agriculture news in marathi, government repurchase center to be opened in october | Agrowon

उडीद, मुगाची हमीभाव केंद्रे ऑक्‍टोबरमध्ये सुरू ः पणनमंत्री देशमुख
सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 सप्टेंबर 2018

सोलापूर  : राज्यात आता मूग व उडीद या पिकांची काढणी सुरू झाली आहे. काही प्रमाणात हे धान्य बाजारपेठेत येत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर हमीभाव खरेदी केंद्रे सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. या पार्श्‍वभूमीवर ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून राज्यभर हमीभाव खरेदी केंद्रे सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली. 

सोलापूर  : राज्यात आता मूग व उडीद या पिकांची काढणी सुरू झाली आहे. काही प्रमाणात हे धान्य बाजारपेठेत येत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर हमीभाव खरेदी केंद्रे सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. या पार्श्‍वभूमीवर ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून राज्यभर हमीभाव खरेदी केंद्रे सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली. 

मूग व उडीद या पिकाची प्रामुख्याने मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर पेरणी करतात. खरीप हंगामात येणारी ही पिके आहेत. मराठवाड्याबरोबरच काही प्रमाणात विदर्भ व पश्‍चिम महाराष्ट्रात ही पिके घेतात. सोलापूर, बीड, सांगली, औरंगाबाद, लातूर, अमरावती, जालना या जिल्ह्यांचा अपवाद वगळता राज्यातील इतर जिल्ह्यांत चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे चांगला पाऊस झालेल्या जिल्ह्यात या पिकाचे मोठ्या प्रमाणावर उत्पन्न होण्याची शक्‍यता आहे.

सध्या मूग व उडीद बाजारपेठेत दाखल झाले आहेत. पण, हमीभाव केंद्रे सुरू नसल्याने मिळेल त्या दराने शेतकरी ते विकत आहेत. या पार्श्‍वभूमीवर पणनमंत्री देशमुख यांच्याशी चर्चा केली असता एक-दोन दिवसांत या पिकांसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यात बाजारपेठांची मागणी लक्षात घेता हमीभाव केंद्रे सुरू केली जातील. सध्याच्या मूग व उडीदात दमटपणा जास्त असतो. त्यामुळे ते कदाचित नाकारले जाण्याची शक्‍यता असते. पुढील १५ दिवसांत दमटपणा कमी झाल्याने हमीभाव केंद्रात ते स्वीकारण्यात येईल, असे श्री. देशमुख म्हणाले. मागील वर्षी जवळपास २०० खरेदी केंद्रं सुरू केली होती. 

उडीद व मुगाची हमीभाव केंद्रे सुरू झाल्यानंतर सोयाबीनची केंद्रे सुरू करण्यावर भर असेल. उडीद व मुगापेक्षा सोयाबीन थोड्या उशिराने बाजारात येते. पण, ते बाजारात येण्यापूर्वी हमीभाव केंद्रे सुरू करण्याचा आमचा प्रयत्न असेल.
- सुभाष देशमुख, पणनमंत्री

इतर ताज्या घडामोडी
कृषी विभाग म्हणते, पॉलिहाउस, शेडनेट...जळगाव ः खानदेशात १ ते ११ जून यादरम्यान झालेल्या...
केळी पीकविमाधारकांना परताव्यांची...जळगाव  ः हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेत...
कांदा निर्यात, प्रक्रियेवर भर गरजेचा ः...राजगुरुनगर, जि. पुणे : कांदा बाजारभावातील अनिश्‍...
सात महिन्यांपूर्वी विकलेल्या मुगाचे...अकोला ः नाफेडने खरेदी केलेल्या मुगाचे पैसे सात...
महावितरण’द्वारे देखभाल, दुरुस्तीची ९०३३...‘सातारा : थेट गावात जाऊन वीजयंत्रणेच्या देखभाल व...
रत्नागिरीत खतनिर्मिती कारखान्यावर छापारत्नागिरी : येथील एमआयडीसी परिसरात मच्छीच्या...
आषाढी पालखी सोहळ्यासाठी आरोग्य विभाग...पुणे : आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर...
गोंदिया जिल्ह्यात २ लाख हेक्‍टरवर...गोंदिया ः राइससिटी असा लौकिक असलेल्या गोंदिया...
औरंगाबाद जिल्ह्यात पाण्यासाठी भटकंती औरंगाबाद : जिल्ह्यातील ७७८ गाव व २७२...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत कापूस...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत २०१८-...
जतला कर्नाटकातून पाणी मिळणे धूसरसांगली : कर्नाटकातून कृष्णेचे पाणी जत तालुक्याला...
आषाढी वारीत ३५ हजार विद्यार्थी करणार...सोलापूर : आषाढी वारीत पाच विद्यापीठांतील ३५ हजार...
कात्रजकडून गायीच्या दूध खरेदीदरात वाढपुणे  : दुष्काळी स्थितीत दूध उत्पादक...
विधीमंडळ अधिवेशन ः सलग तिसऱ्या दिवशीही...मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीही...
हायब्रीड बियाणे किमतीवर सरकारी नियंत्रण...पुणे  : महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती...
सरकारला शेतकऱ्यांचे काहीच पडलेले नाही ः...मुंबई  : ''किडनी घ्या; पण बियाणे द्या...
‘सर्जा-राजा’ला माउलींच्या रथाचा मानमाळीनगर, जि. सोलापूर  : संत ज्ञानेश्‍वर...
पूर्णवेळ संचालकानेच लावले  `केम`...अमरावती  ः कृषी समृद्धी समन्वयित प्रकल्पातील...
तत्कालीन प्रकल्प अधिकारी ‘केम’...मुंबई : विदर्भातील सहा जिल्ह्यांतील कृषी...
कृषी सल्ला : पानवेल, गुलाब, ऊस, मका,...हवामान ः पुढील पाचही दिवस आकाश अंशतः ढगाळ राहील...