agriculture news in marathi, the government is not serious about reservation, pune, maharashtra | Agrowon

मराठा, धनगर आरक्षणाबाबत सरकारला गांभीर्य नाही
टीम अॅग्रोवन
शनिवार, 9 जून 2018

पुणे  ः मराठा आणि धनगर आरक्षणाबाबत सरकारला गांभीर्य नाही. आयाेग, समित्या स्थापन करून या प्रश्नाचे भिजत घाेंगडे ठेवत, वेळ मारून न्यायची हा एककलमी कार्यक्रम सरकारचा आहे. आरक्षणाबाबत उच्च न्यायालयात सरकारची बाजू प्रभावीपणे मांडण्यासाठी अतिवरिष्ठ वकिलांची नियुक्तीच केली नसल्याचा आराेप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.

पुणे  ः मराठा आणि धनगर आरक्षणाबाबत सरकारला गांभीर्य नाही. आयाेग, समित्या स्थापन करून या प्रश्नाचे भिजत घाेंगडे ठेवत, वेळ मारून न्यायची हा एककलमी कार्यक्रम सरकारचा आहे. आरक्षणाबाबत उच्च न्यायालयात सरकारची बाजू प्रभावीपणे मांडण्यासाठी अतिवरिष्ठ वकिलांची नियुक्तीच केली नसल्याचा आराेप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने गुरुवारी (ता. ७) आयाेजित वार्तालापात श्री. पवार बाेलत हाेते. श्री. पवार म्हणाले, की आरक्षणाबाबतचा सविस्तर अहवाल आघाडी सरकारने अभ्यासाअंती सादर केला आहे. यानंतर सत्तांतर झाल्यानंतर केंद्रात आणि राज्यात भाजप-शिवसेना युतीची सत्ता आली. मुख्यमंत्र्यांनी निवडणुकांच्या प्रचारामध्ये सत्ता आल्यावर पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत आरक्षण देण्याचे आश्‍वासन दिले हाेते. मात्र सत्ता आल्यानंतर साेयीने हा विषय बाजूला केला असून, सरकार केवळ समित्या, आयाेग नेमून वेळ मारून नेण्याचे काम करत आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या एक-दाेन बैठका झाल्या; मात्र यांनतर एकही बैठक झाली नसल्याने या विषयाबाबत सरकारला भिजत घाेंगडे ठेवायचे आहे. केंद्र आणि राज्य सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरले आहे.

देशपातळीवर शेतकऱ्यांचे २२ हजार काेटी देणी थकीत असताना, केवळ ८५०० काेटींच्या पॅकेजमध्ये दम नाही असे म्हणत, तूर, साखर, हरभरा बाबतीत सरकारचे निर्णय चुकल्याने शेतकऱ्यांचे काेट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रश्नांवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी वारंवार पंतप्रधान नरेंद्र माेदी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या भेटी घेऊन उपाययाेजनांची कल्पना दिली हाेती.
 

अजित पवार म्हणाले,

  • शिवसेना, भाजपला एकत्र येण्याशिवाय गत्यंतर नाही. वेगळे लढले तर त्यांचा पत्ता कट हाेईल.
  • आघाडी आणि युतीबाबत माझ्या आणि संजय राऊत यांच्या विचाराला किंमत नाही, शेवटी निर्णय राष्‍ट्रीय पातळीवरच हाेताे. ताे आम्हाला मान्य करावाच लागताे.
  • भाजप शेवटच्या वर्षात जाहिरातींवर हजाराे काेटी रुपये खर्च करेल.
  • ज्या व्यापाऱ्यांनी भाजपला पक्ष निधी दिला. त्यांना आता पश्‍चातापाची वेळ आली आहे.
  • - नाेटाबंदीमुळे सर्वच क्षेत्रांत मंदी आहे.

इतर ताज्या घडामोडी
राज्यातील चौदा मतदारसंघांत आज मतदानमुंबई   ः लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
स्थानिक घटकांपासून नावीन्यपूर्ण सौर...तीव्र थंडीच्या स्थितीमध्ये वापरण्यायोग्य सौर...
जळगावात हरभऱ्याची ऑनलाइन नोंदणी आज बंदजळगाव : जिल्ह्यात शासकीय हरभरा खरेदीसाठी अजून...
रावेर, जळगावसाठी आज मतदानजळगाव : लोकसभा निवडणुकीच्या जळगाव व रावेर...
वाळूउपशामुळे विहिरींच्या पाणीपातळीत घटनाशिक : बागलाण तालुक्यातील ताहाराबाद ...
नांदेड जिल्ह्यात अडीच हजार कोटींचे...नांदेड ः नांदेड जिल्ह्यातील विविध बॅंकांना २०१९-...
राज्याचे एक थेंबही पाणी गुजरातला देऊ...नाशिक  : ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी...
धर्मराजाचा कडाही यंदा आटलामाजलगाव, जि. बीड : माजलगाव धरणालगतच असलेला...
लक्षवेधी माढ्यासाठी आज मतदानसोलापूर  : अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या...
जळगाव बाजारात केळी दरात सुधारणाजळगाव ः जिल्ह्यात मुक्ताईनगर व रावेरात दर्जेदार...
नगरमध्ये प्रशासन गुंतले निवडणुकीत,...नगर  : दुष्काळात जनावरे जगविण्यासाठी चारा...
पुणे विभागात तेरा हजार हेक्टरवर चारा...पुणे : पाणीटंचाईमुळे चाऱ्याची चांगलीच टंचाई...
पुणे जिल्ह्यात पाणीटंचाईमुळे फळबागा...पुणे  ः कमी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील...
नगर लोकसभा मतदारसंघात आज मतदाननगर : नगर लोकसभा मतदारसंघासाठी आज (मंगळवारी) २०३०...
यवतमाळ जिल्ह्यात दोन लाख टन खतांची मागणीयवतमाळ  : येत्या खरीप हंगामासाठी कृषी...
यवतमाळ जिल्ह्यात होणार ६६४ विहिरींचे...यवतमाळ  ः जिल्ह्यात दिवसेंदिवस गंभीर होत...
कळमणा बाजारात तुरीच्या दरात सुधारणानागपूर ः कळमणा बाजार समितीत तुरीची आवक...
अमरावतीतील दहा हजारांवर शेतकऱ्यांचे... अमरावती  ः निसर्गाचा लहरीपणामुळे शेतकरी...
शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेच्या...जळगाव   ः लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक...
शेतकरी आणि व्यापाऱ्यांमधील ...नाशिक  : कृषी अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी...