारने जनावरांना लागणाऱ्या चाऱ्यासाठी कंबर कसली आहे. चाराटंचाईवर पर्याय म्हणून शेतकऱ्यांना एक रुपया भाडेपट्ट्याने जमीन दिली जाणार आहे. जलसंपदा विभागाच्या अखत्यारीतील जलाशय, तलावाखालील जमीन शेतकऱ्यांना रब्बी आणि उन्हाळी हंगामासाठी दिली जाईल.

मुंबई : राज्यावरील दुष्काळाचे संकट लक्षात घेऊन सरकारने जनावरांना लागणाऱ्या चाऱ्यासाठी कंबर कसली आहे. चाराटंचाईवर पर्याय म्हणून शेतकऱ्यांना एक रुपया भाडेपट्ट्याने जमीन दिली जाणार आहे. जलसंपदा विभागाच्या अखत्यारीतील जलाशय, तलावाखालील जमीन शेतकऱ्यांना रब्बी आणि उन्हाळी हंगामासाठी दिली जाईल.

पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि अन्य योजनांच्या माध्यमातून यासाठी बियाणे, पाणी आणि वीज मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे. मुख्य सचिव दिनेशकुमार जैन यांनी गुरुवारी (ता. १५) या संदर्भातील शासन निर्णय जारी केला. सरकारने राज्यातील १५१ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. या तालुक्यांमध्ये दुष्काळी उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. चाराटंचाई लक्षात घेऊन सरकारने त्याचे नियोजन करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. शेतकऱ्यांना संबंधित तालुक्यातच किंवा जवळच्या तालुक्यात चारा उपलब्ध व्हावा, असे नियोजन आहे.

जलसंपदा विभागाच्या प्रकल्पात पाणीसाठा कमी झाल्याने बुडिताखालील जमिनी मोकळ्या आहेत. या जमिनी वैरण पिकांच्या लागवडीसाठी अतिशय उपयुक्त असतात. या जमिनी रब्बी आणि उन्हाळी हंगामासाठी शेतकऱ्यांना नाममात्र एक रुपया भाडेपट्ट्याने देण्यात येतील. या जमिनीवर जनावरांसाठी वैरण पिके घेण्यात येतील. त्यासाठी शेतकऱ्यांना विविध योजनांमधून मोफत बियाणे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. वैरण पिकासाठी जलाशयातील पाणीसुद्धा विनामूल्य दिले जाईल. हा चारा शेतकऱ्यांना स्वत:च्या पशुधनासाठी उपयोगात आणता येईल. अतिरिक्त चारा शिवारातील इतर दूध उत्पादक शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावा लागणार आहे. 

येत्या २४ नोव्हेंबरपर्यंत या योजनेचा प्रचार प्रसार करण्यात येणार असून, इच्छुक लाभार्थ्यांकडून ४ डिसेंबरपर्यंत अर्ज मागवण्यात येणार आहेत. पात्र लाभार्थ्यांची यादी येत्या १० डिसेंबरपर्यंत जाहीर करण्यात येणार असून, १४ डिसेंबरपर्यत त्यांना सामग्रीचे वितरण करण्यात येणार आहे. हा वैरण विकास कार्यक्रम दुष्काळी कालावधीपुरताच मर्यादित राहणार आहे.

प्रत्येक जिल्ह्यात उपक्रम
प्रत्येक जिल्ह्यात किमान २ हजार हेक्टर क्षेत्रावर चारापिके, वैरण पिकांची लागवड करणे बंधनकारक करण्यात आले आहे. चारा लागवडीसाठी योग्य क्षेत्राचे सर्वेक्षण करून जमीन भाड्याने देण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत. तसेच चाराटंचाई निवारणासाठी लाभार्थी निवड, समन्वयासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीही स्थापन करण्यात आली आहे. याअंतर्गत मक्का, ज्वारी, बाजरी तसेच न्यूट्रिफीडसारख्या चाऱ्यांच्या उत्पादनावर भर देण्यात येणार आहे.
 

 

इतर अॅग्रो विशेष
परभणीत मुगाची चार क्विंटल, तर उडदाची...परभणी ः जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामातील मुगाची...
कृषीच्या पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेश... पुणे ः राज्यातील चारही कृषी विद्यापीठांमध्ये...
दर कपातीने दूध उत्पादक मेटाकुटीसपुणे ः शासनाने गाईच्या दुधासाठी प्रतिलिटर २५...
‘ईपीआर’ कंपन्यांच्या भल्यासाठी दूध...पुणे : पॉलिथिन फिल्मचे पुनर्चक्रण करणाऱ्या काही '...
जिद्द दुष्काळातही गोड पेरू पिकवण्याची...पुणे जिल्ह्यात शिरूर या कायम दुष्काळी तालुक्यातील...
सुधारीत तंत्राने तरारला दर्जेदार भुईमूग तुळ्याचा पाडा (जि. पालघर) येथील आर्थिकदृष्ट्या...
विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाजपुणे ः मध्य महाराष्ट्राच्या परिसरात चक्राकार...
दुष्काळी भागात चारा छावण्या ः चंद्रकांत...मुंबई : राज्यातील दुष्काळी भागात गरज आणि...
कृषिकेंद्रित ग्रामविकासाची पायाभरणी! स्वातंत्र्योत्तर कालखंडापासून भारतीय कृषी...
जाणिवेचा दुष्काळ नको राज्य शासनाने दुष्काळ जाहीर...
वृक्ष होऊन जगू यामागील आठवड्यात असाच एक मुलाखतीचा सुंदर, कार्यक्रम...
एकत्र या, निर्यात वाढेलकेंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून शेतमाल...
राज्यात कांदा उत्पादकांचा आक्रोश... पुणे ः राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये...
रोजगाराच्या शोधात गेलेल्या १२ जणांचा...महागाव, जि. यवतमाळ : कापूस वेचणीसाठी गेलेल्या...
देशभरात ४१४ लाख हेक्टरवर रब्बी पेरणी नवी दिल्ली ः देशात अनेक ठिकाणी दुष्काळी...
संत्रा बाग छाटणी सयंत्र ठरतेय केवळ...नागपूर ः शेतकऱ्यांना पूरक तंत्रज्ञान देण्यात...
होय... सरकीपासून चॉकलेट, कुकीज नागपूर : सरकीपासून ढेप आणि तेल मिळते ही झाली...
पीकपद्धतीनूसार बहुविध यंत्रांचा...हंगामी व वार्षिक नगदी पिके व फळपिके अशा बहुविध...
विदर्भात गारपिटीचा अंदाजपुणे : पूर्वेकडून वाहत असलेल्या उष्ण वाऱ्यांमुळे...
गाळपेर क्षेत्रातून उपलब्ध होणार ३४ लाख...पुणे ः राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या...