agriculture news in marathi, government rises Rabbi MSP 2018-19 | Agrowon

गहू, हरभरा, मसूरच्या हमीभावात वाढ
सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 4 ऑक्टोबर 2018

नवी दिल्ली : केंद्र सरकारने २०१८-१९ च्या रब्बी हंगामासाठी गव्हासह काही पिकांच्या किमान आधारभूत किमतीत (एमएसपी) वाढ करण्याचा निर्णय बुधवारी (ता.३) घेतला. 

नवी दिल्ली : केंद्र सरकारने २०१८-१९ च्या रब्बी हंगामासाठी गव्हासह काही पिकांच्या किमान आधारभूत किमतीत (एमएसपी) वाढ करण्याचा निर्णय बुधवारी (ता.३) घेतला. 

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या या निर्णयानुसार गव्हाची किमान आधारभूत किंमत प्रतिक्विंटल १०५ रुपयांनी वाढवून ती १८४० रुपये क्विंटल करण्यात आली आहे.  केंद्राने गेल्या वर्षी गव्हासाठी प्रतिक्विंटल १७३५ रुपये एमएसपी जाहीर केली होती. आजच्या निर्णयानुसार त्यात १०५ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. कृषी सल्लागार समितीने (सीएसीपी) याबाबतची शिफारस केली होती. पिकाच्या उत्पादन खर्चाच्या ५० टक्के जास्त भाव शेतकऱ्याला देण्याचे सरकारचे आश्‍वासन आहे. नव्या एमएसपी वाढीमुळे शेतकऱ्यांना ६३ हजार ६३५ कोटी रुपयांचा फायदा होईल व उत्पादन खर्चावर ५० टक्के नफा होईल असे केंद्रीय मंत्री राधामोहन सिंह व रविशंकर प्रसाद यांनी पत्रकारांना सांगितले. 

मसूर, हरभऱ्यातही वाढ
अन्य काही पिकांसाठीही प्रति क्विंटल एमएसपीमध्ये वाढ करण्यात आली. ती अशी ः मसूर-२२५ रुपये, करडई-२४५ रुपये आणि हरभरा-२२० रुपये. या वाढीमुळे या तिन्ही पिकांसाठी शेतकऱ्यांना अनुक्रमे ४२७५ रुपये, ४९४५ रुपये व ४६२० रुपये असा प्रतिक्विंटल भाव मिळेल. याशिवाय जवसाची एमएसपी क्विंटलमागे ३० रुपयांनी वाढवून १४४० रुपये करण्यात आली आहे.

रब्बीसाठीची हमीभाव वाढ (प्रति क्विंटल)

 धान्य  गेल्या वर्षीचे दर (२०१७-१८) वाढ (रु)  नवे हमीभाव (रुपये) (२०१८-१९)
गहू १७३५  १०५  १८४०
मसूर ४२५० २२५  ४४७५
हरभरा ४४०० २२० ४६२०
जवस १४१० ३० १४४०
करडई ४१०० ८४५ ४९४५
मोहरी  ४००० २०० ४२००

     
       
         
       

इतर अॅग्रो विशेष
सरकारबी मदत करंना अन्‌ बॅंका कर्ज देईनातनांदेड ः गेल्या वर्षीबी अन्‌ औंदाबी पावसानं मारलं...
पाण्याअभावी संत्राबागा होताहेत सरपणपरभणी ः जिल्ह्यातील प्रमुख संत्रा उत्पादक गाव...
‘कृष्णा’ आली दिघंचीच्या अंगणीदिघंची, जि. सांगली ः  अनेक वर्षे दिवास्वप्न...
जनावरांच्या बाजारातील व्यवहार उधारीवरचपरभणी: खरिपाच्या पेरणीच्या तोंडावर काहीशी...
सहकार विभाग आयुक्तांविना पोरकापुणे : गेल्या आठ महिन्यांपासून राज्याच्या सहकार...
आत्मा प्रकल्प संचालक चौकशीत दोषीपुणे: कृषी खात्यातील वादग्रस्त अधिकारी बी. एन....
लोकसभा निवडणुकीत भाजपच्या ‘व्होट शेअर’...पुणे : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता...
खानदेशात पूर्वहंगामी कापूस लागवड सुरू जळगाव ः खानदेशात मुबलक जलसाठे किंवा कृत्रिम...
कोकण वगळता उष्ण लाटेचा इशारापुणे : विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्राच्या...
शेतकऱ्यांनो विकते ते पिकवाः डॉ. भालेअकोला ः येत्या हंगामात पीक लागवड करताना...
हतबलतेतून फळबागांवर कुऱ्हाड अन्‌...जालना : जीवापाड जपलेली बाग वाचविण्यासाठी रानोमाळ...
विषाणूंद्वारे खोल मातीतही पोचविता येतील...मातीमध्ये खोलवर पिकाच्या मुळावर एखाद्या बुरशी...
जळगाव : शिवारात पाणीबाणी, शेतकरीराजा...जळगाव ः गावात तीन वर्षांपासून पावसाच्या लहरीपणाने...
हरवले जलभान कोनाड्यात‘नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन’...
मोदी लाटेचे गारुडसतराव्या लोकसभेचे भवितव्य स्पष्ट झालेले आहे. खरे...
राज्यात महायुतीची त्सुनामी...मुंबई  ः सतराव्या लोकसभेच्या निवडणुकीत देशभर...
चंदन लागवडचंदन मध्यम उंच आणि परोपजीवी प्रजाती आहे....
हुमणीच्या प्रौढ भुंगे­ऱ्यांचा सामुदायिक...गेल्या काही वर्षांत राज्यामध्ये हुमणी अळीचा...
संरक्षित शेतीतून आर्वीतील शेतकऱ्यांची...वाढती पाणीटंचाई आणि  बदलत्या हवामानामुळे...
उन्हाचा चटका ‘ताप’दायकपुणे : सूर्य चांगलाच तळपल्याने उन्हाचा चटका...