agriculture news in marathi, Government proposes to purchase sub-market space for Mandrup | Agrowon

मंद्रूपला उपबाजाराच्या जागा खरेदीचा प्रस्ताव शासनाकडे
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंतर्गत मंद्रूप (ता. दक्षिण सोलापूर) येथे उपबाजार उभारण्याच्या विषयास समितीच्या संचालक मंडळाने एकमताने मंजुरी दिली. उपबाजारासाठी ५० एकर जागेची आवश्‍यकता असून, जागाखरेदीचा प्रस्ताव येत्या १५ दिवसांत शासनाकडे सादर करण्यात येणार असल्याची माहिती समितीचे सभापती दिलीप माने यांनी दिली.

सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंतर्गत मंद्रूप (ता. दक्षिण सोलापूर) येथे उपबाजार उभारण्याच्या विषयास समितीच्या संचालक मंडळाने एकमताने मंजुरी दिली. उपबाजारासाठी ५० एकर जागेची आवश्‍यकता असून, जागाखरेदीचा प्रस्ताव येत्या १५ दिवसांत शासनाकडे सादर करण्यात येणार असल्याची माहिती समितीचे सभापती दिलीप माने यांनी दिली.

समितीच्या नूतन संचालकांची पहिलीच सभा बुधवारी (ता. १) माने यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी उपसभापती श्रीशैल नरोळे, इंदुमती अलगोंड-पाटील, सचिव मोहनराव निंबाळकर, जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख, वसंत पाटील, प्रकाश वानकर, बाळासाहेब शेळके, जितेंद्र साठे, प्रकाश चोरेकर, अमर पाटील, केदार उंबरजे, बसवेश्‍वर इटकळे, राजू वाघमारे, शिवानंद पुजारी, रामप्पा चिवडशेट्टी, अप्पासाहेब पाटील, नामदेव गवळी आदी उपस्थित होते.

नाशिक बाजार समितीच्या धर्तीवर हा उपबाजार उभारण्यात येणार आहे. तेथील सोयीसुविधांची माहिती घेऊन अत्याधुनिक पद्धतीने शेतकऱ्यांना सेवा पुरविण्याचा प्रयत्न राहणार आहे. स्टेट बॅंक ऑफ इंडिया आणि कॅनरा बॅंकेत ६० कोटी रुपयांच्या ठेवी
आहेत. यापुढील काळात मुदत संपणाऱ्या ठेवी सर्वाधिक व्याज देणाऱ्या बॅंकांमध्ये ठेवण्याचा निर्णयही घेण्यात आला.

सध्या बाजार समितीला विजेचे ४० ते ४२ लाख रुपये बिल येत आहे. ते वाचविण्यासाठी सौरऊर्जेवरील युनिट बसविण्याची गरज आहे. त्यासाठी बाजार समितीचा शासनाच्या यादीत समावेश करण्याच्या मागणीचा ठराव करण्यात आला आहे.

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...