बारामतीत सरकारी तूर खरेदी केंद्र

बारामतीत सरकारी तूर खरेदी केंद्र
बारामतीत सरकारी तूर खरेदी केंद्र

बारामती ः येथील बाजार समितीत नाफेड, मार्केटिंग फेडरेशन व नीरा कॅनॉल खरेदी-विक्री संघाच्या सहकार्याने सरकारी तूर खरेदी केंद्र मंगळवारपासून (ता. ६) सुरू झाले. या केंद्रावर अटी, शर्ती पूर्ण करणाऱ्या तूर उत्पादकांना प्रतिक्विंटल ५ हजार ४५० रुपये हमीभाव मिळणार आहे. हे केंद्र येत्या १४ एप्रिल २०१८ पर्यंत सुरू राहणार आहे. मागील वर्षी तूर खरेदी उशिरा सुरू झाली होती. मात्र, बारामती बाजार समितीने या वर्षी लवकर पाठपुरावा करून या केंद्राचा प्रस्ताव मंजूर करून घेतला. बाजार समितीचे सभापती अनिल हिवरकर व ‘राष्ट्रवादी’चे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांच्या उपस्थितीत हे केंद्र मुख्य यार्डात सुरू करण्यात आले. या वेळी समितीचे उपसभापती बापट कांबळे, विठ्ठल खैरे, राजेंद्र बोरकर, दत्तात्रेय सणस, बाळासाहेब पोमणे, लक्ष्मण मोरे, शंकर सरकस, सदाशिव पागळे, अमोल कदम, प्रशांत मदने आदी उपस्थित होते. दरम्यान, बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, या केंद्रावर तूर आणण्यापूर्वी शेतकऱ्यांनी बारामतीतील नीरा कॅनॉल संघाकडे ऑनलाइन नोंद करण्याची अट आहे. यानंतर शेतकऱ्यांना मोबाईलवर मेसेज पाठविला जाणार असून, मेसेज मिळाल्यानंतर संबंधित तूर उत्पादकांनी त्यांची तूर स्वच्छ व वाळवून खरेदी केंद्रावर आणावयाची आहे.  मार्केटिंग फेडरेशनच्या अटींनुसार तुरीमध्ये खडे, माती, काडीकचरा नसावा. ती चांगली वाळलेली असावी. त्याची आर्द्रता १२ टक्‍क्‍यांपेक्षा कमी असावी. उत्पादकाच्या सातबारा पत्रकी तुरीची नोंद असावी. ही नोंद २०१७-१८ मध्ये झालेली असावी. सातबारा उतारा, आधार कार्ड, आयएफएससी कोड असलेल्या बॅंक पासबुकची छायांकित प्रत सोबत आणावी. तुरीची चाळणी येथे होणार असून, त्यासाठी प्रतिक्विंटल साडेसतरा रुपये बाजार समितीकडून आकारले जाणार आहेत. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या ०२११२-२२८४०८, ९९७०३४०४१२ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com