agriculture news in marathi, government orders to fulfill the employees in Market committees | Agrowon

साठ बाजार समित्यांमध्ये कर्मचारी नियुक्तीचे आदेश
टीम अॅग्रोवन
सोमवार, 5 फेब्रुवारी 2018

पुणे : अपुऱ्या आणि प्रशिक्षित मनुष्यबळाअभावी ई-नामच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अडचणी निर्माण हाेत आहेत. या पार्श्वभूमीवर ई-नाममध्ये समाविष्ट झालेल्या ६० बाजार समित्यांमध्ये प्रत्येकी ९ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचे आदेश पणन संचालक डॉ. आनंद जाेगदंड यांनी बाजार समित्यांना दिले आहेत.

पुणे : अपुऱ्या आणि प्रशिक्षित मनुष्यबळाअभावी ई-नामच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अडचणी निर्माण हाेत आहेत. या पार्श्वभूमीवर ई-नाममध्ये समाविष्ट झालेल्या ६० बाजार समित्यांमध्ये प्रत्येकी ९ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचे आदेश पणन संचालक डॉ. आनंद जाेगदंड यांनी बाजार समित्यांना दिले आहेत.

आॅनलाइन राष्ट्रीय ॲग्रिकल्चर मार्केट (ई-नाम) या इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्म याेजनेअंतर्गत राज्यातील ६० बाजार समित्यांची निवड करण्यात आली आहे. आॅनलाइन लिलावाच्या तांत्रिक पायाभूत सुविधांसाठी प्रत्येक बाजार समितीला ३० लाखांचा निधी आणि संगणक प्रणाली केंद्र सरकारच्या वतीने माेफत दिली आहे. मात्र, ही याेजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी हाेत नसल्याचे वास्तव असून, नुकत्याच मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या आढावा बैठकीमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली हाेती. 

यानंतर या याेजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शेतमालाची प्रवेशद्वारावर आणि वाहने बाहेर पडणाऱ्या द्वारावरच शेतमालाच्या आवक जावकेची संगणकीय प्रणालीमध्ये नाेंदणी करणे, गुणवत्ता तपासणी, शेतमालाची मांडणी, आॅनलाइन लिलाव, शेतमालाचे वजन, बिल तयार करणे आदी विविध कामांसाठी कंत्राटीपद्धतीने नियुक्ती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, तर शेतमालाच्या आवक जावकेच्या नाेंदणीसाठी बाजार समिती कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, तर उर्वरित कामांसाठी नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, असे आदेश देण्यात आले आहेत. संगणकीय कामकाजासाठी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची प्रतिमहिना १५ हजार रुपये वेतनावर नियुक्ती करावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

इतर ताज्या घडामोडी
I transfer my JOSH to you...पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी...
जीवलग मित्र गेला...मनोहर गेला. हे जरी सत्य असले तरी ते मान्य होणे...
जबरदस्त, प्रभावी इच्छाशक्तीचे केंद्र :...लहानपणापासूनच कुठलीही गोष्ट एकदा ठरवली की, तो ती...
तळपत्या सूर्याचा अस्त !राजकारणी माणसाला यश आणि अपयशाचा सामना रोजच करावा...
विदर्भात कापूस पोचला प्रतिक्विंटल ५९१५...नागपूर ः शेतकऱ्यांकडील कापूस संपल्यापनंतर आता...
पुणे बाजारात घेवडा, मटारच्या भावात वाढपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
पुणे जिल्ह्यात शेतकरी सन्मान योजनेच्या...पुणे : केंद्र सरकारने पंतप्रधान शेतकरी सन्मान...
हिंगोलीतील २७ हजार लोकसंख्या पाण्यासाठी...हिंगोली ः हिंगोली जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी...
खानदेशात चारा प्रश्‍न गंभीरजळगाव ः खानदेशात सद्यःस्थितीत निर्माण झालेल्या...
दुष्काळमुक्त मराठवाड्याचा संकल्प ः...औरंगाबाद: पन्नास टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात...
छपन्न इंचीच्या छातीच्या गप्पा कशाला?ः...चाकण, जि. पुणे: देशाचे पंतप्रधान देश माझ्या मुठीत...
योग्य पद्धतीनेच करा बांबू तोडणीपरिपक्व बांबू हा दरवर्षी तोडला पाहिजे, तरच त्याला...
औरंगाबादला कैरी प्रतिक्विंटल ३५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
कृषी क्षेत्रात निर्मिती उद्योगाच्या...अकोला : कृषी क्षेत्रात बायोफर्टिलायजर,...
खानदेशात भुईमूग पीक जेमतेमजळगाव : भुईमुगाचे पीक खानदेशात जेमतेम आहे. त्याचे...
सोलापूर जिल्हा बॅंकेतही मिळणार ‘सन्मान...सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचा...
लाल कांद्याच्या दरात सुधारणाजळगाव : लाल कांद्याची जळगावसह धुळे, साक्री येथील...
प्रस्तावित सुरत-हैदराबाद...नाशिक : केंद्राच्या भारतमाला योजनेंतर्गत...
शेवगाव, पाथर्डीत शेळ्या-मेंढ्यांच्या...शेवगाव, जि. नगर : दुष्काळी परिस्थितीत सरकारने...
सांगलीचा प्रश्‍न दिल्लीदरबारीसांगली ः सांगली लोकसभा मतदारसंघ स्वाभिमानीला...