agriculture news in marathi, government should give feed to Animals, job | Agrowon

सरकारनं दावणीला चारा, हाताला काम द्यावं...
माणिक रासवे
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

परभणी ः गतवर्षी बोंडअळीमुळे अन यंदा दुष्काळामुळे कपाशीचा लागवड एवढेही हाती आले नाही. समदं कोरडवाहू आहे. ओलिताच्या सोयीसाठी एखाद्या योजनेतून विहीर द्या सायेब. गेल्या वर्षीच्या शिलकीतून सध्या धकत आहे. पण अजून सात आठ महिन्याचा काळ कठीण आहे. प्रत्येक शेतकरी कुटुंबांना महिन्याकाठी पाच हजार रुपये दुष्काळ निर्वाह भत्ता द्यावा. संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी. पीक विमा परतावा मंजूर करावा. हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी.

परभणी ः गतवर्षी बोंडअळीमुळे अन यंदा दुष्काळामुळे कपाशीचा लागवड एवढेही हाती आले नाही. समदं कोरडवाहू आहे. ओलिताच्या सोयीसाठी एखाद्या योजनेतून विहीर द्या सायेब. गेल्या वर्षीच्या शिलकीतून सध्या धकत आहे. पण अजून सात आठ महिन्याचा काळ कठीण आहे. प्रत्येक शेतकरी कुटुंबांना महिन्याकाठी पाच हजार रुपये दुष्काळ निर्वाह भत्ता द्यावा. संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी. पीक विमा परतावा मंजूर करावा. हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी. जनावरांना दावणीवरच चारा उपलब्ध करुन द्यावा. सरकारनं गावात रोजगार हमीची कामे सुरू करुन हाताला काम द्यावे, अशा शब्दांत आपल्या व्यथा सातत्याने दुष्काळाच्या चक्रात भरडत असलेल्या परभणी जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूरांनी केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकातील अधिकाऱ्यांशी संवाद साधतांना मांडल्या.

केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाने गुरुवारी (ता. ६) सकाळी साडे दहा ते एकच्या दरम्यान गणेशपूर (ता. सेलू), पेडगाव (ता. परभणी) रुढी (ता. मानवत) या तीन  गावांच्या शिवारास भेट देऊन पीक परिस्थितीची पाहणी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधला. पथकप्रमुख निती आयोगाचे सहसल्लागार मानश चौधरी, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्रालयाचे एस. सी. शर्मा, ग्रामीण विकास मंत्रालयाचे अवरसचिव एस. एन. मिश्रा यांचा समावेश होता. विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, मृद व जलसंधारण आयुक्त श्री. सिंघला, उपायुक्त विजयकुमार फड, जिल्हाधिकारी पी. शिवशंकर, लातूरचे कृषी सहसंचालक तुकाराम जगताप, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बी. आर. शिंदे, उपविभागीय कृषी अधिकारी सागर खटकाळे आदीसह कृषी, महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

जालना जिल्ह्यातून गणेशपूर (ता. सेलू) शिवारातील त्रिवेणीबाई रामचंद्र गिते यांच्या कपाशीच्या शेतामध्ये सकाळी साडे दहाच्या सुमारास पथक झाले. यावेळी पथक प्रमुख मानश चौधरी यांनी कपाशीच्या उत्पादनासह खर्चाबाबत विचारणा केली. दीड एकरात दीड क्विंटल कापूस निघाल्याचे गिते यांनी सांगितले. पेडगांव येथील गणेशराव हरकळ यांच्या कोरड्या पडलेल्या विहिरीची तसेच त्या शेजारील कपाशीच्या पिकाची पाहणी केली. यावेळी ग्रामस्थांना पिण्यासाठी स्वच्छ पाण्याची सोय करावी. मजुरांच्या रोजगारासाठी गावात कामे उपलब्ध करुन द्यावीत.रेशन उपलब्ध करुन द्यावे. दुष्काळामुळे शेतकऱ्यांवर मोफत उपचार करण्यात यावेत. बटईने शेती करणारांना देखील ५० हजार रुपये खावटी देण्यात यावे, आदी मागण्या करण्यात आल्या.

पीक विमा परतावा शेतकऱ्यांना तत्काळ अदा करण्यात यावा, अन्यथा विमा कंपनीवर दंडात्मक कारवाई करावी, असे निर्देश मानश चौधरी यांनी जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांना दिले. तसेच रुढी (ता. मानवत) येथील विष्णू निर्वळ यांच्या शेतातील कपाशीच्या पिकाची पाहणी केली.

