agriculture news in marathi, government should take decision on sugar buffer stock : harshavardhan patil | Agrowon

‘साखरेच्या ५० लाख टन बफर स्टॉकचा निर्णय घ्या’
सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 डिसेंबर 2017
भवानीनगर, जि. पुणे : साखरसाठ्यावरील नियंत्रण उठविण्याच्या केंद्राच्या निर्णयाचे स्वागत करतानाच केंद्र सरकारने आता ५० लाख टन साखरेच्या बफर स्टॉकचा निर्णय घ्यावा, असे मत माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले आहे. 
 
भवानीनगर, जि. पुणे : साखरसाठ्यावरील नियंत्रण उठविण्याच्या केंद्राच्या निर्णयाचे स्वागत करतानाच केंद्र सरकारने आता ५० लाख टन साखरेच्या बफर स्टॉकचा निर्णय घ्यावा, असे मत माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले आहे. 
 
ते म्हणाले, की साखरसाठ्यावर मर्यादा घालून दिल्याने साखरेचे दर घसरत होते. हे एक षड्‌यंत्र असल्याचे केंद्राच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर केंद्र सरकारने दखल घेत हा निर्णय घेतला. तसा उशिरा हा निर्णय झाला असला, तरी त्याचे परिणाम साखरेच्या दरातील घसरण थांबण्यावर होतील, तेव्हा महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी साखर विकण्याची घाई करू नये.
 
साखरसाठ्याची मर्यादा उठविली म्हणून एकावेळी बाजारात साखर आणू नये. आताची स्थिती पाहता देशात हंगामात २५० लाख टनांपर्यंत साखरेचे उत्पादन होणार आहे. म्हणजेच देशाची गरज पूर्ण करून उरेल एवढे साखर उत्पादन होणार आहे. त्यामुळे डिसेंबरअखेरपर्यंत केंद्र सरकारने आढावा घेऊन साखरेचे दर नियंत्रणात राहण्याकरिता व ऊस उत्पादक शेतकरी व एकूणच साखर उद्योगाचे हित लक्षात घेता सरकारने ५० लाख टन साखरेच्या बफर स्टॉकचा निर्णय घ्यावा.
 
ही साखर कारखान्यांच्याच गोदामात ठेवून त्यावरील अधिभार केंद्र सरकारने भरावा. यापूर्वी तीन वेळा असा निर्णय घेण्यात आला होता. आताही हा निर्णय घेण्याची गरज आहे.

इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यात १८९ मंडळात जोरदार पाउस औरंगाबाद : मराठवाड्यातील 421 महसुल मंडळांपैकी तब्...
हिंगोली जिल्ह्यात सोळा मंडळात अतिवृष्टीहिंगोली : जिल्ह्यात मागील चोवीस तासांमध्ये दोन...
परभणीतील २४ मंडळात अतिवृष्टी नदी, नाले...परभणी : जिल्ह्यात बुधवार पासून पावसाचे...
नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीनादेड : जिल्ह्यातील माहूर, किनवट, भोकर, हिमायतनगर...
कोयनेत पूरस्थिती शक्‍यपाटण, जि. सातारा : कोयना धरण पाणलोट...
कर्जमाफीसाठी मीपण आत्महत्या करू का ?सातारा - ‘‘सोसायटीचे एक लाख ३० हजार रुपयांचे...
यवतमाळ जिल्ह्यात पूर परिस्थिती यवतमाळ  : जिल्हयात सुरु असलेल्या संततधार...
राज्यात भेंडी ५०० ते ३००० रुपये...सांगलीत दहा किलोस २५० ते ३०० रुपये  सांगली...
राज्याचा पुरोगामित्वाचा वारसा जपूया :...मुंबई: शेती, पाणी, गुंतवणूक, गृहनिर्माण अशा विविध...
विदर्भात पावसाचे जोरदार कमबॅकनागपूर ः गेल्या महिनाभरापासून दडी मारलेल्या...
शिराळ्यात नागप्रतिमेची पूजाशिराळा, जि. सांगली ः  अनेक वर्षे जिवंत...
अकोल्यात पावसाचे आगमनअकोला : या भागात गेल्या २० पेक्षा अधिक...
एकात्मिक कीड नियंत्रणात फेरोमोन...कामगंध सापळ्यांचा वापर केल्यास कमी खर्चात कीड...
उत्पादनवाढीसाठी एअरोसोल्सद्वारे...पृथ्वीच्या वातावरणामध्ये कृत्रिमरीत्या सल्फेट...
राजकीय सभ्यता व सुसंस्कृतपणा जपणारा एक...पुणे : राजकिय विरोध कितीही असला तरी राजकारणातील...
अटलजी : एका उत्तुंग नेतृत्वाचा अस्तभारताचे माजी पंतप्रधान, देशाचे लोकप्रिय नेते...
देशाने महान पुत्र गमावला : राहुल गांधी नवी दिल्ली : ''आज भारताने महान पुत्र गमावला...
वाजपेयींच्या निधनाने एका युगाचा अंत :...नवी दिल्ली : ''अटलजींच्या निधनाने एका युगाचा...
अजातशत्रू, मुरब्बी राजकारणी : अटल...शालीन, सभ्य राजकारणाने विरोधकांना जिंकणारे,...
...या आजारांनी वाजपेयींना ग्रासले होतेनवी दिल्लीः माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी...