agriculture news in marathi, Government should encourage good seed companies, give licenses | Agrowon

चांगल्या बियाणे कंपन्यांनाच शासनाने प्रोत्साहन द्यावे : डॉ. सी. डी. मायी
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

जळगाव : आपल्याकडे फक्त काही कपाशी बियाणे उत्पादक कंपन्या चांगले बियाणे उत्पादन करतात. पण सुमारे ५०० बीटी व इतर कपाशी बियाणे उत्पादक कंपन्या बाजारात आहेत. यात गोंधळ होत असून, केवळ चांगल्याच बियाणे उत्पादक कंपन्यांना शासनाने प्रोत्साहन, परवाने दिले पाहीजे, असे मत कपाशी पिकाचे शास्त्रज्ञ, अभ्यासक डॉ. सी. डी. मायी यांनी बुधवारी (ता. १०) मुंबई येथे कपाशी निर्यातदार, व्यापारी व जिनर्स यांच्या बैठकीत मांडले.

जळगाव : आपल्याकडे फक्त काही कपाशी बियाणे उत्पादक कंपन्या चांगले बियाणे उत्पादन करतात. पण सुमारे ५०० बीटी व इतर कपाशी बियाणे उत्पादक कंपन्या बाजारात आहेत. यात गोंधळ होत असून, केवळ चांगल्याच बियाणे उत्पादक कंपन्यांना शासनाने प्रोत्साहन, परवाने दिले पाहीजे, असे मत कपाशी पिकाचे शास्त्रज्ञ, अभ्यासक डॉ. सी. डी. मायी यांनी बुधवारी (ता. १०) मुंबई येथे कपाशी निर्यातदार, व्यापारी व जिनर्स यांच्या बैठकीत मांडले.

महाराष्ट्रातील कपाशीचे पीक यंदा गुलाबी बोंड अळीने पुरते संकटात आले. या पार्श्‍वभूमीवर कपाशी व्यापारी, संस्था काय करू शकतात यासंबंधी मुंबई येथे हार्बर मार्गावरील कॉटन ग्रीन स्टेशन नजीकच्या कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाच्या (सीएआय) कॉटन बिल्डिंगमध्ये ही बैठक दुपारी झाली. कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने संयोजन केले. त्यात उत्तर महाराष्ट्रातील काही व्यापारी, जिनर्सही सहभागी झाले. बैठकीत सीएआयचे अध्यक्ष अतुल गणात्रा, कपाशी बाजारपेठेचे अभ्यासक सुरेश कोटक, विनय कोटक आदी उपस्थित होते.

पूर्वहंगामी कपाशी लावूच नका
यंदा फेब्रुवारीपूर्वीच कपाशीचे पीक नष्ट करा. आणि पुढच्या हंगामात पूर्वहंगामी कपाशी लागवड टाळा. फवारणी लागवडीनंतर ८० दिवसांनी करा. गुलाबी बोंड अळीवर नियंत्रण शक्‍य आहे आदी सूचना डॉ. मायी यांनी या बैठकीत केल्या.

सीएआय राबविणार अभियान
आगामी कपाशीच्या हंगामासंबंधी या दोन महिन्यांनंतर महाराष्ट्रभर कपाशी पट्ट्यात गुलाबी बोंड अळीसंबंधी अभियान राबविले जाईल. त्यासाठी स्थानिक जिनर्स, शास्त्रज्ञ, शासकीय यंत्रणा, शेतकरी यांची मदत घेतली जाईल. गावोगावी मार्गदर्शनपर कार्यक्रम, पत्रके वितरित केले जातील. कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया या कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेईल, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती कपाशी किंवा गाठींचे निर्यातदार दिनेश हेगडे यांनी ॲग्रोवनशी बोलताना दिली.

इतर ताज्या घडामोडी
शेतमालाला भाव न देणारे उत्पन्न दुप्पट...भंडारा : शेतमालाला भाव नसल्याने अधिक...
भाजप हा उमेदवार आयात करणारा पक्ष : रावतेनागपूर : भाजप हा उमेदवार आयात करणारा पक्ष...
कृषी सल्ला : भात, भुईमुग, आंबा,...भात ः सध्या रोपवाटिकेसाठी शेतकऱ्यांनी तयारी सुरू...
द्राक्ष बागेत रोगांच्या प्रादुर्भावाची... सर्व द्राक्ष विभागांमध्ये...
कृषी तंत्रज्ञान पदविका अभ्‍यासक्रम...मुंबई : राहुरी येथील महात्मा फुले कृषी...
सातारा जिल्ह्यात आले लागवडीस गतीसातारा  ः उष्णतेत वाढीमुळे रखडलेल्या आले...
शेतकऱ्यांना मिळणार पाच रुपयांत पोटभर...लातूर  : शंभर-दीडशे किलोमीटर अंतरावरून आपला...
रोहित्राच्या बाॅक्समधील फ्यूज तारांच्या...परभणी ः जिल्ह्यातील कृषी पंपाना वीजपुरवठा...
नष्ट होत असलेल्या देशी वाणांचे संवर्धन...पुणे ः हरितक्रांतीच्या नादात अधिक उत्पादनाच्या...
यवतमाळ जिल्ह्यात फळबागांनी टाकल्या मानायवतमाळ  : कडाक्‍याच्या उन्हामुळे...
कागदपत्रांची पूर्तता करूनही लिलाव बंद...मालेगाव, जि. नाशिक  : मालेगाव कृषी उत्पन्‍न...
शेतकऱ्यांना ‘करार शेती’च्या माध्यमातून...नवी दिल्ली : शेतमालाचा बाजार आणि किंमतीतील...
सोलापूर बाजार समितीत ३९ कोटींचा...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत...
साताऱ्यात गवार २०० ते ३०० रुपये दहाकिलोसातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
देशात सर्वांत महाग पेट्रोल धर्माबादला,...नांदेड : नांदेड जिल्ह्याच्या तेलंगणा व...
पेरूबागेसाठी सघन लागवडीचे तंत्रपेरू बागेमध्ये उत्पादकता वाढवण्यासाठी सघन...
जळगाव बाजार समितीकडून आवाराबाहेर...जळगाव : फळे-भाजीपाला नियमनमुक्तीनंतर बाजार समिती...
जीएम ई. कोलाय जैवइंधननिर्मितीसाठी...जैवइंधनाच्या निर्मितीसाठी जनुकीय तंत्रज्ञानाने...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढतेयपुणे : वाढत्या उन्हाबरोबरच पुणे विभागातील...
जळगाव जिल्ह्यातील पाणीटंचाई होतेय भीषणजळगाव  ः जिल्ह्यातील पश्‍चिम पट्ट्यात...