agriculture news in Marathi, government may procured onion, Maharashtra | Agrowon

सरकार कांदा खरेदी करण्याची शक्यता
कोजेन्सिस वृत्तसेवा
बुधवार, 21 फेब्रुवारी 2018

नवी दिल्ली : देशात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काढणीच्या हंगामात बाजारात आवक वाढत असल्याने अत्यंत कमी दर मिळतो. तर बाजारात आवक कमी असते तेव्हा कांदा दर प्रचंड वाढतात आणि ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागतात. त्यामुळे येणाऱ्या महिन्यांमध्ये जेव्हा शेतकऱ्यांचा कांदा मोठ्या प्रमाणात बाजारात विक्रिसाठी येईल तेव्हा सरकार खरेदी करून साठा करेल. बाजारात आवक कमी होऊन दर वाढतील तेव्हा सरकार हा साठा बाहेर काढून ग्राहकांना दिलासा देण्याचे काम करेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

नवी दिल्ली : देशात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काढणीच्या हंगामात बाजारात आवक वाढत असल्याने अत्यंत कमी दर मिळतो. तर बाजारात आवक कमी असते तेव्हा कांदा दर प्रचंड वाढतात आणि ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागतात. त्यामुळे येणाऱ्या महिन्यांमध्ये जेव्हा शेतकऱ्यांचा कांदा मोठ्या प्रमाणात बाजारात विक्रिसाठी येईल तेव्हा सरकार खरेदी करून साठा करेल. बाजारात आवक कमी होऊन दर वाढतील तेव्हा सरकार हा साठा बाहेर काढून ग्राहकांना दिलासा देण्याचे काम करेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

दर वर्षी कांदा काढणीच्या हंगामात जेव्हा बाजारात मालाची आवक वाढते तेव्हा व्यापारी दर पाडतात. कमी दरात कांदा खरेदी करून साठवणूक करतात आणि जेव्हा शेतकऱ्यांचा माल बाजारात येणे बंद होतो आणि दर वाढतात तेव्हा वाढलेल्या दराचा फायदा घेण्यासाठी व्यापारी आपला साठा बाहेर काढतात. वाढलेल्या दराने ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागतात.

परंतु, त्याचा फायदा शेतकऱ्यांना काहीच होत नाही. कांदा दर वाढल्यास त्याचा मोठा राजकीय तोटा ही होत असतो. विरोधक नेहमीच हा प्रश्न उचलून धरतात. त्यामुळे कांदा दराचा प्रश्न सोडविण्यासाठी काय उपाययोजना करता येतील यावर चर्चा करण्यासाठी नुकतीच मंत्री बैठक झाली. या बैठकीत कांदा आणि टोमॅटो या दोन्ही पिकांचा सद्यस्थितीतील बाजाराचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर कांदा दरावर नियंत्रण आणण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

देशात डिसेंबर महिन्यात बाजारात आवक कमी झाल्याने कांदा दर वाढून किरकोळ दर ८० रुपयांपर्यंत गेले होते. खरिपात कांदा पिकाला फटका बसल्याने बाजारात आवक कमी झाली होती. कांदा दर नियंत्रणात आणण्यासाठी निर्यात शुल्क वाढविणे, आयातीला प्रोत्साहन देणे तसेच साठा मर्यादा लावणे आदी उपाय सरकारने केले होते. सध्या बाजारात आवक वाढल्याने कांदा दर कमी होत आहेत. येणाऱ्या महिन्यात आवक आणखी वाढेल तेव्हा दर आणखी कमी होतील. मागील आठवड्यात लासलगाव बाजारात मागील चार महिन्यांतील सर्वात कमी दर कांद्याला मिळाला होता. 

