agriculture news in Marathi, government support to rearing redkandhari cows, Maharashtra | Agrowon

लालकंधारी गोवंश संगोपनासाठी मिळाला शासनाचा आधार...
विवेक पोतदार
मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017

तालुक्यात पशुपालन व्यवसायाला चालना मिळण्यासाठी आणि लालकंधारी गोवंश संवर्धनासाठी शासनाकडून मदत मिळाली पाहिजे. तालुक्यातील विविध भागांत सर्व सुविधा असलेले पशू उपचार केंद्र कार्यान्वित करण्याची गरज आहे.
- बालाजी पाटील, पशुपालक 

जळकोट, जि. लातूर ः गेल्या अनेक वर्षांपासून तालुक्यातील पशुपालक परिश्रमातून लालकंधारी गोवंशाचे संगोपन करीत आहेत. या गोवंशाच्या संवर्धनासाठी पशुपालकांना प्रोत्साहन, पशू आरोग्य सुविधा आणि शासनाच्या आधाराची गरज आहे.

जळकोट या डोंगरी तालुक्यात नेहमीच पाण्याचे दुर्भिक्ष असते. खडकाळ, हलक्या प्रतीची जमीन आणि खरिपावरच भिस्त असते. परंतु, शाश्वत उत्पन्नाचीही हमी नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा पशुपालन हाच मुख्य व्यवसाय आहे. तालुक्यात सुमारे ५८ हजारांच्या वर पशुधन असून, यात लाल कंधारी गोवंशाची संख्या लक्षणीय आहे, अशी माहिती तालुका पशुधन अधिकारी डॉ. भाऊसाहेब बोडके यांनी दिली.

या भागातील लालकंधारी पशुपालकांनी लातूर, उस्मानाबाद, माळेगाव, आदिसह राज्यपातळीवर उत्कृष्ट पशुपालनाबद्दल पारितोषिके मिळवली आहेत. पाण्याचे दुर्भिक्ष, दुष्काळाशी सामना करत चारा-पाणीटंचाईवर मात करत येथील पशुपालकांनी लालकंधारी गोवंश चांगल्याप्रकारे सांभाळलेला आहे. या जनावरांना चांगली मागणी आहे. 

सध्या जळकोट तालुक्यासाठी एक पशुवैद्यक उपलब्ध अाहे. परंतु येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात एक्स रे, रक्त तपासणी, उपचारासाठीचे साहित्य वेळेवर उपलब्ध नसल्याने पशुपालकांना अडचणींचा सामना करावा लागतो.

जनावरांवर प्राथमिक उपचार सोडले तर बाकी उपचारासाठी उदगीर येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाचा आधार घ्यावा लागतो. तेथे जाण्यासाठी वाहनभाड्याचा खर्च येतो. तसेच जनावराच्या उपचारासाठी काहीवेळा सात-आठ दिवस रहावे लागते. त्यामुळे पशुपालकांनी जनावरांच्या उपचारासाठी लागणारी औषधे मोफत द्यावीत तसेच पशू दवाखान्यात राहण्याच्या कालावधीत जेवणाची सोय करण्याची मागणी केली आहे. 

प्रतिक्रिया
लाल कंधारी गोवंश डोंगरी भागात शेतीकाम आणि दुग्ध व्यवसायासाठी योग्य आहे. पशुपालकांनी शुद्ध वशांवळीच्या वळुचा पैदाशीसाठी वापर करावा. दुग्धोत्पादन वाढवण्यासाठी जातिवंत दुधाळ गाय आणि शुद्ध वळुची निवड करावी. वर्षातून दोन वेळा जनावरांना लसीकरण करावे.
- डॉ. अनिल भिकाने, पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर 

इतर अॅग्रो विशेष
फिलिपिन्सच्या शाश्वत शेतीचे गमकफिलिपिन्स हा शेतीप्रधान देश आहे. येथील शेतकरी...
सेंद्रिय शेतीसाठी विविध योजना मानवी आरोग्य आणि पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने...
आंबा पालवीवरील किडींचे एकात्मिक...सर्वसाधारणपणे आंबा पिकामधे नोव्हेंबर महिन्याच्या...
राज्यात ग्रामीण घरकुल योजनेला मिळणार गतीमुंबई : राज्यात ग्रामीण घरकुल योजनेंतर्गत...
करडई पीक सल्लागेल्या काही दिवसांत राज्यात पुन्हा अनेक ठिकाणी...
थंडीची तीव्रता वाढेल, हवामान कोरडे राहीलमहाराष्ट्रावरील हवेच्या दाबात वाढ होऊन तो १०१२...
रोग-किडींमुळे कापूस उत्पादकांना १५ हजार...शेतकरी मेटाकुटीस, नुकसानीचा पंचनामा आणि मदतीची...
जैवइंधनातून नवीन अर्थनीती निर्माण होणारपुणे : इथेनॉलचा वापर आणि जैवइंधनाच्या...
साखरेच्या किमती सहा महिन्यांत २००...कोल्हापूर : साखरेच्या दरात गेल्या सहा महिन्यांत...
नाशिक ११.४ अंश; गारठा वाढलापुणे : अंदमान निकाेबार समुद्रालगत तयार...
राज्यात पेरू प्रतिक्विंटल ८०० ते ७०००...नागपुरात प्रतिक्विंटल ६००० ते ७००० रुपये नागपूर...
दुष्काळाचे निकष हवेत व्यावहारिक दुष्काळ जाहीर केला, की कृषिपंपांच्या वीजबिलात...
आता पर्याय हवाचरसशोषक किडींबरोबर गुलाबी बोंड अळीकरिताही...
कांद्यावर ८५० डॉलर किमान निर्यातमूल्यनवी दिल्ली/नाशिक : देशांतर्गत दरावर नियंत्रण...
सौर कृषिपंप योजना गुंडाळली?केंद्र सरकारकडून अनुदान देण्यास हात वर मुंबई :...
बीटी कंपन्यांविरोधात तक्रारीस पोलिसांची...वर्धा : कायद्याच्या अखत्यारीत येत नसल्याचे कारण...
धोरणात्मक बदल न केल्यास दूध संघांचा संप...विस्कटलेल्या दूध धंद्याचे भरकटलेले धोरण : भाग ५...
सूक्ष्म सिंचन अनुदानाचे भिजत घोंगडेमुंबई : राज्यातील सूक्ष्म सिंचन योजनेच्या...
हवामान कोरडे, थंडी परतलीपुणे : राज्यावरील ढगांची रेलचेल कमी होताच,...
पीक अवशेषांचे ब्रिक्वेटिंग शेतकऱ्यांसह...शेतीमध्ये उत्पादित होणाऱ्या पीक अवशेषांची...