हमीभावाने साडेदहा हजार क्विंटल शेतीमाल खरेदी

हमीभावाने साडेदहा हजार क्विंटल शेतीमाल खरेदी

नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांमध्ये आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नाफेड आणि विदर्भ को आॅपरेटीव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या मिळून एकूण १५ खरेदी केंद्रांवर शुक्रवार (ता. १४) पर्यंत ३ हजार ५६१ शेतकऱ्यांचा १० हजार ५९७.५४ क्विंटल शेतमाल खरेदी झाली आहे. यामध्ये मूग ६ हजार ४९३.३६ क्विंटल, उडिद ३ हजार ७४३.१० क्विंटल, सोयाबीन ३६१.५४ क्विंटल या शेतमालाचा समावेश आहे.

सोयाबीन विक्रीसाठी १४ हजार ३८९ शेतकऱ्यांनी आॅनलाइन नोंदणी केली आहे. परंतु, खुल्या बाजारातील दर हमीभावाच्या जवळपास असल्यामुळे शासकीय खरेदी केंद्रांवर सोयाबीन विक्रीसाठी शेतकरी इच्छूक दिसत नसल्याचे चित्र असून शुक्रवार (ता. १४) पर्यंत तीन जिल्ह्यांतील केवळ ३८ शेतकऱ्यांनी ३६१.५४ क्विंटल सोयाबीनची हमीभाव केंद्रावर विक्री केली.

या तीन जिल्ह्यांतील नाफेडच्या २० आणि विदर्भ को आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या ३ अशा एकूण २३ खरेदी केंद्रांवर एकूण २३ हजार ६१२ शेतकऱ्यांनी आॅनलाइन नोंदणी केली. यामध्ये मुगासाठी ६ हजार ३६१ शेतकऱ्यांनी, उडदासाठी २ हजार ८६२ शेतकऱ्यांनी, सोयाबीनसाठी १३ हजार ३८९ शेतकऱ्यांनी आॅनलाइन नोंदणी केली आहे.

नांदेड जिल्ह्यात नाफेड आणि विदर्भ को आपरेटीव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या केंद्रांवर मुगासाठी नोंदणी केलेल्या १ हजार ८१ शेतकऱ्यांपैकी ४०९ शेतकऱ्यांच्या १ हजार २४०.८० क्विंटल मुगाची खरेदी करण्यात आली. उडदासाठी नोंदणी केलेल्या १ हजार ७८९ शेतकऱ्यांपैकी ५७४ शेतकऱ्यांच्या २ हजार २२८.१० क्विंटल उडदाची खरेदी झाली. सोयाबीनसाठी नोंदणी केलेल्या १ हजार ७७१ शेतकऱ्यांपैकी ३ शेतकऱ्यांनी १८ क्विंटल सोयाबीनची विक्री केली. नाफेडतर्फे मुखेड, देगलूर, बिलोली येथील केंद्रावर मूग, उडदाची तर हदगांव येथील केंद्रांवर ३ शेतकऱ्यांच्या १८ क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली. विदर्भ मार्केटिंग फेडरेशनच्या धर्माबाद येथील केंद्रांवर मूग आणि उडिद मिळून एकूण १९९ शेतकऱ्यांच्या ८२९.४८ क्विंटल शेतमालाची खरेदी झाली.

परभणी जिल्ह्यात नाफेडच्या सहा आणि विदर्भ को आॅपरेटीव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या दोन मिळून एकूण आठ केंद्रावर मुगासाठी ४ हजार ४१९ शेतकऱ्यांनी, उडदासाठी ३३८ शेतकऱ्यांनी, सोयाबीनसाठी ९ हजार १५० शेतकऱ्यांनी असे एकूण १३ हजार ०९७ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. नाफेडच्या जिंतूर, सेलू, पाथरी, पालम, पूर्णा या पाच आणि विदर्भ मार्केटिंग फेडरेशनच्या मानवत आणि गंगाखेड या दोन केंद्रांवर मिळून १ हजार ८५६ शेतकऱ्यांचा ४ हजार १३२.६४ क्विंटल शेतमालाची खरेदी झाली. नाफेडच्या परभणी येथील केंद्रांवर ६१५ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून सोमवार (ता. १७) पासून खरेदी सुरू होईल, असे सूत्रांनी सांगितले.

हमीभाव खरेदी स्थिती क्विंटलमध्ये (कंसात शेतकरी संख्या)
जिल्हा मूग उडिद सोयाबीन
नांदेड १२४०.८० (४०९) २२२८.१०(५७४) १८ (३)
परभणी ३७३७.४९ (१७३४) १४६.६५(९४) २४८.५० (२८)
हिंगोली १५१५.०७ (३७८) १३६८.३५ (३३४) ९५ (७)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com