agriculture news in marathi, government should clearify the cost of production of MSP for crops | Agrowon

उत्पादन खर्चाबद्दल खुलासा करावा : डॉ. स्वामीनाथन
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 20 फेब्रुवारी 2018

केंद्र सरकारने आगामी खरिपात सर्व अघोषित पिकांसाठी उत्पादन खर्चाच्या दीडपट किमान आधारभूत किमती देण्याचे जाहीर केले आहे; परंतु त्यासाठी उत्पादन खर्च काय धरणार, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. माझ्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय शेतकरी आयोगाने २००६ साली सरकारला सादर केलेल्या अहवालात C2 उत्पादन खर्चावर ५० टक्के नफा मिळेल, इतक्या आधारभूत किंमती जाहीर केल्या जाव्यात, अशी शिफारस केलेली आहे.

केंद्र सरकारने आगामी खरिपात सर्व अघोषित पिकांसाठी उत्पादन खर्चाच्या दीडपट किमान आधारभूत किमती देण्याचे जाहीर केले आहे; परंतु त्यासाठी उत्पादन खर्च काय धरणार, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. माझ्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय शेतकरी आयोगाने २००६ साली सरकारला सादर केलेल्या अहवालात C2 उत्पादन खर्चावर ५० टक्के नफा मिळेल, इतक्या आधारभूत किंमती जाहीर केल्या जाव्यात, अशी शिफारस केलेली आहे.

C2 खर्चामध्ये निविष्ठांचा खर्च, शेतकरी आणि त्याच्या कुटुंबाने आपल्याच शेतात केलेली मजुरी यासोबतच जमिनीचे आभासी भाडे आणि स्थायी भांडवली साधनसंपत्तीवरील व्याज हेसुद्धा मोजले जाते. सरकारने राष्ट्रीय शेतकरी आयोगाने सूचविल्याप्रमाणे C2 खर्चावर आधारित आधारभूत किंमती जाहीर करणार का, याविषयी स्पष्टीकरण देण्याची गरज आहे. तसेच केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दीडपट आधारभूत किमतीची घोषणा करताना अघोषित पिके अशी संज्ञा वापरली आहे. केंद्रीय कृषी मूल्य व किंमत आयोग ज्या २३ पिकांसाठी आधारभूत किमती जाहीर करत असतो त्यांचा या पिकांमध्ये समावेश होणार की या पिकांव्यतिरिक्त उरलेल्या पिकांसाठीच ही घोषणा लागू आहे, याचाही खुलासा करण्याची आवश्यकता आहे. बाजारात एखाद्या पिकाचे दर हमीभावापेक्षा खाली गेल्यास सरकारने त्या शेतीमालाची खरेदी करावी किंवा इतर मार्गांनी बाजारभाव आणि हमीभाव यांतील फरक शेतकऱ्यांना मिळवून देण्याची व्यवस्था उभारावी.  

- प्रो. एम. एस. स्वामिनाथन,
विख्यात शास्त्रज्ञ आणि अध्यक्ष, राष्ट्रीय शेतकरी आयोग

इतर ताज्या घडामोडी
औरंगाबादेत प्रतिक्विंटल वांगी १००० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
ज्याची पेरणी करू त्याचे दर सुधारतील का?जालना : गुलाबी बोंड अळीच्या संकटाने चिंतेत असलेले...
पुणे विभागातील १७ तालुक्यांत तीव्र...पुणे : पुणे विभागात पाणीटंचाई दिवसागणिक वाढतच आहे...
मागील हंगाम वाया गेला; यंदा चांगले... नंदुरबार ः जिल्ह्यात मागील हंगामाच्या तुलनेत...
निविष्ठा बाजारात उपलब्ध; पण हाती पैसा... नांदेड ः हरभरा, तुरीचे चुकारे अडकले आहेत. पीक...
नगरमध्ये काँग्रेसचे सरकार विरोधात विश्‍...नगर  ः ‘भाजप सरकारने सामान्य लोकांचा विश्‍...
पदोन्नतीपात्र अधिकाऱ्यांनी हातोहात...नागपूर  : विदर्भात काम करण्यास अनुत्सुक...
दूध दरवाढ आंदोलनासाठी शेतकरी संघर्ष...वैजापूर, जि. औरंगाबाद  : दूधदराच्या प्रश्‍...
शेतकऱ्यांनी शेतात भाजपचे झेंडे पेरावेत...बुलडाणा (प्रतिनिधी) ः शासनाने जाहीर केलेल्या...
राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार १४ नवे वाणदापोली, जि. रत्नागिरी  : राज्याचे कृषी...
अर्जुन लागवडीसाठी निवडा दर्जेदार रोपेअर्जुन हा वृक्ष वनशेतीसाठी उत्तम आहे. अर्जुन...
कृषी, परराष्ट्र, रोजगार, इंधनाच्या...नवी दिल्ली : मागील चार वर्षात मोदी सरकार...
पिवळी डेझी लागवड कशी करावी?पिवळी डेझी (गोल्डन रॉड) हे अत्यंत कणखर पीक आहे....
निशिगंध लागवडीसाठी निचरा असलेली जमीन...निशिगंध पिकाची लागवड सोपी असून, तिचा लागवड खर्चही...
काळी मिरी कशी तयार करतात?काळी मिरीच्या वेलांची लागवड केल्यानंतर तीन...
वनस्पतींना रोगापासून वाचविण्यासाठी...वनस्पती आणि रोगकारक सूक्ष्मजीव यांच्यामध्ये...
शेतीमालाला रास्त भाव मिळेपर्यंत एल्गार...नगर : भाजप सरकार भांडवलदार उद्योगपती धार्जिणे...
शेतकरीप्रश्नी सरकारला गांभीर्य नाहीच :...पुणे  ः केंद्र आणि राज्य सरकार हेवत असून,...
शेतकऱ्यांना शहाणपणा शिकविण्याची गरज...पुणे : देशात आणि राज्यात शेतकरी तंत्रज्ञान...
एक जूनच्या संपात शेतकरी संघटना नाही :... पुणे ः देशात १ जून ते १० जूनदरम्यान पुकारण्यात...