agriculture news in marathi, The government will firmly support farmers during the famine | Agrowon

सरकार शेतकऱ्यांच्या खंबीरपणे पाठीशी : लोणीकर
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 23 ऑक्टोबर 2018

जाफराबाद, जि. जालना  : तालुक्‍यातील पीक परिस्थितीची पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी रविवारी (ता. २१) पाहणी केली. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केले. टंचाई निवारण कामी तसेच शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यात दिरंगाई करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असेही श्री. लोणीकर म्हणाले.

जाफराबाद, जि. जालना  : तालुक्‍यातील पीक परिस्थितीची पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी रविवारी (ता. २१) पाहणी केली. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केले. टंचाई निवारण कामी तसेच शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यात दिरंगाई करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असेही श्री. लोणीकर म्हणाले.

श्री. लोणीकर म्हणाले, जाफराबाद तालुक्‍यात १६ हजार ७२९ शेतकऱ्यांना ७२ कोटी ६९ लक्ष कर्जमाफी दिली. तसेच यावर्षी १४ हजार २८५ शेतकऱ्यांना ७३ कोटी ४९ लक्ष कर्जवाटप केले. बोंड अळीचे अनुदान ३५ कोटी मंजूर केल्याचे सांगून १५ कोटी ७७ लाख रुपये शेतकऱ्यांना
वाटप केले. पीकविमा आणि गारपीट अनुदानाची आकडेवारी देत शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार कसे उभे आहे असे सांगितले.

जाफ्राबाद येथील शेतपिकांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधून झालेल्या नुकसानीची माहिती घेतल्यानंतर पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी जाफ्राबाद येथील हिंदुस्तान लॉन येथे सर्व तालुकास्तरीय यंत्रणाकडून परिस्थितीच्या नियोजनाचा आढावा घेतला.

या प्रसंगी आमदार संतोष दानवे यांनी जाफराबाद तालुक्‍यातील दुष्काळाची दाहकता लक्षात घेता विहीर अधिग्रहण आणि टॅंकर प्रस्ताव मंजुरीचे अधिकार तहसीलदारांना मिळावे, तसेच तालुकास्तरीय दुष्काळ निवारण कक्ष स्थापन करावा, चाऱ्याच्या छावण्या निर्माण कराव्या, तसेच खडकपूर्णा प्रकल्पातून ५० गावांसाठी वाटर ग्रिड प्रकल्प मंजूर करावा, अशी मागणी केली.

या वेळी सभापती साहेबराव कानडजे, भाऊसाहेब जाधव, रामधन कळंबे, भगवान लहाने, शिवसिंह गौतम, दीपक वाकडे, उपविभागीय अधिकारी हरिश्‍चंद्र गवळी, तहसीलदार जे. डी. वळवी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय माईनकर, जिल्हा उपनिबंधक एन. व्ही. आघाव, कार्यकारी अभियंता डी. एच. डाकोरे, गटविकास अधिकारी उदयसिंग राजपूत तालुका कृषी आधिकारी एस. टी. पठाण, सहकारी निबंधक पी. एच. बेरा, प्रकल्प अधिकारी विनय साळवे, सपोनि मिलिंद खोपडे, नायब तहसीलदार बी. के. चंडोळ, गौरव खैरनार, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक यांच्यासह सरपंच व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

इतर बातम्या
मक्यातील लाग रंग येण्यामागील गूढ उलगडलेमक्यामध्ये काहीवेळा दिसणाऱ्या लाल रंगाच्या...
रब्बीत १०६ कोटींचे पीककर्ज वाटपपरभणी : यंदाच्या रब्बी हंगामामध्ये...
गव्हाची ६५ हजार ५४३ हेक्टरवर पेरणीनांदेड :नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदा ६५...
एफआरपी तुकड्यात घेणार नाही : खासदार...सांगली : राज्यातील साखर कारखाने सुरू होऊन ८० दिवस...
पाणी योजनांचा वीजपुरवठा सुरळीतजळगाव : जिल्ह्यातील सुमारे ९३५ गावांच्या...
पाणीपुरवठ्यांच्या देयकासाठी दोन कोटीअकोला : दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेल्या...
सांगली जिल्ह्यात हळद काढणीला वेगसांगली : जिल्ह्यात हळदीच्या काढणीला प्रारंभ झाला...
अपुऱ्या सदस्यांच्या उपस्थितीत जिल्हा...धुळे : पुरेशी सदस्यसंख्या नसतानाही (कोरम)...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
जतमधील ४२ गावांना कर्नाटकातून पाणीसांगली : जत तालुक्यातील ४२ गावांना कर्नाटकातून...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
पाण्याचे प्रस्ताव सादर करा : पालकमंत्रीसोलापूर : पाणीटंचाई भासणाऱ्या गावातील...
व्याज सवलती योजनेबाबत बँकांनी गांभीर्य...सोलापूर : पीककर्जाची नियमितपणे कर्जफेड...
राज्यात १७८६ टॅंकरव्दारे पाणीपुरवठापुणे  : सलग दोन वर्षे पावसाने ओढ दिल्यानंतर...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...
जळगावमधील ग्रामपंचायतींचा डिजिटल...जळगाव  ः ग्रामपंचायतींमध्ये संगणकावरील विविध...