agriculture news in marathi, Government transfers 48 lakh compensation to late Dharma Patil and his sons bank account | Agrowon

धर्मा पाटलांसह मुलाच्या खात्यात ४८ लाख जमा
निखिल सुर्यवंशी
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

धुळे : भूसंपादनातील फळबागेच्या मोबदल्याप्रश्‍नी मंत्रालयात २२ जानेवारीला विष प्राशनातून आत्महत्या करणारे शेतकरी धर्मा मंगा पाटील आणि नरेंद्र धर्मा पाटील यांच्या बॅंक खात्यांत प्रत्येकी सरासरी २४ लाखांप्रमाणे एकूण ४८ लाखांचा निधी 'महाजनको'ने वर्ग केला. शेतकरी पिता-पुत्राला पाच एकर जमिनीच्या मोबदल्याविषयी सानुग्रह अनुदानाद्वारे हा लाभ दिला गेला.

धुळे : भूसंपादनातील फळबागेच्या मोबदल्याप्रश्‍नी मंत्रालयात २२ जानेवारीला विष प्राशनातून आत्महत्या करणारे शेतकरी धर्मा मंगा पाटील आणि नरेंद्र धर्मा पाटील यांच्या बॅंक खात्यांत प्रत्येकी सरासरी २४ लाखांप्रमाणे एकूण ४८ लाखांचा निधी 'महाजनको'ने वर्ग केला. शेतकरी पिता-पुत्राला पाच एकर जमिनीच्या मोबदल्याविषयी सानुग्रह अनुदानाद्वारे हा लाभ दिला गेला.

धर्मा पाटील यांच्या मृत्यूनंतर ३० दिवसांत नियमानुसार न्यायदान केले जाईल, असे हमीपत्र ऊर्जामंत्र्यांनी नरेंद्र पाटील यांना दिले होते. या पार्श्‍वभूमीवर धर्मा पाटील, नरेंद्र धर्मा पाटील यांना आंब्याची रोपे आणि प्रतिएकरी सहा लाखांच्या सानुग्रह अनुदानाप्रमाणे सुमारे ५४ लाख ४८ हजारांचा मोबदला देय होऊ शकतो. त्यात पूर्वी त्यांना एकूण चार लाख तीन हजारांचा मोबदला अदा झाल्याने तो वगळता नव्याने सुमारे ५० लाख ४५ हजारांचा मोबदला देता येऊ शकेल, असा अहवाल जिल्हा प्रशासनाने शासनाला दिला होता.

त्यात 'महाजनको'ने जमिनीपोटी सानुग्रह अनुदान म्हणून सुमारे ४८ लाखांचा निधी धर्मा पाटील, नरेंद्र पाटील यांच्या बॅंक खात्यांत वर्ग केला. (कै.) धर्मा पाटील यांच्या दोंडाईचा येथील बॅंक खात्यात २४ लाखांचा निधी वर्ग करताना तो त्यांच्या वारसांना दिला जावा, अशी सूचना आहे. नरेंद्र पाटील यांच्या सुरत येथील बॅंक खात्यात २४ लाखांचा निधी वर्ग केला.

धर्मा पाटलांची तक्रार काय?
दोंडाईचा- विखरण (ता. शिंदखेडा) परिसरात २००९ ला प्रस्तावित व नंतर रद्दबातल झालेल्या औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पांतर्गत पाच एकरमधील भूसंपादनात आंब्याच्या झाडांचे योग्य पद्धतीने मूल्यांकन झाले नाही, लगतच्या शेतकऱ्याचे क्षेत्र ७४ आर असताना त्याला एक कोटी ८९ लाखांचा मोबदला, मला फक्त चार लाखांचा मोबदला का? सरकारी यंत्रणेने अन्याय केला, असे म्हणत विखरणचे शेतकरी धर्मा पाटील (वय ८०) यांनी थेट मंत्रालयात विष प्राशन केले होते. त्यात त्यांचा २८ जानेवारीला मुंबईतील जे. जे. रुग्णालयात रात्री साडेनऊला उपचार घेताना मृत्यू झाला. या घटनेमुळे शासन, प्रशासनाचे धाबे दणाणले होते. त्यात ३ मार्चपर्यंत नियमानुसार मोबदलाप्रश्‍नी न्याय दिला जाईल, अशी हमी ऊर्जामंत्र्यांनी लेखी पत्राद्वारे नरेंद्र पाटील यांना दिली होती. 

इतर ताज्या घडामोडी
रविवार विशेष : दावणत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील...
केंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज...देशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत. या...
श्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत !ठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला...
तूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक...मुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास...
पाकिस्तानात घुसूनच सर्जिकल स्ट्राइक करा...नवी दिल्ली : दहशतवादाविरोधात सर्व राजकीय पक्षांनी...
शिवजयंतीला शिवनेरी किल्ल्यावर शिववंदनापुणे : छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या...
हुतात्मा संजय राजपूत, नितीन राठोड यांना...बुलडाणा  ः काश्मीरमधील पुलवामा सेक्टरमध्ये...
जिवाणूंमुळे होतो फुफ्फुसाच्या...फुफ्फुसाच्या ट्यूमरच्या विकासामध्ये तेथील...
पाणीटंचाईची ऊस लागवडीला झळपुणे :ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या...
नगर जिल्हा परिषदेचे उद्या अंदाजपत्रकनगर : जिल्हा परिषदेची अंदाजपत्रकीय विशेष सभा...
सौरपंपांपासून साडेचार हजार शेतकरी वंचितजळगाव : मुख्यमंत्री सौरकृषिपंप योजनेच्या लाभासाठी...
सौर कृषिपंप योजनेच्या लाभार्थ्यांचा...सोलापूर : शेतकऱ्यांना सौरऊर्जेद्वारे दिवसाही...
औरंगाबादेत द्राक्ष प्रतिक्विंटल ३५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
शिवसेना-भाजपचे युतीच्या दिशेने पुढचे...मुंबई: लोकसभा निवडणुकीतील युतीसाठी शिवसेना-...
किमान तापमानात वाढ, उन्हाळी हंगामास...महाराष्ट्रावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
पुणे विभागात हरभऱ्याची ४९ टक्केच पेरणीपुणे : पावसाळ्यात कमी पावसामुळे जमिनीत पुरेशी ओल...
शाळांमधील ४९८ खोल्या धोकादायकपुणे : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने...
मराठवाड्यात रब्बी पिकांची वाढ खुंटलीऔरंगाबाद : पाण्याचा ताण, तापमानातील चढउतार यामुळे...
अमरावतीत तूर, कापसाला मिळेना भावअमरावती : चीनकडून भारतीय सोयाबीनला वाढती...
गुलाब उत्पादकांच्या कष्टाला मिळाले फळ नाशिक : दुष्काळी परिस्थिती, कमी असलेला भाव,...