दुष्काळामुळे झालेल्या नुकसान निश्चित करण्यासाठी पथक आले आहे. त्याबाबतचा अहवाल केंद्र सरकारला सादर केला जाणार आहे. त्यानंतर मदत जाहीर केली जाईल.
- मानश चौधरी, पथक प्रमुख

गेल्या वर्षी विहिरीला भरपूर पाणी होते. शेजाऱ्यांना देखील दिले होते. पण यंदा विहीर कोरडी पडली. त्यामुळे ज्वारी होणार नाही. कडबा नाही अन्‌ धान्य ही नाही. त्यामुळे जनावरांच्या सांभाळाची चिंता आहे.
- गणेशराव हरकळ, शेतकरी, पेडगाव, ता. परभणी

अन्‌ केंद्रीय पथक पेडगावात दाखल झाले
पेडगाव (ता. परभणी) येथील नियोजित दौरा रद्द करुन पथक थेट रुढी (ता. मानवत) येथे निघाले. ही बाब पेडगांव शिवारातील पथकाची वाट पाहात थांबलेल्या शेतकऱ्यांना समजली. शेतकरी संतप्त झाले. गणेशपूर (ता. सेलू) येथील पाहणी करुन रुढीकडे जात होते. मानवत रोड येथील रेल्वे क्राॅसिंगच्या फाटकावर पथकातील गाड्यांना थांबावे लागले. यावेळी पेडगांव येथील शेतकऱ्यांनी पथकातील अधिकऱ्यांना गाठले. आमच्या वेदना जाणून घ्या, अन्यथा पुढे जाऊ देणार नाहीत, अशीही भूमिका शेतकऱ्यांनी घेतली. त्यानंतर पथकाने पेडगावात पाहणी केली.

इतर ताज्या घडामोडी
कर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने...सोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही...
योग्य पद्धतीने करा दालचिनी काढणीनोव्हेंबर ते मार्च या कालावधीत दालचिनी काढणीचा...
परभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७००...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...
भाजपची राष्ट्रीय परिषद ११ जानेवारीपासूननवी दिल्ली ः भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय...
यंत्रमाग १ तर प्रोसेस, सायझिंगला २...मुंबई  ः महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग...
अटी, शर्ती काढल्या तरच कर्जमाफीचा फायदा नगर : सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कर्ज झाले आहे...
कर्जासाठी शेतकऱ्याचा बॅंकेसमोर मृत्यू...मुंबई : कर्जाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांना स्टेट...
ग्रामपंचायतीच्या ८०० सदस्यांचे सदस्यत्व...सोलापूर : निवडणूक निकालानंतर सहा महिन्यांच्या आत...
प्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहातसातारा : ढोल-ताशांचा रोमांचकारी गजर, छत्रपती...
कांद्याला पाचशे रुपये अनुदान द्यानाशिक : कांद्याला हमीभाव मिळत नसल्याने...
'प्रकल्पग्रस्त पुनर्वसनात वेळेचा अपव्यय...नाशिक : शासकीय अधिकारी काम कसे करतात, यावरच...
बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी ‘...मुंबई : राज्यातील महिला सक्षमीकरणाशी निगडित...
वीस वाळू घाटांच्या लिलावाचा मार्ग मोकळाअकोला : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने...
नांदेडमध्ये नाफेडतर्फे तूर खरेदी केंद्र...नांदेड ः केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी...
परभणीत आज शेतकरी सुकाणू समिती बैठकपरभणी : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत,...
सांगली बाजार समितीत हमालांचे आंदोलनसांगली ः कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमालांनी...
नगर जिल्ह्यात हमी केंद्रांकडे शेतकरी...नगर ः आधारभूत किमतीने मूग, उडीद सोयाबीनची खरेदी...
शिवसेनेकडून जिल्हा परिषदेत नाराजांचे...जळगाव : जिल्हा परिषदेत तीन पंचवार्षिक भाजपसोबत...
शेतकरी मृत्यूप्रकरणी पाथरी बाजारपेठेत...पाथरी, जि. परभणी  : पीककर्जाच्या मागणीसाठी...
अण्णा हजारे यांनी कांदाप्रश्‍नी लक्ष...नगर ः शेतकऱ्यांना एक ते पाच रुपये किलो दराप्रमाणे...