agriculture news in marathi, Government sanctions 2269 corer for Kharif 2017 compensation | Agrowon

खरीप २०१७ हंगामासाठी २,२६९ कोटी भरपाई मंजूर
मारुती कंदले
मंगळवार, 1 मे 2018

मुंबई : पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत २०१७ च्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना २,२६९ कोटींची भरपाई मंजूर झाली आहे. यात सर्वाधिक औरंगाबाद विभागासाठी सुमारे १,४४० कोटी त्यापाठोपाठ  अमरावती विभागासाठी ४५१ कोटी रुपयांची भरपाई मिळणार आहे. खरिपात सुमारे ३,४०० कोटी रुपयांचा विमा हप्ता कंपन्यांकडे जमा झाला होता. त्यापोटी ६६ टक्केच रक्कम भरपाई म्हणून शेतकऱ्यांना मिळणार आहे. 

मुंबई : पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत २०१७ च्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना २,२६९ कोटींची भरपाई मंजूर झाली आहे. यात सर्वाधिक औरंगाबाद विभागासाठी सुमारे १,४४० कोटी त्यापाठोपाठ  अमरावती विभागासाठी ४५१ कोटी रुपयांची भरपाई मिळणार आहे. खरिपात सुमारे ३,४०० कोटी रुपयांचा विमा हप्ता कंपन्यांकडे जमा झाला होता. त्यापोटी ६६ टक्केच रक्कम भरपाई म्हणून शेतकऱ्यांना मिळणार आहे. 

राज्यात खरीप २०१६ पासून ही योजना राबवण्यात येते. यापूर्वीच्या विमा योजनेत नुकसान आणि भरपाईमध्ये खूप मोठी तफावत होती. पूर्वीच्या योजनेतील सर्व त्रुटी आणि अडथळे या योजनेत दूर करण्यात आले. पूर्वीच्या योजनेतील ११ टक्के विमा हप्त्याच्या कॅपिंगची अट रद्द केल्यामुळे शेतकऱ्यांना मोठी मदत मिळत आहे. 

पूर्वी मंडल स्तरावर संपूर्ण शेतीचे नुकसान झाले असेल तरच शेतकऱ्यांना भरपाई मिळत होती. आता शेतकऱ्यांना वैयक्तिक स्तरावर विम्याचा लाभ होत आहे. त्याचमुळे योजना लागू झाल्यापासून राज्यातील शेतकऱ्यांना खरीप २०१६ मध्ये १,९०० कोटी तर रब्बी २०१६-१७ मध्ये ८९३ कोटी रुपयांची भरीव नुकसानभरपाई मिळाली आहे. योजनेअंतर्गत खरिपासाठी दोन टक्के, रब्बीसाठी दीड टक्का आणि फळबागांसाठी पाच टक्के इतका अल्प हप्ता आकारला जातो. 

पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी २०१६ मध्ये ऑफलाइन पद्धतीने अर्ज घेण्यात आले. तेव्हा योजनेत राज्यातील एक कोटी नऊ लाख शेतकरी सहभागी झाले होते. गेल्यावर्षी ही सर्व प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली. शेतकऱ्यांना आधारशी लिंक करून फॉर्म्स भरण्यात आल्यामुळे शेतकरी सहभागात घट झाल्याचे दिसून येते. सुमारे ७५ लाख शेतकरी योजनेत सहभागी झाले.

दरम्यान, गेल्यावर्षी जुलै महिन्यात मराठवाड्यासह राज्याच्या काही भागांत पावसाने मोठी दडी मारली. सुमारे ४८ दिवस पाऊस पडला नाही. परिणामी, या भागात शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले. त्याचमुळे या योजनेअंतर्गत मराठवाड्यातील शेतकऱ्यांना सर्वाधिक १,४४० कोटी रुपयांची नुकसानभरपाई मंजूर झाली आहे. येत्या महिन्याभरात मदतीची सर्व रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर जमा करण्याचे निर्देश कृषी विभागाने विमा कंपन्यांना दिले आहेत. येत्या महिन्याभरात भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना वितरीत होईल, असेही कृषी खात्यातील सूत्रांनी सांगितले. 

इतर अॅग्रो विशेष
आज शिवजयंती : शिवनेरीवर पारंपारिक...पुणे : फाल्गुन वद्य तृतीया या तिथीनुसार आज (ता....
अतितीव्र हवामानस्थितीला कर्बाचे वाढते...पुणे : वातावरणातील कार्बनडाय ऑक्साईडचे (कर्ब)...
कमतरतेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर...अलीकडे सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता अधिक...
पिंप्री गावाने कमावले लसूणघास शेतीत नाव पिंप्री (वळण) (ता. राहुरी, जि. नगर) हे गाव मुळा...
दुष्काळातही सुरती हुरड्याची  चवच काही...औरंगाबाद जिल्ह्यातील सारंगपूर येथील अरुण कडूबाळ...
। तुका म्हणे कान्हा । भूक लागली नयनां ।।देहू : तुकाराम तुकाराम...असा नामघोष आणि...
नांदेड जिल्ह्यात कापूस उत्पादकता...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप...
नगरची लढत राहणार लक्षवेधीनगर : राज्याच्या सर्वाधिक लक्ष असलेल्या नगर (...
रब्बी पीकविम्याला बोगस प्रकरणांचे ग्रहणमुंबई ः २०१८-१९ च्या रब्बी हंगामात पंतप्रधान...
सहा कारखान्यांची धुराडी थंडावलीऔरंगाबाद  : मराठवाडा व खानदेशातील पाच...
बेदाण्याला दराची गोडीसांगली ः होळी सणाच्या पार्श्वभूमीवर बेदाण्याची...
आनंदाचा उतरता आलेखजगभरातील आनंदी देशांचा अहवाल (वर्ल्ड हॅपीनेस...
आदित्यात् जायते वृष्टि:जगात एकूण १९५ देश आहेत, पण आकार, आर्थिक स्थिती,...
आज संत तुकाराम बीजदेहू, जि. पुणे  : जगद्‌गुरू संत श्री तुकाराम...
उज्ज्वल भविष्याचा सर्वोत्तम मार्ग ‘जल...भारत जलसंकट समस्येचा सामना करत आहे. वाढती...
जल‘मुक्त’ शिवारवॉ टर ग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्यातील सर्व...
राज्यात शंभर लाख टन साखर उत्पादनभवानीनगर, जि. पुणे ः राज्यात ३० टक्के हुमणीग्रस्त...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळीची...पुणे : रविवारी, सोमवारी पुन्हा काही अंशी...
जैविक कीड-नियंत्रणासाठी उपयुक्त बुरशीगेल्या काही वर्षांमध्ये कीडनियंत्रणासाठी...
केशर आंबा फळगळीची कारणे अन् उपाययोजना  सद्यःस्थितीत हवामान आंबा झाडांसाठी...