सरकारला गुडघे टेकायला लावतो ः खासदार शेट्टी

सरकारला गुडघे टेकायला लावतो ः खासदार शेट्टी
सरकारला गुडघे टेकायला लावतो ः खासदार शेट्टी

नातेपुते, जि. सोलापूर :  कर्नाटक, गुजरात राज्याप्रमाणे दूध उत्पादकांच्या नावावर सरकारने प्रतिलिटर ५ रुपये अनुदान जमा करावे, यासाठी शेतकरी संघटनेने १६ जुलैपासून दूधविक्री बंद आंदोलन पुकारले असून दूधउत्पादकांनी या आंदोलनास साथ द्यावी. या सरकारला तुमच्यापुढे गुडघे टेकायला लावतो, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी केले.

या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर येथे आयोजित मेळाव्यात शेट्टी बोलत होते. या वेळी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष भीमराव फुले, जिल्हाध्यक्ष समाधान फाटे, मनसेचे अप्पा करचे, खंडकरी शेतकरी संघटनेचे नेते बी. डी. पाटील, दहिगावचे सरपंच ॲड. रणधीर पाटील  उपस्थित होते.

शेट्टी म्हणाले, ‘‘मुंबईला दररोज ७० लाख लिटर दूध लागते. कर्नाटक, गुजरातमधून एक लिटरदेखील दूध महाराष्ट्रत येणार नाही, याची खबरदारी आम्ही घेतली आहे. पांडुरंगाला व महादेवाला अभिषेक करून १५ जुलैला रात्रीपासून दूध विक्री बंद आंदोलन सुरू केले जाईल."

" शेतकरी, दूध उत्पादक आक्रोश करतोय. आत्महत्या करतोय. हे सरकारला दिसत नाही का? या देशातील १ लिटर दूध निर्यात होत नाही आणि सरकार म्हणते दूध निर्यात करा, मग अनुदान देऊ. दूध संघचालकांनी आणि सरकारने दुधभुकटीतील ५३ कोटी रुपये खाल्ले. जर्शी गाय पाळू नका. देशी पाळा, गोमूत्र विका, सेंद्रिय शेती करा, यज्ञ करा, असे केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह सांगतात. अशी माणस सत्तेवर आली हे दुर्दैव आहे," असेही शेट्टी यांनी सांगितले.

"सरकारने थेट आमच्या खात्यावर ५ रुपये अनुदान द्यावे. ग्राहकांवर बोजा नको आहे. शहरी लोकांना माझे आवाहन आहे, आमची जीवन जगण्याची पद्धत आणि कष्ट पहा. पाणी २० रुपये लिटर आणि दूध १५ रुपये लिटर, हे कोणते गणित आहे", असा प्रश्न शेट्टी यांनी सरकारला विचारला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com