शासकीय मूग, उडीद खरेदी अाजपासून बंद

मूग, उडिद
मूग, उडिद

बुलडाणा ः शासनाने हमीभावाने मूग, उडीद खरेदीसाठी दिलेली मुदत रविवारी (ता. ३१) संपत अाहे. त्यामुळे खरेदीची प्रक्रिया गुंडाळली जाणार अाहे. अद्याप अनेक शेतकऱ्यांचा शेतमाल विक्री व्हायचा शिल्लक असून किमान १५ दिवसांची मुदत वाढविण्याची गरज शेतकऱ्यांमधून व्यक्त होऊ लागली अाहे. यापूर्वी शासनाने एकदा मुदतवाढ देत ३१ डिसेंबरपर्यंत ही खरेदी प्रक्रिया लांबवली होती. तर भरडधान्य योजनेअंतर्गत सुरू असलेली मका खरेदी शनिवारी (ता. ३०) बंद झाली अाहे.     बाजारपेठेत शेतमालाची हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी होऊ नये यासाठी प्रत्येक तालुक्याला हमीभाव खरेदी केंद्र उघडले. या ठिकाणी सोयाबीन, मूग, उडीद खरेदी केली जात अाहे. मूग अाणि उडीद खरेदीची मुदत रविवारी संपणार अाहे. त्यामुळे यापूर्वी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या मालाची मोजणी केली जाणार अाहे. जिल्ह्यात अद्याप २० ते २२ हजार क्विंटल मूग, उडदाचे मोजमाप व्हायचे शिल्लक असल्याचे सूत्रांचे म्हणणे अाहे. चिखली येथील खरेदी केंद्रावर झालेला गोंधळ निवारण्यात प्रशासनाची मोठी दमछाक झाली.  भरडधान्य योजनेअंतर्गत सुरू असलेल्या मका खरेदीची मुदत शनिवारी संपली. परंतु अद्याप हजारो क्विंटल मका बाजारात विक्री व्हायचा आहे. मलकापूर येथील केंद्रावर २६ डिसेंबरपर्यंत सुमारे साडेपाचशे मका उत्पादक शेतकऱ्यांनी नोंदणी केली अाहे. दररोज ३० ते ४० शेतकऱ्यांना मोबाईल मेसेज दिला जात अाहे. अद्याप शेकडोंचे मोजमाप व्हायचे अाहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com