शेतकरी आणि ग्राहकांना दिलासा
शेतकरी जेव्हा कांदा काढणी करतात आणि बाजारत विक्रीसाठी आणतात त्या वेळी कांदा दर आवक वाढल्याने कमी होतात. शेतकऱ्यांना मिळणारा दर हा खूपच कमी असल्याने उत्पादन खर्चही निघत नाही आणि शेतकरी अडचणीत येतात. एकदा शेतकऱ्यांचा कांदा विकून झाला आणि बाजारात आवक मंदावली की व्यापारी आपला माल टप्प्याटप्प्याने बाहेर काढतात आणि वाढलेल्या दराचा फायदा घेतात. ग्राहकांना या वेळी जास्त पैसे मोजावे लागतात; परंतु याचा फायदा थेट शेतकऱ्यांना होत नाही. त्यामुळे सरकार जेव्हा शेतकरी कांदा बाजारात विक्रीसाठी आणतील त्या वेळी खरेदी करेल आणि साठा करेल आणि बाजारात जेव्हा कांदा आवक कमी होऊन दर वाढतील तेव्हा विक्री करेल आणि दर नियंत्रणात आणेल. यामुळे शेतकरी आणि ग्राहक दोन्हींनाही दिलासा मिळेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

दर कसा ठरविणार?
सरकारने शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा, यासाठी कांदा खरेदीचा निर्णय घेतला आहे. मात्र सरकार केवळ २३ पिकांचे हमीभाव जाहीर करते त्यामध्ये कांद्याचा समावेश नाही. त्यामुळे सरकार कोणत्या दराने कांदा खरेदी करणार आणि खरेदी दर कसा ठरविणार हा प्रश्न मात्र अद्यापही कायम आहे. मात्र सरकारने कांदा खरेदी केल्यास इतर पिकांप्रमाणे कांदा दरही वाढण्यास मदत होईल आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. 
 

इतर अॅग्रो विशेष
अकोला जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांना देणार...अकोला ः देशात राबवल्या जात असलेल्या प्रधानमंत्री...
दक्षिण महाराष्ट्रातील कारखान्यांत ८०...सांगली/कोल्हापूर ः साखरेला दर नसल्याने निराश...
सीताफळाच्या योग्य जातींची करा लागवडमहाराष्ट्रात सीताफळाच्या झाडांचे काही नैसर्गिक...
उत्पादकांसाठी बेदाणा गोडसांगली ः यंदाच्या बेदाणा हंगामात बेदाण्याच्या...
केळी दरात किंचित सुधारणाजळगाव ः रावेर, यावलमध्ये केळीची आवक वाढलेली...
मका चार वर्षांतील नीचांकी पातळीवरनवी दिल्ली ः बजारात मका आवक वाढल्यांतर मागणी कमी...
कामाच्या अतिरिक्त ताणामुळे पणन संचालक...पुणे ः पणन संचालकपदी पूर्णवेळ नियुक्ती असताना...
​​राज्य सरकार राबविणार मधुमक्षिका मित्र...पुणे : शहरी भागात मधुमक्षिकांचे पोळे दिसले, की ते...
ग्रामस्वच्छता अभियानात प्रभाग, गटातून...नगर ः ग्रामीण भागात स्वच्छतेची व्यापी...
केसर आंबा पाडाला आलाय...औरंगाबाद : आपली चव, गंध आणि रूपाने ग्राहकांना...
बदल्या समुपदेशनानेच...पुणे : राज्याच्या कृषी विभागात समुपदेशनाने बदल्या...
अरबी समुद्रात चक्रीवादळाचे संकेतपुणे : ‘सागर’ चक्रीवादळापाठोपाठ अरबी समुद्रात...
पाणलोट, मृदसंधारण घोटाळ्याचा पर्दाफाशपुणे : कृषी खात्यातील पाणलोट व मृदसंधारण...
ब्राझील, थायलंडचा यंदा इथेनॉलकडे वाढता...कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय बाजारात सर्वत्रच...
बारमाही भाजीपाला शेतीला नर्सरी...ब्राह्मणगाव (जि. नाशिक) येथील केवळ वाघ पूर्वी...
सुधारित तंत्राची मिळाली गुरुकिल्लीअकोला जिल्ह्याचे मुख्य उन्हाळी पीक कांद्याची...
भाराभर चिंध्या राज्यात १२७ वा पशुसंवर्धन दिन नुकताच साजरा...
मथुरेचं दूध का नासलं?राज्यात मे महिन्याचे तापमान यंदा नैसर्गिक आणि...
चिमुरड्याच्या कॅमेऱ्यात कैद आनंदी शेतकरीआपल्याकडील शेतकरी आनंदी असू शकतो का? उत्तर...
‘अ’तंत्र निकेतनपुरेसा अभ्यास आणि तयारीअभावी, यंत्रणेचा विरोध...