agriculture news in marathi, government should remove loss fo Co-operative Milk Union | Agrowon

दूध संघाचा तोटा भरून काढण्यासाठी सरकारनेच काढावा मार्ग
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 2 नोव्हेंबर 2017

सोलापूर : महाराष्ट्रातील सहकारी दूध संघांवरच फक्त राज्य सरकार नियंत्रण आणत आहे. त्यामुळे या दूध संघांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. राज्यातील खासगी दूध संघांवर मात्र राज्य सरकारचे कोणतेही नियंत्रण नाही. सहकारी दूध संघांना होत असलेला तोटा भरून काढण्यासाठी आता राज्य सरकारनेच पुढाकार घ्यावा, अशी मागणी सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष आमदार प्रशांत परिचारक यांनी येथे पत्रकारांशी बोलताना केली.

सोलापूर : महाराष्ट्रातील सहकारी दूध संघांवरच फक्त राज्य सरकार नियंत्रण आणत आहे. त्यामुळे या दूध संघांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. राज्यातील खासगी दूध संघांवर मात्र राज्य सरकारचे कोणतेही नियंत्रण नाही. सहकारी दूध संघांना होत असलेला तोटा भरून काढण्यासाठी आता राज्य सरकारनेच पुढाकार घ्यावा, अशी मागणी सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष आमदार प्रशांत परिचारक यांनी येथे पत्रकारांशी बोलताना केली.

राज्य सरकार दूध खरेदीच्या बाबतीत फक्त आदेश देत आहे, आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्या सहकारी दूध संघांवर कारवाईचा बडगा उचलला जात आहे. खासगी दूध संघांना मात्र याबाबतचे कोणतेही आदेश नसल्याने ते यातून सुटत आहे. महाराष्ट्रातील दूध व्यवसाय टिकला पाहिजे त्या दृष्टीने शासनाने या व्यवसायाकडे सकारात्मकदृष्टीने पाहण्याची आवश्‍यकता असल्याचेही आमदार परिचारक यांनी सांगितले.

राज्यातील सहकारी दूध संघाच्या वतीने ‘महानंद’ला दूधपुरवठा केला जातो. गाय दुधाच्या दरात महानंदने १ नोव्हेंबरपासून कपात केली आहे. ३.५ फॅट व ८.५ एस.एन.एफ.साठी महानंदने २१ रुपये दर निश्‍चित केला आहे.

जिल्हा व तालुका दूध संघ मात्र आजही २७ रुपये दराने खरेदी करत आहेत. सोलापूर जिल्हा दूध संघाला दररोज तीन लाख रुपयांचा तोटा होत असून, गेल्या चार महिन्यांपासूनही ही आर्थिक झळ दूध सोसत असल्याचेही आमदार परिचारक यांनी सांगितले.

महानंदने राज्यातील सर्व दूध संघांचे दूध स्वीकारावे, महानंदला होणारा तोटा हा राज्य सरकारने महानंदला दिल्यास यातून निश्‍चित मार्ग निघेल. यापूर्वीही बाजारात दूध व दुग्धजन्य पदार्थांची मागणी घटल्यानंतर अशा पद्धतीने तोडगा काढण्यात आला असल्याचेही आमदार परिचारक यांनी सांगितले. राज्यातील दूध संघाच्या प्रश्‍नांसंदर्भात पंधरा दिवसांपूर्वी अकलूजला बैठक झाली होती. बैठक होऊन देखील प्रश्‍न सुटला नसल्याचे आमदार परिचारक म्हणाले.

इतर ताज्या घडामोडी
शेतकरी सन्मान योजनेत रत्नागिरीतील आठ...रत्नागिरी : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
कीटकशास्‍त्र विभागातर्फे ट्रायकोकार्ड...परभणी ः येत्या हंगामात मराठवाड्यातील औरंगाबाद,...
फळबाग योजनेतील अटी कोकणासाठी शिथिल करू...रत्नागिरी ः भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड...
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाची...नाशिक : मागील वर्षी लाल कांद्याचे भाव पडल्याने...
कपाशीचा नांदेड ४४ बीटी वाण लोकार्पण हा...परभणी  : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
पावसाला उशीर झाल्याने चिंतेचे ढग गडदनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदा...
कृषी विद्यापीठाच्या वाणांच्या...रत्नागिरी ः डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी...
परभणी, हिंगोलीतील दूध उत्पादकांच्या... परभणी  ः शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी...
विदर्भातील कृषी विकासाला बाधक ठरतोय...नागपूर   ः सत्ताकेंद्र विदर्भात असताना...
आवक कमी झाल्याने भाजीपाल्याच्या दरात वाढपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
उदारीकरणाच्या नावाखाली उत्पादन...पुणे   : देशात १९९१ मध्ये...
विधिमंडळाचे आजपासून पावसाळी अधिवेशनमुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी...
दुष्काळ, पीकविम्याचे आठ हजार कोटी...मुंबई ः लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर...
दुष्काळ, मंत्र्यांचे भ्रष्टाचार, आरक्षण...मुंबई : राज्यात भीषण दुष्काळ आहे, त्यामुळे...
मॉन्सूनची सिक्कीम, पश्चिम बंगालपर्यंत...पुणे : अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर...
'टीम देवेंद्र'चा विस्तार; विखे पाटील,...मुंबई : आगामी विधानसभा निवडणूक ऐन तोंडावर आली...
ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचा पाचपुतेंच्या...श्रीगोंदे : काष्टी येथील माजी मंत्री बबनराव...
खरेदीदारांच्या इच्छेवर पॅकेजिंगचा पडतो...एखादा खाद्यपदार्थ लोकांना आकर्षित ...
नगरमध्ये छावणीचालकांसाठी आणखी ६ कोटींचा...नगर : पशुधन जगविण्यासाठी छावणीचालकांचे अर्थचक्र...
सांगली जिल्ह्यात खरीप पेरा रखडलासांगली : जिल्ह्यात वळीव पावसाने दडी मारली,...