agriculture news in Marathi, Government under dominance of insecticide compaines says Sawant | Agrowon

सरकार कीटकनाशक कंपन्यांच्या दबावात
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 23 जानेवारी 2018

यवतमाळ (प्रतिनिधी) : जिल्ह्यात कीटकनाशक फवारणीतून झालेल्या विषबाधेमुळे शेतकरी, शेतमजुरांचे मृत्यू झाले. त्यानंतर "आप''ने केलेले आंदोलन व जनहित याचिकेमुळे विशेष तपास समिती (एसआयटी) स्थापन करण्यात आली. समितीने अहवाल राज्य शासनाला दिला. मात्र, अजूनही तो अहवाल सार्वजनिक करण्यात आला नाही. कीटकनाशक कंपन्यांच्या दबावात सरकार काम करीत आहे, असा आरोप आम आदमी पक्षाचे राज्याचे पक्षप्रमुख ब्रिगेडिअर सुधीर सावंत यांनी पत्रकार परिषदेत केला.

यवतमाळ (प्रतिनिधी) : जिल्ह्यात कीटकनाशक फवारणीतून झालेल्या विषबाधेमुळे शेतकरी, शेतमजुरांचे मृत्यू झाले. त्यानंतर "आप''ने केलेले आंदोलन व जनहित याचिकेमुळे विशेष तपास समिती (एसआयटी) स्थापन करण्यात आली. समितीने अहवाल राज्य शासनाला दिला. मात्र, अजूनही तो अहवाल सार्वजनिक करण्यात आला नाही. कीटकनाशक कंपन्यांच्या दबावात सरकार काम करीत आहे, असा आरोप आम आदमी पक्षाचे राज्याचे पक्षप्रमुख ब्रिगेडिअर सुधीर सावंत यांनी पत्रकार परिषदेत केला.

विषबाधा प्रकरणाला चार महिने लोटले आहे. अजूनही शासनाने एकाही जबाबदार प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई केली नाही. बी.टी. बियाणे कंपन्या शेतकऱ्यांची फसवणूक करीत आहेत. अशी गंभीर स्थिती असताना शासन फसवणूक करणाऱ्या कंपन्यांविरोधात कारवाई करणे तर दूरच शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली नाही. यावरून राज्य शासन कीटकनाशक कंपन्यांच्या दबावात असल्याचा आरोप सावंत यांनी केला.

मोनोक्रोटोफोस सारखे जीव घेणारे घटक जे रासायनिक युद्धात वापरल्या जातात, अशा प्रकारचे घटक किटकनाशकामध्ये वापरल्या जात आहे. कीटकनाशक फवारणीमुळे शेतकऱ्यांचा मृत्यू झाला नाही, असे कीटकनाशक कंपनीचे क्रॉप केयर फाउंडेशन सांगत आहे. त्यामुळे हा दावा खोटा असल्याचे ब्रिगेडिअर सुधीर सावंत म्हणाले.

इतर ताज्या घडामोडी
शेतकऱ्याने तयार केली डिझेलवरची बाईकसांगली : वाढत्या पेट्रोलच्या सुटकेसाठी...
शेतकऱ्यांना फसविणारे विक्रेते,...सोलापूर : शेतकरी केंद्रबिंदू मानून...
धुळे जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस...धुळे : जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस लागवडीची...
जळगाव जिल्ह्यात खरिपासाठी मुबलक खतेजळगाव : जिल्ह्यात आगामी खरिपासाठी शेतकऱ्यांची...
सोलापुरात गाजर, काकडीचे दर वधारले,...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कारखान्यांनी थकीत `एफआरपी' त्वरीत...सोलापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी थकवलेले...
हमीभाव खरेदी बंद होताच तुरीचे दर झाले...नागपूर ः शासनाची हमीभाव खरेदी बंद होताच तुरीचे दर...
नगरला गव्हाला १६४१ ते १८५० रुपये...नगर : नगर बाजार समितीत गव्हाची आवक बऱ्यापैकी होत...
नाशिकला आंबा, खरबूज, कलिंगड तेजीतनाशिक : वाढत्या उन्हाबरोबरच नाशिक बाजार समितीत...
कासवाच्या लिंगनिर्धारणामागील जनुकीय...गेल्या ५० वर्षांपासून अंडी उबण्याच्या...
सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसातारा  : जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा वाढू...
अग्रणी नदी पुन्हा अतिक्रमणाच्या विळख्यातसांगली : तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्‍यांतील अग्रणी...
पुण्यातील डाळिंब, पेरू, चिकू बागांना...पुणे  : जिल्ह्यातील मृग बहारातील डाळिंब,...
इंदापुरातील नीराकाठची पिके जळण्याच्या...वालचंदनगर, जि. पुणे  ः इंदापूर तालुक्‍यातील...
नगर जिल्ह्यात ‘कृषी’च्या कामांवरच ‘...नगर  ः जलयुक्त शिवार अभियानाची कामे...
विषबाधा बळीप्रकरणी पावणेदोन कोटींची मदतअकोला : कीटकनाशक फवारणी करताना विषबाधा होऊन मृत...
हिंगोलीतील १०३ गावांची ‘जलयुक्त शिवार’...हिंगोली : जलयुक्त शिवार अभियानाच्या चौथ्या...
विधान परिषदेच्या ६ जागांसाठी उत्साहात...मुंबई ः स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान...
सैन्य दलात अधिकारी होण्याची संधीमुंबई : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलात...
कर्नाटक: कामगारांच्या पत्राशेडमध्ये...विजयपूर : नुकतेच कर्नाटकात विधानसभेची निवडणुका...