सरकारकडून सन्मानजनक प्रस्ताव आला तरच चर्चा

सरकारकडून सन्मानजनक प्रस्ताव आला तरच चर्चा
सरकारकडून सन्मानजनक प्रस्ताव आला तरच चर्चा

मुंबई : दूधप्रश्नावर शेतकऱ्यांची मागणी अत्यंत माफक असल्याने ती मागणी कशाप्रकारे पूर्ण करणार याबाबत चर्चेअगोदर प्रस्ताव द्यावा, अशी विनंती संघर्ष समितीने राज्य सरकारला केली आहे. राज्य सरकारने सन्मानजनक प्रस्ताव दिल्यास पुढे चर्चा केली जाईल, अशी भूमिका संघर्ष समितीने घेतली आहे.  राज्य किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी ही माहिती दिली.दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने दूध दरप्रश्नी तोडगा काढण्यासाठी सरकारच्या वतीने रविवारी (ता. ६) मंत्री गिरीश महाजन यांच्यामार्फत चर्चेसाठी निरोप देण्यात आला होता. त्यानुसार काल (ता. ७) दुपारी २ वाजता मंत्रालयात बैठक बोलावण्यात आली होती. संघर्ष समितीने चर्चेच्या या प्रस्तावाचे स्वागत केले आहे. मात्र, दूधप्रश्नावर शेतकऱ्यांची मागणी अत्यंत माफक असल्याने ती मागणी सरकार कशा प्रकारे पूर्ण करणार याबाबत चर्चेअगोदर सरकारने प्रस्ताव द्यावा, अशी मागणी समितीने केली आहे. सरकारने सन्मानजनक प्रस्ताव दिल्यास नक्की चर्चा करू, अशी भूमिका संघर्ष समितीने घेतली आहे. प्रस्तावाशिवाय चर्चा निष्फळ ठरते, हा अनुभव पाहता समितीने हा निर्णय घेतला आहे. तसेच दूध उत्पादकांच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय व मान्य मागण्यांच्या अंमलबजावणी बाबत ठोस कृती झाल्याशिवाय आंदोलन मागे घेण्याचा कोणताच प्रश्न उपस्थित होत नाही. दुधाला सरकारने हमीभाव दिल्याप्रमाणे प्रतिलिटर २७ रुपये दर व दूध व्यवसायात वारंवार निर्माण होणारे संकट कायमस्वरूपी दूर करण्यासाठी पर्यायी दूध धोरण या मागण्या संपूर्णपणे मान्य झाल्याशिवाय संघर्ष थांबणार नाही. आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असे डॉ. नवले यांनी म्हटले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com